शिक्षणातील सुसंवाद..शिक्षण संवाद शिक्षणातील सृजनतेचा,नवतेचा वेध घेणारा शैक्षणिक ब्लॉग...

Thursday, 15 March 2018

भाषा शिक्षण समजून घेताना....

भाषा शिक्षण समजून घेताना.....
--------------------------------------------------

महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे,युनिसेफ व क्वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने क्वेस्टचा  मराठी ऑनलाईन कोर्स सुरू आहे. या कोर्स चे पाचवे संपर्क सत्र प्रत्यक्ष क्वेस्टमध्ये  सोनाळे ता.वाडा जि.पालघर येथे दि.12 व 13 मार्च रोजी संपन्न झाले.मा.निलेश निमकर सरांचे अनमोल मार्गदर्शन  लाभले.आमच्या मार्गदर्शक  मा.सुजाता लोहकरे मॅडम  विभाग प्रमुख मराठी तथा उपसंचालक विद्याप्राधिकरण पुणे ह्या आमच्यासोबत होत्या.

-----------------------
फिल्ड व्हिझीट
-----------------------
📌 अंगणवाडी भेट:-

पहिल्या दिवशी आमचे चार गट करून परिसरातील अंगणवाड्या पाहण्यासाठी गेलो होतो.पूर्व प्राथमिक स्तरावरील उत्तम शिक्षण मुलांना क्वेस्टच्या मदतीने दिले जात आहे.तिथल्याच अंगणवाडी ताई कशा पद्धतीने दिवसभरात विविध भाषिक उपक्रम राबवतात हे प्रत्यक्ष पाहायला मिळाले. वारली भाषा असतानाही बोलीकडून प्रमाणभाषेकडे मुले येत असल्याचे दिसून आले.अंगणवाडीचे दररोज घ्यावयाच्या उपक्रमाचे दैनिक नियोजन होते.याप्रमाणे
मुक्तखेळ,बडबडगीत,परिपाठाचे उपक्रम, सहभागी वाचन,अभिनयगीत,भाषानुभव,गणिती अनुभव, विज्ञानुभव,कलानुभव,मोठा खेळ, गोष्ट.
याप्रमाणे नियोजन होते.हे सर्व उपक्रम किती छान पद्धतीने राबवले जात असून मुलांना समृद्ध अनुभव मिळत होते.याबद्दल कौतुक वाटले.

📌 बालभवन भेट:-
दुपारच्या सत्रात एका आश्रमशाळेतील बालभवनाला भेट दिली.क्वेस्टच्या मदतीने बालभवन चालवले जाते.भाषाशिक्षण,गणिताचे शिक्षण,या विषयांचा इतर विषयांशी समन्वय हे तेथिल अध्ययन समृद्ध वातावरणातून दिसून आले. बालभवनातील विद्यार्थ्यांना एकाच वर्गात गटागटात  बहूस्तर अध्ययन अनुभव दिले जात होते. इथले माझे पुस्तक, स्व-अभिव्यक्तीत फलक,माझे लेखन,गोष्टीचे स्वलिपीत लेखन,वर्तमानपत्रातील कात्रणांचा संग्रह असे खुप छान छान उपक्रम समजून घेतले.

क्वेस्ट मध्ये आल्यावर मा.निलेश सरांशी चर्चा केली. अतिशय दुर्गम भागातील वेगवेगळ्या ठिकाणी अंगणवाड्याचे कसे उत्तम काम चालू आहे. याचे अनुभव ऐकले.आदिवासी भागातील रचनात्मक काम पाहून सर्वजण भारावून गेले होते.गाड्यातून फिरताना सागाचं जंगल,विरळ दहा-पाच कौलारू घरे किंवा लिंपलेल्या झोपड्या दिसत होत्या.

----------------------
*दुसरा दिवस*
-----------------------

#गोष्ट रंग#

क्वेस्ट चा गोष्ट रंग हा खुप छान उपक्रम. याबद्दल या अगोदर ऐकलं होतं. आज प्रत्यक्ष गोष्ट रंग अनुभवायला मिळाले. संतोष गायकवाड व अश्विनी पांडे यांनी एक गोष्ट सादर करून दाखविली.लहान मुलांसाठी क्वेस्ट ची टिम नाट्यीकरणातून गोष्टीचे सादरीकरण करते. याला मुलांचा खुपच छान प्रतिसाद मिळतो.याबद्दलचे अनुभव सिनेअभिनेते अतुल कुलकर्णी यांच्या सौभाग्यवती कुलकर्णी मॅडम यांनी शेअर केले.

📌 पुस्तक गाडी:-

पुस्तक गाडी हा क्वेस्टचा खुप छान उपक्रम. वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी छान छान पुस्तके पुस्तक गाडी घेऊन जाते. यामुळे वाचनाची गोडी लागते.

📌 मा.निलेश सरांनी *वाचन* यावर खुप छान मार्गदर्शन केले.देशविदेशातील संशोधनाच्या माध्यमातून हा विषय खुप छान समजून सांगीतला.

मराठी विषयाच्या विषय सहायकांना समृद्ध अनुभव मिळाले.निसर्गाच्या सान्निध्यात कसे दोन गेले काही समजले नाही.स्वतःला समृद्ध करणारा एक अविस्मरणीय अनुभव.

समाधान शिकेतोड
विषय सहायक
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था उस्मानाबाद.

Monday, 29 January 2018

पुस्तक भिसी

पुस्तक भिसी
-----------------------------------------------------
महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक व सध्या विषय सहायक,प्रादेशिक विद्याप्राधिकरण मुंबई प्रिय मित्र वेच्या गावीत यांनी शिक्षकांच्या समृद्धीसाठी पुस्तक भिसी हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करून महाराष्ट्रातील शिक्षणक्षेत्रात आगळावेगळा पायंडा पाडला.
शिक्षक नवनविन शैक्षणिक पुस्तके वाचू लागले.पुस्तकावर चिंतन,चर्चासत्रे होऊ लागली. यातून स्वतःला समृद्ध करत मुलांच्या हितासाठी धडपड करण्याची उर्मी मिळाली.टिचर सारख्या पुस्तकाची प्रेरणा घेऊन अनेकजण दुर्गम भागात रचनात्मक कार्य करू लागले.
हा उपक्रम नुकताच पार पडलेल्या शिक्षणाच्या वारीतही पाहायला मिळाला.वेच्याच्या रचनात्मक कामाचे भरभरून कौतुक झाले.इतर काही जिल्ह्यातील शिक्षकांनी प्रेरणा घेऊन अशी पुस्तक भिसी सुरू केली.मी माझ्या जिल्ह्यातील शिक्षकांसाठी अशी पुस्तक भिसी लवकरच सुरू करतोय.

                   - समाधान शिकेतोड

Sunday, 21 January 2018

उर्दू भाषा मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम राज्यस्तरीय कार्यशाळा

*उर्दू भाषा मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम राज्यस्तरीय कार्यशाळा*
--------------------------------------------------------------------------
दिनांक- 17 जाने.ते 20 जाने. 2018
स्थळ- महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे.

राज्यातील विषय सहायक,उर्दू भाषा व उर्दू भाषेचे उपक्रमशील शिक्षक यांची दिनांक 17/1/2018 ते 20/1/2018 या कालावधीत  मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम राज्यस्तरीय कार्यशाळा महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे येथे संपन्न झाली.

       *मार्गदर्शन*
1)मा.नंदकुमार साहेब
प्रधान सचिव,शालेय शिक्षण व क्रिडा विभाग,महाराष्ट्र शासन.
2)मा.डाॅ.नेहा बेलसरे
उपसंचालक महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे.
3) मा.सुजाता लोहकरे
उपसंचालक,महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे.
4) मा.डाॅ. इरफान इनामदार
अभ्यासक्रम विकसन अधिकारी महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे.
  
*प्रशिक्षणास भेट व मार्गदर्शन*
1) मा.भटकर  साहेब
प्राचार्य,DIECPD जालना.
2) मा.अंबेकर साहेब
प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण अमरावती.
3) मा.जाधव साहेब
प्राचार्य, DIECPD अकोला.
4) मा.दिग्रसकर साहेब.
शिक्षणाधिकारी (प्रा) जि.प.अकोला.
      
   *सहभागी प्रशिक्षणार्थीं*
    विषय सहायक (उर्दू भाषा)
  उपक्रमशील शिक्षक (उर्दू भाषा)

*संवादक/राज्य सुलभक*

1)   मा. प्रतिभा भराडे
2)   मा.अस्मा देसाई
3)   श्री. समाधान शिकेतोड
4)   श्री.अशोक मुजमुले

     *उर्दू भाषा विभाग*
1) मा.तौसीफ परवेज  विभाग प्रमुख उर्दू महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे.
2) अंजुम शेख विषय सहायक महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे.

*मा.नंदकुमार साहेब यांची प्रेरणादायी भेट*

मा.नंदकुमार साहेब यांनी या कार्यशाळेला भेट देऊन प्रेरणादायी मार्गदर्शन केले.त्यांच्या सोबत मा.श्याम मक्रांमपुरे व मा.सिद्देश वाडकर हेही होते. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे  सर्वांमध्ये चैतन्य निर्माण झाले. ज्ञाताकडून अज्ञाताकडे
मूर्ताकडून अमूर्ताकडे
पूर्णांकडून अंशाकडे या सिद्धांतानुसार मुलं कसं शिकतं हे जीवन व्यवहारातील उदाहरणे देऊन समजून सांगीतले.
प्रचंड मेहनत घेऊन उत्तम मोड्यूल व अध्ययन साहित्य तयार करा.असा सल्ला दिला.
अकोला व जालना जिल्ह्याने स्वयंस्फुर्तीने उर्दू भाषा मूलभूत वाचनाच्या संदर्भातील कामाचे कौतुक केले.

📌 मा.सुजाता लोहकरे, उपसंचालक यांनी उर्दू भाषा मुलांना वाचता येण्यासाठी कशा प्रकारे अध्ययन साहित्य निर्मिती करावी लागेल. प्रशिक्षणाचे  मोड्यूल तयार करणे यावर मार्गदर्शन केले. सर्व समस्या समजून घेतल्या. उर्दू भाषेचे अक्षरगट तयार करणे,त्यावर मुलांसोबत काम करणे.ध्वनीभेद,शब्दभेंड्या याबद्दल मार्गदर्शन केले.  

📌  अकोला व जालना जिल्ह्यात. उर्दू भाषा मूलभूत  वाचन क्षमता विकासाच्या बाबतीत केलेल्या  रचनात्मक कार्यावर चर्चा झाली.

📌   शिक्षण पूरक कृती,श्रवण,भाषण-संभाषण, वाचन यातील कृती,कृतीमागील विचार सर्व प्रशिक्षणार्थींनी समजून घेतला.उर्दू भाषा मूलभूत वाचन क्षमता विकास करण्यासाठी कशा पद्धतीने कृतींची निश्चिती करावी लागेल यावर चर्चा झाली.

📌 अध्ययन संच साहित्य तयार करणे,अक्षर गट निवडणे यामध्ये येणा-या अडचणी त्यावरील उपाययोजना यावर चर्चा झाली.

📌 मा.प्रतिभा भराडे व मा.अस्मा देसाई यांनी मुलं समजून घेणे,मेंदूविज्ञान हा विषय यांनी छान समजून दिला.

📌समाधान शिकेतोड व अशोक मुजमुले यांनी  प्रशिक्षणार्थ्यांच्या वाचन शिकण्याच्या टप्प्यांच्या संकल्पना  विविध कृतींच्या सहाय्याने स्पष्ट केल्या.

📌  अध्ययन संच साहित्य पेट्यातील साहित्याच्या द्वारे विविध कृती प्रशिक्षणार्थ्यांनी समजून घेतल्या.

📌 विविध कृतीगीते आनंदाने गायली.

*उर्दू विषयाचे विभाग प्रमुख मा.तौसीफ परवेज व त्यांचे सहकारी अंजुम शेख यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.कार्यशाळेचे सुंदर नियोजन केले होते.*
  
    *शब्दचक्र,अक्षरगट,वाचनपाठ हे समजून घेतले.उर्दू भाषेत अक्षर गट तयार केले. यामुळे 100 % मुलांचा मूलभूत वाचन क्षमता विकास होणारच हा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.*

*समाधान शिकेतोड*
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था उस्मानाबाद.