Monday 7 December 2015

ज्ञानरचनावाद कार्यप्रेरणा कार्यशाळा

ज्ञानरचनावाद कार्यप्रेरणा कार्यशाळा
----------------------------------------------------------
                स्थळ - चांदणी विद्यालय चांदणी
                 दिनांक - 7 डिसेंबर 2015

प्रगत महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परांडा तालुक्यातील पिंपळवाडी बीट मधील शिक्षकांची बीटस्तरावर कार्यशाळा चांदणी विद्यालय चांदणी ता.परांडा जि.उस्मानाबाद येथे संपन्न झाली.

या कार्यशाळेसाठी मा.घनश्याम पौळ अधिव्याख्याता डायट उस्मानाबाद,
मा.जाधव साहेब गटशिक्षणाधिकारी परांडा, मा.फुलारी साहेब शिक्षण विस्तार अधिकारी पिंपळवाडी, उपक्रमशील शिक्षक समाधान शिकेतोड, दत्ता गुंजाळ व पिंपळवाडी बीट मधील भाषा व गणित विषयातील तज्ज्ञ वाघमारे सर व चौरे सर उपस्थित होते.

📌  मा. घनश्याम पौळ अधिव्याख्याता डायट यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची पार्श्वभुमी, स्वरूप व या कार्यक्रमातील डायटची भुमिका स्पष्ट केली.
शिक्षकांना प्रेरणादायी उदबोधनपर मार्गदर्शन केले.
📌 शिक्षण विस्तार अधिकारी मा.फुलारी सरांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा
शासननिर्णय समजावून सांगितला. पिंपळवाडी बीट अप्रगत विद्यार्थी विहीन करण्यासाठी  शिक्षकांना सकारात्मक उर्जा  दिली.
📌  मा.जाधव साहेब गटशिक्षणाधिकारी परांडा यांनी शिक्षकांना छान मार्गदर्शन केले . ज्ञानरचनावादी पद्धतीने सर्व मुलांना प्रगत बनविण्यासाठी शिक्षकांना प्रेरणा दिली.

📌 भूम तालुक्यातुन समाधान शिकेतोड व दत्ता गुंजाळ यांना शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावण्यात आलेले होते.
    
          ■ समाधान शिकेतोड ■
  📌समाधान शिकेतोड यांनी ज्ञानरचनावाद संकल्पना, तत्वे, ज्ञानरचनावादाचे स्त्रोत या वर चर्चा केली.
📌भाषा विषयाच्या वाचन, लेखन, आकलन या बाबतीत अप्रगत मुलांना समजून घेऊन प्रगत कसे करता येईल यावर चर्चा केली.त्यासाठी शोध,संशोधन व उपक्रम यावर मार्गदर्शन केले.
📌कुंमठे बीट सातारा येथील अनुभव व स्वतःचे अनुभव शेयर केले. शिक्षकांनी स्वतःचे अनुभव शेयर केले.
📌 मा.नंदकुमार साहेब प्रधान सचिव यांच्या प्रेरणेने राज्यात प्रयोगशील शिक्षक कसे विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी प्रयोग करत आहेत.अशा प्रयोगशील शिक्षकांच्या प्रयोगशीलतेबद्दल चर्चा केली. यामुळे शिक्षकांना प्रेरणा मिळाली.
📌 ज्ञानरचनावादी वर्गाची वर्गरचना, बैठकव्यवस्था कशी करायला हवी.
C किंवा U आकाराची यावर चर्चा केली.
📌 अप्रगत मुलांना प्रगत करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षणाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करायला हवेत. विविध  App. द्वारे मुलांना अध्ययन अनुभव कसे द्यायचे याबाबत चर्चा केली.
📌  मुलांना भाषासमृद्धीकडे घेऊन जाण्यासाठी समृद्ध अनुभव देता यावेत यासाठी शिक्षकांनी पालनिती,जीवनशिक्षण, शिक्षण वेध सारखी मासीके वाचावीत.भाषीक खेळ घेण्यासाठी अशा संदर्भ साहित्य पाहावे.
📌 विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साधने उपलब्ध व्हावीत यासाठी क्वेस्ट च्या वेबसाईट बद्द्ल माहिती दिली.
www.quest.org.in
📌 महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक WhatsApp group बद्दल माहिती सांगितली.

            ■ दत्ता गुंजाळ ■
📌 दत्ता गुंजाळ यांनी गणित विषयातील अमुर्त संकल्पना विद्यार्थ्यांना समजून देण्यासाठी साधनांचा वापर कसा करावा हे उदाहरणासह समजावून सांगितले.
📌 कुंमठे बीट सातारा येथील अनुभव, उपक्रम शेयर केले.
📌 वर्गातील रचना करताना कोणते डायग्राम फरशीवर आखता येतील ते सांगीतले.
📌 भाषा व गणित विषयातील क्षमता कौशल्यांच्या विकसनासाठी कोणकोणते साहीत्य लागते त्याची यादी सांगितली.
परिसरातून हे साहित्य सहज उपलब्ध कसे करता येइल याबद्दल मार्गदर्शन केले.

दुपारच्या सत्रात ज्ञानरचनावाद या विषयावर आधारित काही प्रेरणादायी  व्हिडिओ शिक्षकांना दाखवले.
वाघमारे सर व चौरे सर यांनी ज्ञानरचनावादी अध्ययन-अध्यापन करताना आंतरक्रिया कशी घडते यावर सर्वांनी चर्चा केली.शिक्षकांनी मुद्दे लिहले.
कार्यशाळेतील उपक्रमशील शिक्षक नागनाथ गटकळ यांनी ज्ञानरचनावादी पद्धतीने मुलं कशी शिकतात.याचाप्रत्यक्ष अनुभव सांगितला.
राऊत सर यांनी पिंपळवाडी बीट मधील शिक्षकांचा WhatsApp group बनवावा असे विचार मांडले व लगेच ग्रुप तयार केला.
शिक्षण विस्तार अधिकारी फुलारी सर यांनी कार्यशाळेचे खुप छान नियोजन केले होते.

सर्वांनी पिंपळवाडी बीट अप्रगत विद्यार्थी विहीन करण्याचा संकल्प केला.

                                          शब्दांकन
                                      समाधान शिकेतोड

Friday 4 December 2015

ज्ञानरचनावाद कार्यप्रेरणा कार्यशाळा

ज्ञानरचनावाद कार्यप्रेरणा कार्यशाळा
----------------------------------------------------------
                         स्थळ- डायट उस्मानाबाद.
                          दिनांक - 3 डिसेंबर 2015

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बीट चे विस्तार अधिकारी व प्रत्येक बीट मधील भाषा व गणित विषयातील तज्ज्ञ उपक्रमशील शिक्षक यांची जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

📌 उस्मानाबाद जिल्ह्याला शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत मानाचं स्थान प्राप्त करण्याचा निर्धार करण्यात आला.
📌 मा.दयानंद जटनुरे (जेष्ठ अधिव्याख्याता)
सरांनी जिल्ह्यातील उपक्रमशील,तंत्रस्नेही शिक्षकांचा व प्रयोगशील अधिका-यांचा  आदरपूर्वक उल्लेख केला.
📌 मा.जटनुरे सरांनी ज्ञानरचनावाद या विषयावर सर्वांशी संवाद साधला. जीवनव्यवहारातील उदाहरणे देऊन ज्ञानरचनावाद समजून सांगीतला.
📌 ज्ञानरचनावादी अध्ययन-अध्यापन करताना आंतरक्रिया कशी घडते यावर सर्वांनी चर्चा केली. प्रत्येकाने मुद्दे सांगितले.
📌 मा.प्राचार्य डायट मा.शेख सर यांनीही ज्ञानरचनावादावर छान मार्गदर्शन केले.
📌 भाषा व गणित विषयाचे गट करण्यात आले.
📌 गटात अप्रगत विद्यार्थी प्रगत करण्यासाठी द्यावयाचे अध्ययन अनुभव याविषयी चर्चा केली.
📌 भाषा विषयातील गटात वाचन, लेखन, आकलन या क्षमताक्षेत्राच्या विकासासाठी वाचन, लेखन, आकलनाच्या अप्रगत विद्यार्थ्यांसाठी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली.
📌 आदरणीय जटनुरे सरांनी भाषा विषयाचे खुप अभ्यासपुर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
📌 समाधान शिकेतोड यांनी भाषा गटातील शिक्षकांशी संवाद साधला व उपक्रमांवर चर्चा केली.
📌 उपक्रमशील शिक्षक विनोद कांबळे यांनी गणित गटातील चर्चेचे छान सादरीकरण केले.सुधिर वाघमारे यांनी भाषा विषयाचे सादरीकरण केले.
📌 आपल्या बीट मध्ये राबवावयाच्या कृतीकार्यक्रमाची रूपरेषा मा.माने सर विस्तार अधिकारी यांनी सांगितली.
📌 पुढे बीटस्तरावर अशी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.

उस्मानाबाद जिल्हा अप्रगत विद्यार्थी विहीन जिल्हा करण्याचा सर्वांनी संकल्प केला.

                                      शब्दांकन
                              समाधान शिकेतोड

Monday 30 November 2015

☆Workshop on "ICT For Schools"☆

☆Workshop on "ICT For Schools"☆
--------------------------------------------------------
                स्थळ- सुलाखे हायस्कुल बार्शी
                दिनांक - 30 नोव्हेंबर 2015

जीडीपी फाऊंडेशनच्या वतीने C-DAC ने Workshop on "ICT For Schools" या विषयावर उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम,परांडा, वाशी तालूक्यातील जि.प.शाळांच्या शिक्षकांसाठी बार्शी येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

जी.डी.पी फाऊंडेशनचे मा.गोरख कातुरे, मा.सुदर्शन जगदाळे,मा.नितीन मांजरे यांनी कार्यशाळेसाठी C-DAC टीमला आमंत्रीत केले होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण मिळावे म्हणून यांनी सर्व शाळांना फाऊंडेशनच्या माध्यमातून मोफत  संगणक दिलेले आहेत.

C-DAC ही केंद्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाची स्वायत्त संस्था आहे.याचे संस्थापक मा.विजय भटकर हे आहेत.

C-DAC ( centre for Development of Advance Computing ) ने
  📌Online labs for School lab experiments
📌ebasta - School Books to ebooks
📌Open Source Tools
📌AMF - Assessment and Monitoring Framework

या विषयावर प्रात्यक्षिकासह  शिक्षकांना मार्गदर्शन केले व शिक्षकांकडून प्रात्यक्षिक करून घेतली.
C-DAC team Mumbai यांनी मार्गदर्शन केले. ......
▪मा.समाधान मानोरे - सिनिअर टेक्निकल      ऑफिसर
▪मा.मनोजकुमार - टेक्निकल ऑफिसर
▪मा.तुषार शिरगावे- प्रोजेक्ट इंजीनियर

📌 आभासी प्रयोगशाळा (online lab) हा उपक्रम खुप छान आहे. यामध्ये विद्यार्थी प्रयोग करू शकतात. पुन्हा पुन्हा सराव करू शकतात. यामध्ये अॅनिमेशनचा सुंदर उपयोग केला आहे.
याची ऑफलाईन डीव्हीडी पण C-DAC ने तयार केली आहे.ती आम्हाला त्यांच्याकडून मिळाली.
www.olabs.edu.in
📌 ई बस्ता(ebasta)- यामध्ये आपल्या शाळेची नोंदणी करून एका वर्गासाठी सर्व विषयांची ई बुक तसेच इतर उपयोगी ऑडिओ, व्हिडीओ ठेवू शकतो.विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत होईल.
ई बस्ता मध्ये बालभारती,NCERT,व इतर राज्यातील बोर्डाची ईबुक उपलब्ध आहेत.
ई बस्ता चे प्ले स्टोअर वरून अॅप घेता येईल.
📌 शाळेतील ई शिक्षण  Interactive व्हावे यासाठी dia(diagram editor),Audacity अशा साॅप्टवेअर्सची माहीती दिली.

या कार्यशाळेसाठी उपक्रमशील शिक्षक राहुल अंधारे, मंगेश मोरे व कातुरे सर व त्यांच्या सहका-यांनी जीडीपी फाऊंडेशनच्या वतीने परिश्रम घेतले.

                                            शब्दांकन 
                                     समाधान शिकेतोड

Wednesday 18 November 2015

आम्ही कविता लिहतो

आम्ही कविता लिहतो
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
आमच्या जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री ता.भूम जि.उस्मानाबाद या शाळेत परिपाठात विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांबाहेरील किंवा स्वलिखीत कविता सादर करायची असा उपक्रम सुरू केला होता.

आज दिव्य मराठी दैनिकात आमच्या शाळेतील इयत्ता चौथीच्या  विद्यार्थ्यांची कविता आली.
राबवलेल्या उपक्रमाचे समाधान वाटले.

•••••••••••••••••••••••••••••••••••
उपक्रमाबद्दल थोडेसे
••••••••••••••••••••••••••••••••••

📌 इयत्ता तिसरी च्या पाठ्यपुस्तकात कविता तयार करण्याचा उपक्रम दिला आहे. परंतु सुरूवातीला  मुलांना कविता करायला जमत नव्हते.
📌 मुलांना वर्तमानपत्रातील, मासीकातील,इतर पुस्तकातील कविता लिहून आणायला सांगितले व त्यांचे परिपाठात वाचन घेऊ लागलो.
📌 सुरूवातीला इयत्ता तिसरी मधील वैष्णवी भोसले ही परिपाठात कविता सादर करू लागली.
📌 याची इतर विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरणा मिळाली व इयत्ता दुसरी,तिसरी व चौथीच्या वर्गातील विद्यार्थी पण कविता सादर करू लागले.
📌 पुढे अनुभवातून,निरीक्षणातुन कविता लिहू लागले.
📌 काही विद्यार्थी स्वतः लिहलेली कविता परिपाठात वाचून दाखवू लागले.
📌 छान कविता सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना पेन बक्षीस दिला.

लवकरच शाळेत बालकवीसंमेलन घेत आहोत.

उपक्रमाची यशस्वीता
●●●●●●●●●●●●●●●●●●●●
📌 मुलांच्या सृजनशील विचाराला चालना मिळाली.
📌  मुलांना अवांतर वाचनाची गोडी निर्माण झाली.
📌  स्व-अभिव्यक्ती क्षमतेचा विकास यातुन झाला.
📌  स्वतःच्या नवनिर्मितीचा मुलांना आनंद  मिळू लागला.
📌 मुले वर्तमानपत्रातील बालकविता वाचू लागली.

भाषा समृद्धिसाठी हा उपक्रम नक्कीच उपयोगी आहे.

                       समाधान शिकेतोड
       जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री ता.भूम
          जि.उस्मानाबाद

Sunday 1 November 2015

दिवाळी अंक

किशोर मासीकाचे दिवाळी अंक आज मिळाले. माझ्या तिसरीच्या वर्गातील मुले आनंददाने अंक वाचू लागली.
हाच दिवाळीचा आनंदी फराळ
मुलांना समृद्ध करणारा. .....

Tuesday 27 October 2015

संकल्प ज्ञानरचनावादाचा

"संकल्प ज्ञानरचनावादाचा"

आज भुम येथे गटशिक्षणाधिकारी कार्यालयात "संकल्प ज्ञानरचनावादाचा "या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.

यामध्ये कुंमठे बीट येथे भेट देऊन पाहणी करून आलेले,रचनावाद समजून घेतलेले शिक्षक व ज्यांनी रचनावादी काम स्वयंस्फुर्तेने सुरू केलेले आहे. असे शिक्षक एकत्र आलेले होते.

प्रत्येकांनी रचनावादाबद्दल चे अनुभव शेयर केले. रचनावादी अध्ययन अनुभव मुलांना कसे दिले जावेत. यावर चर्चा केली.

भाषा व गणित विषयातील क्षमता कौशल्यांच्या विकसनासाठी कोणकोणते साहीत्य लागते.रचनावादी वर्ग,शाळा तयार करण्यासाठी पालकांचा सहभाग कसा घ्यावा.
रचनावादी वर्गाध्यापनामध्ये कोणत्या कृती करता येतील यावर चर्चा केली.

रचनावादी अध्ययन अनुभव देण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध ज्ञानाचे स्त्रोत उपलब्ध करून द्यावे लागतील.
📌 पुरक वाचन साहित्य, तंत्रज्ञान, ध्वनी फिती, पाठ्यपुस्तके, क्षेत्रभेट, परिसर सर्वेक्षण
यावरही चर्चा झाली.
भुम तालुक्याचे प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी मा.शेख साहेब यांनी सर्वंकष मार्गदर्शन केले. समस्या समजून घेतल्या.

या कार्यशाळेसाठी सर्व साधनव्यक्तीनी मदत केली.
पुढे रचनावादी शाळेवर भेटायचे ठरले.

Tuesday 20 October 2015

नविन शैक्षणिक धोरण

नविन शैक्षणिक धोरण कार्यशाळा

आज जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री ता.भूम जि.उस्मानाबाद व भगवंत विद्यालय हाडोंग्री यांच्या संयुक्त विद्यमाने नविन शैक्षणिक धोरण या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.

या कार्यशाळेसाठी हाडोंग्री येथील शालेय व्यवस्थापन समिती चे सदस्य, शिक्षण प्रेमी नागरिक,ग्रामस्थ उपस्थित होते.

भगवंत विद्यालय हाडोंग्री चे मुख्याध्यापक चकोर सर व सर्व शिक्षक तसेच जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री चे मुख्याध्यापक बुरंगे सर  व सर्व शिक्षक उपस्थित होते.

PPT च्या साह्याने समाधान शिकेतोड यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली.चर्चेत सर्वांनी सहभाग नोंदविला.

Sunday 18 October 2015

वाचन प्रेरणा दिन

वाचन प्रेरणा दिन


    📚 वाचन प्रेरणा दिन 📖
आज जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री व भगवंत विद्यालय हाडोंग्री यांनी संयुक्तपणे डॉ.ए.पी जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी केली. विद्यार्थ्यांना डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्याविषयी माहिती सांगितली.

  जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री ता.भूम जि.उस्मानाबाद येथे वाचन प्रेरणा दिन साजरा केला. ......
📌 विद्यार्थ्यांना अभिवाचन करून दाखवले.
📌 बालवाचनायतील विविध प्रेरणादायी पुस्तकांचे  विद्यार्थ्यांनी वाचन केले.
📌 पुस्तकांवरच्या विविध कविता मुलांना वाचुन दाखवल्या.
📌  आजपासून नियमितपणे अवांतर प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन करण्याचे मुलांनी ठरवले.
📌 स्वतःच्या वाढदिवसाला प्रत्येक मुलाने एक पुस्तक बालवाचनायला देऊ असा निश्चय केला.
📌 निवडक किशोर खंड चे वाचन मुलांनी केले.
📌 अकारविल्ह्यानुसार शब्दकोश कसा पाहावा हे  मुलांना समजून सांगीतले.
📌 आदरणीय डॉ. कलामांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग मुलांना सांगीतले.
📌 वाचन प्रेरणा दिन कसा वाटला याबद्दल मुले उद्या लिहुन आणणार आहेत.

Saturday 17 October 2015

ब्लॉगर टिचर

: 💻ब्लाॅगर टीचर्स महाराष्ट्र 💻
या ब्लॉगिंग ग्रुपवर असलेले ब्लॉगर टिचर ...

दिपक जाधव  सारोळा कासार अ नगर
www.dipakjadhav888.blogspot.in

❗: श्री संजय पुलकुटे

Www.lmcschools.blogspot.in
Www.lmcschool3.blogspot.in
Www.tcrschool.blogspot.in
Www.tcrschool2.blogspot.in
Www.maazishala.blogspot.in

❗: श्री : ज्ञानदेव नवसरे

www.dnyanvahak.blogspot.in

❗: श्री गजानन सोळंके
Mirkhel124.blogspot.in

❗: श्री उमेश खोसे

www.umeshkhose.blogspot.in

❗: श्री सुनिल आलूरकर
www.zpguruji.com

❗: Shri Kashid A.S.
: mahazpschoollive.bloggspot.in/
http://mahazpschoollive.blogspot.com

❗: श्री गजानन बोढे बोढे,सहशिक्षक,जि.प.प्रा.शा.भानुसेवस्ती ता.सिल्लोड जि.औरंगाबाद.
http://www.misulabhak.blogspot.in

❗: श्री सुहास श्रीरंग कोळेकर
जि प शाळा ,कायरे
ता पेठ,जि नाशिक
www.zpprimaryschoolkayre.blogspot.in

❗:श्री राजकिरण चव्हाण
srujanshilshikshak.blogspot.in

❗: श्री राजेंद्र मोरकर
www.rajumorekar.blogspot.in

❗: श्री भरत पाटील
माळीनगर ता.मालेगाव
http://bhartpatil.blogspot.in

❗: नागेश (नागजी) टोणगे,
जि.प.हायस्कुल मस्सा (खं.) ,
ता. कळंब जि. उस्मानाबाद.
gurumauli11.blogspot.in

❗: श्री .राम राघोजी माळी
जि. प. केंद्रशाळा मुळगाव, ता. अंबरनाथ, जि. ठाणे.
www.ramrmali.blogspot.in

❗: श्री आनंद नांदुरकर
जि प शाळा जळगांव नहाटे
ता अकोट जि अकोला
www.zpschooljalgaonnahate.blogspot.in

❗: Mr.Sachin vitthalrao shelke
http://zppsmugaon.over-blog.com

❗: श्री शंकर जाधव
shankarjadhav555.blogspot.in

❗: श्री सचिन कडलग, जालना
elearningzp.blogspot.in

❗: अशोक निवृत्ती तळेकर
प्रा.शिक्षक ता.डहाणू  जि.पालघर
👉http://ashoktalekar.blogspot.in/                                                                                                          

❗: संतोष दहिवळ
www.santoshdahiwal.in

...
❗: Mundhe d d
zpschoolparatwadi.blogspot.in

❗: Govardhan Khambait

Blog address
zpschooljale27201105801peint.blogspot.com
govardhankhambait.blogspot.in

❗: -Rajendra pandit -rajendrapandit.blogspot.in

❗ रविंद्र नादरकर : http://ezpschool.blogspot.in/            

❗: Shankar. JADHAV
shankarjadhav55.blogspot.in

❗: आनंद नांदुरकर
जि प शाळा जळगांव नहाटे
ता अकोट जि अकोला
www.zpschooljalgaonnahate.blogspot.in

❗: Pathan  Aadam Khan
Asst.Teacher
Zp devgad
Dist sindhudurg

Zpurduschooldhalavli.blogspot.in

❗ श्री  लक्ष्मण सावंत: http//laxmansawant.blogspot.in

❗ श्री.संतोष थोरात
z.p.pri.school,bondarmal..tal-peth,dist-nashik

www.dnyansanjivani.blogspot.in

❗ श्री  शशिकांत फारणे
shashikantfarne.blogspot.in

❗ श्री. Ganesh Satimeshram
zpteacher.weebly.com

❗: श्री खंडागळे सर
khandagaletejal.com

श्री लक्ष्मण वाठोरे
lakshmanwathore.in

श्री रोहोकले सर
mahazpschool.blogspot.in

श्री तानाजी सोमवंशी
tanajisomwanshi.in

श्री हिरोज तडवी
hirojtadvi.blogspot.in

श्री सोमनाथ वाळके
somnathwalke.in

❗विक्रम अडसुळ
www.krutishilshikshak.blogspot.in

❗: श्री मंगेश मोरे
mangeshmmore.blogspot.in

श्री रमेश वाघ
rameshwagh.blogspot.in

❗: महेश शहाजी लोखंडे ता.कराड जि.सातारा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेमळा (शरदनगर) कराड
http://zppsshindemalasharadnagar.blogspot.com/
पंचायत समिती कराड http://pskarad.blogspot.com/

❗: निलेश इंगळे  जि प शाळा पारवा ता. पुसद  जि .यवतमाळ
zpparvaschool.wordpress.com

❗: नाव अशोक फुंदे
शाळा -जि प.प्रा शाळा उभिधोंड.    ता पेठ जि नाशिक zpschoolubhidhond.blogspot.in

❗ श्री संतोष बोडखे: zppschangdevnagar.blogspot.com
काम सुरू आहे.

❗: निकाळजे घनश्याम अर्जून ,
जि.प.केंद्रशाळा जोगमोडी, ता.पेठ, जि. नाशिक
zpprischooljogmodi.blogspot.com

❗:श्री हरीदास भांगरे
haridasbhangare.blogspot.com

❗:श्री समाधान शिकेतोड
shikshansanvad.blogspot.com

❗:श्री उमेश कोटलवार
hasatkhelatshikshan.blogspot.in

❗:श्री बालाजी मुंडलोड
chhayamundlod.blogspot.in

❗:श्री अरुण सेवलकर
arunsevalkar.blogspot.com

❗:श्री  बालाजी केंद्रे
जि प शाळा सोजडबार ता अक्कलकुवा जि नंदुरबार
मुळ गाव लातूर
www.aamhishikshak.blogspot.in

❗:श्री  प्रविण डाकरे
Https://pravindakare.blogspot.com

❗ श्री राजेश्वर पिल्लेवार
ssaparhani.blogspot.com
rajeshwarpillewar.edublog.org

❗ श्री रंगनाथ कैले
rangnathkaile.blogspot.com

❗ श्री  रोशन फलके shikshanmarathi.blogspot.com/
आनंदी शिक्षण

❗ श्री रविंद्र राऊत
जि प प्राथ शाळा देमनवाडी ता कर्जत जि अहमदनगर
demanwadi.blogspot.in

❗ श्री . रवि कोळी सर
जि.प.प्राथमिक शाळा जळू
ता.एरंडोल जि.जळगाव
http://ravikoli.blogspot.com/

❗ श्री राजु खाडे
khaderaju.blogspot.com

❗ श्री बालाजी जाधव
www.balajijadhav.in

❗ श्री रविंद्र भापकर
www.ravibhapkar.in

❗ श्री समीर लोणकर
zppsjamadadewasti.blogspot.in

Sunday 11 October 2015

विद्यार्थ्यांचे पत्र

माझ्या तिसरीच्या वर्गातील एका विद्यार्थीनीने मला लिहलेले हे
पत्र ....

सर मी स्वतः लिहलय हे ही तिनं आवर्जून सांगितले.

स्वतःच्या स्वाक्षरीसह अनपेक्षितपणे मिळालेलं हे पत्र मला खुप आवडले.

मुलांची स्व-अभिव्यक्ती विकसीत होत आहे याचाही खुप आनंद झाला.

Saturday 10 October 2015

शारीरिक शिक्षण

शारीरिक शिक्षण

📌 आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयातील इयत्ता तिसरी साठी आज विविध मुलभूत हालचाली साठी ढांग टाकणे हा उपक्रम घेतला.

📌 हे कौशल्य धावण्यासारखेच आहे,मात्र या हालचालीसाठी पाय लांब टाकावे लागतात.

📌 मुलभूत हालचालीतूनच मुलांच्या विविध हालचाली विकसित होतात. त्यामुळे विविध हालचालींचा पाया मुलभूत हालचाली हाच आहे.

📌 मुलांनी आनंददायी पद्धतीने हे कौशल्य आत्मसात केले.

Wednesday 7 October 2015

तंत्रस्नेही शिक्षक

नमस्कार मित्रमैत्रिनींनो
राज्यातील शाळाशाळांमध्ये अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे . तंत्रस्नेही शिक्षकांच्या विविध कार्यशाळा होत आहे.

तंत्रस्नेही शिक्षकांना समृद्ध करावे, एक शैक्षणिक चळवळ उभी रहावी यासाठी आदरणीय नंदकुमार साहेबांच्या प्रेरणेतुन महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षकांना एकत्र केले जात आहे.

त्यामुळे ही चळवळ अजून गतिमान होईल. त्यासाठी राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी पुढील संकेतस्थळावर नोंदणी करावी.

www.technoteachers.in