Saturday 28 February 2015

स्वच्छतेचं भारूड

संतानी समाजाचं प्रबोधन करण्यासाठी भारूडाच्या माध्यमातुन लोकजागृती केली.मनोरंजन आणि प्रबोधन दोन्हीही घडायचं.
     मी लहान असताना माझ्या गावी भारूडं व्हायची.काही लोकप्रिय भारूडं आजही आठवतात.त्याची गायनाची लकब खुपच छान असते.
शाळेत आज सहजच मुलांच्या वैयक्तीक स्वच्छतेच्या संर्दर्भात भारूड तयार करून मुलांसोबतत गायलं. मुलं आनंदान नाचू लागली.स्वच्छतेविषयीच्या चांगल्या सवयी,बाबी त्यांना समजल्या.
हा वेगळा प्रयोग तुम्हीही करून बघायला हरकत नाही.

Thursday 26 February 2015

वाटचाल ई शिक्षणाची

पुस्तक शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालयासमोर, मुंबई ४०००२१ येथे उपलब्ध आहे. (किंमत २०० रुपये), sureshpatil76@gmail.com (मोबाईल नंबर ९८९२२१९५८३) येथे संपर्क साधावा. सुरेश पाटील शिक्षण विकास मंचाचे समन्वयक म्हणून काम पाहतात.

माझा नवोपक्रम

माझा नवोपक्रम—माय सिग्नेचर

ई साहित्य

ई बुक वाचण्यासाठी ई साहीत्य पाहा.
ई प्रतिष्ठानच्या वेबसाईची लिंक मिळेल.
खुप खुप वेगवेगळी पुस्तके आहेत.
वाचा,डाउनलोड करा...

Tuesday 24 February 2015

पालकनिती

पालकनिती या मासीकाची मी दर महिन्याला वाट पाहत असतो.याचा प्रत्येक अंक नाविन्यपूर्ण,पालकाचं पालकत्व जागृत करणारा असतो.
फेब्रुवारीचा अंक मुलं आणि तंत्रज्ञान या विषयावर आहे.निमखेडा येथे प्राथमिक शाळेवर असणारे शिक्षक अनिल सोनुने यांचा तंत्रभरारी हा लेख उत्तम आहे.
सुनिता कुलकर्णी यांनी आपल्या लेखातून ग्रॅनी क्लाउड,होल इन द वाॅल या नविन संकल्पनेतून स्वरचित अध्ययन अनुभव हे नविन तंत्रज्ञान असल्याचे सांगीतले आहे. प्रकाश अनभूले यांच्या शहानी वेबपाने या सदरात निवडक वेबसाईटची माहीती आहे.
     खुपच छान अंक आहे....
मित्रमैत्रिनींनो हे मासीक नक्की वाचा...संग्रही असू द्या....
www.palakneeti.org

Sunday 22 February 2015

आनंददायी विज्ञान खेळणी

हसतखेळत आनंददायी विज्ञान खेळणी हा अरविंद गुप्ता यांच्या बद्दलचा लेख आजच्या महाराष्ट्र टाईम्सच्या संवाद पुरवणी मध्ये वाचा.
आयुकाच्या मुक्तांगणासाठी तर त्यांनी मुलांसाठी अनेक  आनंददायी विज्ञान खेळणी बनवली.त्यांच्या संकेतस्थळावर याबाबत माहीती उपलब्ध आहे.

महत्वाच्या लिंक मध्ये संकेतस्थळ दिलेले आहे.

Saturday 21 February 2015

शाळा गीत.......

प्रसिद्ध कवि सुरेश सावंत यांनी त्यांच्या शाळेसाठी विद्यालय गीत लिहलय....हे मी नुकतचं फेसबुकवर पाहीलय....खुपच छान...विद्यापीठाला,महाविद्यालयाला जसं एक गीत असत...अगदी तसच...त्यांनी त्यांच्या विद्यालयासाठी  लिहलय हे गीत...
मीही आमच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसाठी गीत लिहणार आहे......

Friday 20 February 2015

चिमुकल्यांची विमानभरारी....

जि.प.प्रा शाळा कन्नड ता. अक्कलकोट जि.सोलापूर या शाळेची सहल विमानाने बंगळूरला जाऊन आली.
या शाळेला मी अभिनंदन पत्र लिहलं होत.नंतर मला त्यांचा फोन आला होता.माझ्या अभिनंदनामुळे त्यांना खुप आनंद झाला होता.मुलांच्या आनंदासाठी आपल्या पगाराच्या पैशातून सहल घेऊन जाणारे हे गुरूजण खरोखरचं महान आहेत.
विमान सफरीचे अनुभव मुले लिहून पाठवणार आहेत.

शिक्षणाचा अधिकार व भाषांचे भवितव्य

Emailing concept note_lang symposium.pdf
या परिसंवादात मी सहभागी होत आहे.

Tuesday 17 February 2015

प्रशिक्षण.....

प्रशिक्षण.....
1)प्रशिक्षणासाठी योग्य स्थळ निवडावे.भौतिक सुविधा असाव्यात.
2) 1)प्रशिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.
उदा.प्रोजेक्टर,पि.पि.टी.इंटरनेट
3) प्रशिक्षण प्रमुख,सत्र समंत्रक, तज्ञ मार्गदर्शक यांच्या कामाची विभागणी असावी.
4)वरील सर्वाना MOT(Manegment of Training) चे प्रशिक्षण द्यावे.
5)तज्ञ मार्गदर्शकांची निवड परीक्षा व मुलाखतीतुन करावी.
6)प्रशिक्षण पुर्व व उत्तर प्रशिक्षणार्थ्याची चाचणी घ्यावी.
7)प्रशिक्षणासाठी तालुकास्तरावर  BIET तयार करावे.
8) तज्ञ मार्गदर्शकांची विषयानुसार निवड करावी.
9)प्रशिक्षण प्रमुखांनी प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थ्याची निवड पंधरा दिवस अगोदर करावी.
10) प्रशिक्षण MOT च्या निकषानुसार व्हावे.

Friday 13 February 2015

जीवन शिक्षण कार्यशाळा


🌈✏ लेखन कार्यशाळा✏
विभागीय जीवन शिक्षण लेखन कार्यशाळा लातुर येथे 29 जानेवारी ते 31जानेवारी या कालावधीत संपन्न झाली.
कांदबरीकार प्रा.शेषेराव मोहीते,पत्रकार विकास गाढवे,कवि भारत सातपुते,कथाकार विलास सिंदगीकर,व्यंगचित्रकार प्रकाश घादगिने,इतिहास संशोधक विवेक सौताडकर या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.कार्यशाळेत कवि भारत सातपुते यांनी बाप या विषयावर कविता लेखन करून घेतले.
या कार्यशाळेत मी तीन लेख लिहले.
1)लेखन कार्यशाळेतील माझे अनुभव
2) पुस्तक परीक्षण: आनंदवन
3) एक वेगळा उपक्रम:  पोस्टकार्ड लेखन
तांबडे सर,गणेश गोरे,प्रशांत वान्नरे या मित्रांनीही सक्रीय सहभाग घेतला....तांबडे सर खुप चांगले लेखन करतात...आता आपल्या तालुक्यातील शिक्षकांनी लिहायला हवं....आपण राबवत असलेले उपक्रमांना प्रसिद्धी द्यायला हवी...त्यासाठी जीवनशिक्षणला लेख लिहावेत..
  याचबरोबर शिक्षण सहसंचालक डाँ.शंकुतला काळे,साहित्यीक उत्तम कांबळे,साहित्यीक ना.म.जोशी यांच्या मार्गदर्शनाच्या डी.व्ही.डी. दाखवण्यात आल्या......
खुप नवे मित्र मिळाले....आजपर्यत पुस्तकात वाचलेल्यांशी संवाद साधता आला...मी खुप चर्चा केली....

Sent from Samsung Mobile

नमस्कार मित्रांनो ....

      आपला सर्वांचा सुसंवाद होण्यासाठी हा शिक्षण संवाद ब्लॉग.... 
सध्या ब्लॉग पूर्णत्वाकडे जात आहे . कृपया त्रुटी सांगाव्यात व मार्गदर्शन करावे.