Monday 30 March 2015

शैक्षणिक व्हिडीओ

श्री. रवि माने
पदवीधर शिक्षक,
ता. कोरेगाव, जि सातारा
त्यांनी  raviacademy.org ही वेबसाईड तयार करुन स्वतः इयत्ता पहिली पासून ते आठवी पर्यंत अनेक प्रकारचे अनेक विषयवरील शैक्षणिक व्हिडिओ तयार केले असून सर्व व्हिडिओ त्यांच्या साइटवर पहावयास मिळतात.
ते एक उपक्रमशील शिक्षक आहेत.

Sunday 29 March 2015

बेंच पाटी

मी एका उपक्रमशील शिक्षकांन बेंचला स्लेट बसवल्याचं पाहिलं.
काय भन्नाट कल्पकता!
मुलांच्या कृतीशीलतेला, अभिव्यक्तीला खुपच छान संधी मिळेल यामुळ.
   आपणही हा प्रयोग करूयात....

बेंच पाटी

मी एका उपक्रमशील शिक्षकांन बेंचला स्लेट बसवल्याचं पाहिलं.
काय भन्नाट कल्पकता!
मुलांच्या कृतीशीलतेला, अभिव्यक्तीला खुपच छान संधी मिळेल यामुळ.
   आपणही हा प्रयोग करूयात....

महत्त्वाच्या वेबसाईट

काही महत्वाच्या वेबसाईड शिक्षकांच्या कामाच्या
१)www.sahaygiri.com
२)www.navnirmitilearning.org
३)www.majalgaonbrc.com
४)www.baljagat.com
५)www.shikshakkatta.blogspot.in
६)networkedblogs.com
७)http://www.palakneeti.org/  ( e books )
८)joshworth.com/dev/pixelspace/pixelspace solarsystem.html
९)http://www.learningwhiledoing.in/
१०)shiksha .com
११)http://study.taaza.com/
१२)http://www.meracareerguide.com/
१३)inmyschool.in
१४)http://boltipustake.blogspot.in
१५)www.teacherofindia.org
१६)http://www.whereincity.com
१७)www.majalgaonbrc.com
१८)www.avakashvedh.com
१९)www.quest.org.in
२०)http://marathidesha.com
२१)www.zpkolhapur.gov.in
२२)http://www.prajakt-zaware.blogspot.in
२३)http://inmyschool.in
२४)http://www.balbharati.in
२५)www.swselearn.com
२६)http://www.zpschoolmaliwada.com
२७)www.virtualuniversity.com
२८)http://www.mscert.net
२९)www.killedar.org
३०)http://ebooks.netbhet.com
३१)www.swselearn.com
३२)http://www.mscert.net
३३)www.impnewszpgr.hpage.com
३४)www.trgmdm.nic.in
http://mahanews.gov.in
३५)www.ssa.nic.in
३६)http://dgipr.maharashtra.gov.in                                
३७)www.mpsp.org.in
३८)www.testsandtips.in
३९)www.epapergallery.com
४०)www.dise.in
४१)www.indiacode.nic.in
४२)http://www.academics-india.com
४३)www.chandamama.com
४४)www.popcornbreak.com
४५)http://nagarzp.gov.in
४६)http://www.dakhal.in
४७)www.psvaijapur.com
४८)www.first-school.ws
४९)www.imd.gov.in
५०)http://ecastevalidity.in
५१)http://www.arvindguptatoys.com
५२)http://ildc.inwww.mscepune.in
५३)http://pragatshikshansanstha.org/
५४)www.balajijadhav.in
५५)www.santoshdahiwal.in
५६)www.shikshakmitra.blogspot.in
५७)www.zppsmaliwasti.blogspot.in
५८)www.mahazpteacher.blogspot.in
५९)www.mahaeducatenet.com
६०)www.zpteacher.blogspot.in
६१)www.kathabodh.blogspot.in
६२)www.aadarshshala.blogspot.in
६३)www.marathishala.in
६४)www.mahazpteacher.blogspot.in
६५) ५३)http://shikshansanvad.blogspot.com

Saturday 28 March 2015

मुलांना मारू नका...

दै.लोकसत्तामधील चतुरंग पुरवणीतील मुलांना मारू नका हा लेख प्रत्येक पालकांना अतर्मुख करणारा आहे.बालहट्टाला वैतागून मुलांना होणारी शिक्षा किती चुकीची आहे.हे या लेखात उदाहरणासह सांगीतले आहे.
      मुलांना समजुन घेताना,पालकांना संयम बाळगण गरजेचं आहे.मुलांशी संवाद वाढवून त्याच्या काही चुका समजावून सांगून मुलांना मारणं टाळता येऊ शकतं.
    घरात मुलांन रिमोटचा ताबा घेतल्यावर,घरी कोणी पाहुणे आल्यावर जरी राग आला तरी त्याला आवर घालून मुलाशी संवाद साधून समजून घेता येऊ शकते.

लेख वाचा....
www.loksatta.com

Friday 27 March 2015

वेगळी वाट...

मला वाटते की शाळेत टाचण वही ऐवजी शिक्षकांची दैनंदिनी असावी.त्यात शिक्षकांनी दिवभरात काय काय घेतले.ते यावे.ती दिवसभरानंतर लिहावी.
वार्षिक नियोजन सुद्धा लवचिक असावे.आज टाचणाचा उपयोग शिक्षकांना कितपत होतोय?हा संशोधनाचा मुद्दा होईल.
ज्ञानरचनावादी अध्ययन अनुभव देताना वर्गातील आंतरक्रिया काय असेल याची कल्पना करून टाचण लिहणं म्हणजे दिव्यच..( नाहीतरी ते लिहायला जागा असते तरी कुठे? )
खरं तर शिक्षक हा चालतं बोलतं पाठ्यपुस्तक असतो.अनेक छोट्या छोट्या संवादातून,प्रसंगातून मुलांच्या कौशल्याचा,क्षमतेचा विकास घडत असतो.यातुन जीवनकौशल्य,गाभाभूत घटक,मुल्ये याची शिकवण मुलांना आपसुकच घडत असते.हे सर्व टाचणात येतेय कुठे? यावर छान उपाय म्हणून प्रयोगशील शिक्षिका वैशाली गेडाम यांनी केलेल्या नोंदी खुप महत्त्वाच्या आहेत.
शिक्षकांची सृजनता,नवतेपणा,उपक्रशीलता टाचणात बसवणे अवघडच आहे. टाचण काढत काढत दैनंदिनीही लिहू या.......

Thursday 26 March 2015

माझा विद्यार्थी....

माझा विद्यार्थी ई बुक

माझा विद्यार्थी हे पुस्तक ई साहित्य प्रतिष्ठानकडून ई बुक रूपात लवकरच येत आहे.
ई साहित्य प्रतिष्ठान तर्फे जवळपास तीन लाख लोकांपर्यत ईमेल द्वारे नि:शुल्क ई बुक जातात.
ई बुक च्या रूपात प्रकाशीत होणारे हे माझे पहिलेच पुस्तक आहे.
प्रयोगशील शिक्षणाधिकारी
मा.सुचिता पाटेकर, प्रसिद्ध साहित्यीक तथा प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी
मा.तृप्ती अंधारे,प्रसिद्ध साहित्यीक तथा शिक्षण विस्तार अधिकारी
मा.व्यंकटेश चौधरी यांचे अभिप्राय या पुस्तकाला लाभलेले आहेत.

ई साहित्य प्रतिष्ठानला भेट द्या.
www.esahity.com

"सध्याच्या शिक्षणव्यवस्थेतही स्व:ताची संवेदनशीलता,उत्साह आणि आशावाद जागता ठेवलेल्या एका शिक्षकाच्या चारोळ्यांचा संग्रह लवकरच येत आहे"....
        —ई साहित्य प्रतिष्ठान

Saturday 21 March 2015

कलाशिक्षक: नानाभाऊ मांडलीक

नमस्कार, श्री.मांडलिक.एन.बी. कला शिक्षक. एकवीरा विद्यालय . कांदिवली, मुंबई. (मुळगाव,पाड्ळदे,ता.जि.धुळे,खानदेश)
  रोज नवीन कला हा ऊपक्रम गेल्या वर्षीपासून राबवत आहेत , वर्गात शिकविलेली  व  विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली हस्तकलेची  एक वस्तू रोज फेसबुकवर व व्हाट्स अप वर टाकत असतात.महाराष्ट्र भरातील जि.प.चे व इतर  4000 मित्र पहातात ,सेव करतात ,विद्यार्थीना शिकवतात , आपणास आवडले तर इतरांना शेअर करा ,ज्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी ,शिक्षकांना उपयोग होईल .
        तसेच विद्यार्थ्यांनी कृतीतून शिकावे यासाठी आनंददायी सोपे शिक्षण हा नाविन्य पूर्ण संच तयार केलेला आहे ,अधिक माहिती साठी ब्लॉगला भेट द्या, किंवा 9869429823 संपर्क करा. रोज नवीन कलाकृती उपक्रमाच्या सर्व कलाकृती पहा खालील ब्लॉगवर.
mandliknb10.blogspot.commandliknb10.blogspot.com

Thursday 19 March 2015

चिमणी दिन

जागतिक चिमणी दिन
मित्रमैत्रीनींनो.....
20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन आहे. या दिवशी शाळेत आपण हा दिवस साजरा करूयात......
मुलांना चिमणीचे चित्र काढायला लावणे किंवा चित्र रंगवणे.
चिमणीच्या गोष्टी सांगणे, गाणी म्हणने.
चिमणी विषयी निबंध लिहणे.
उन्हाळ्याची तिव्रता जाणवतेय,त्यासाठी चिमणीसाठी कृत्रीम पाणपोई तयार करणे.
या आणि इतर गोष्टी आपण करूयात.....
आज चिऊताई दिसेनाशी झालीय...चिमण्याचा चिवचिवाट आज ऐकू येत नाही.अंगणात दाणे टिपणारी चिऊताई दुर्मीळच झालीय.त्यासाठी तिच्या संवर्धनासाठी कृत्रीम खोपे तयार करूयात.
लहानपणी आजी गाणं म्हणायची.......
              चिव चिव ये
               चारा खा.....
                पाणी पी...
                भुर्रर....दिसीनं
                   उडून जा....
तेव्हा चिऊताई दिसायची. आता लहान बाळाला चिऊ दिसतचं नाही......
चला तर मग चिमणी चं संवर्धन करूयात...
                      — समाधान शिकेतोड
                             पक्षीमित्र

Sunday 15 March 2015

कार्यशाला सोलापूर

राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षकांच्या कार्यशाळेत मा.शिक्षण संचालक जरग साहेब यांच्याकडून सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र स्विकारताना...सोबत मा.प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग नंदकुमार साहेब,शिक्षण उपसंचालक पाटील साहेब,शिक्षणतज्ञ ह. ना. जगताप,डाॅ.सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी यवतमाळ
8 मार्च 2015

उपक्रमशील शिक्षकांची कार्यशाळा

इनोव्हेटीव्ह  टिचर   काॅन्फरन्स
7,8 मार्च रोजी सोलापूर येथे संपन्न झाली.आपण सर्वचजण उपक्रमशील आहोत.या कार्यशाळेतील महत्तवाचे मुद्दे येथे मांडतो.
संपूर्ण महाराष्ट्रातून उपक्रमशील शिक्षक याठीकाणी आलेले होते.सिंहगड इन्स्टिट्यूटच्या भव्य कॅम्पसमध्ये ही कार्यशाळा होती.
पहिल्या दिवशी सर्व शिक्षकांचे सादरीकरण होते.फिरती प्रयोगशाळा,भिंतीवरचं वाचनालय,विद्यार्थी बॅक,मोडी वाचन,120 पर्यतचे पाढे वाचन,लिंक स्टोरी,रद्दीतुन ग्रंथालय असे खुप चांगले नवोपक्रम शिक्षक सादर करत होते.मी माय सिग्नेचर, सामान्यज्ञान स्पर्धा,माझा ब्लाॅग..या नवोपक्रमाची माहीती सादर केली.
शिक्षणतज्ञ ह.ना. जगताप यांनी गुणवत्तापुर्ण शिक्षण यावर मार्गदर्शन केले.
आय.आय.एम अहमदाबादचे भंडारी साहेब यांनी इनोव्हेशनची चर्चा केली.
1)शिक्षक मोबाईल मंच चे कार्य गुजराथ मध्ये कसे चालते ते सांगीतले.आपल्याकडेही लवकरच सुरू होईल.
2)  SMC मोबाईल मंचचे कार्य

मा.नंदकुमार साहेबांनी शिक्षकांशी खुप छान चर्चा केली.
⭐ATF या विषयावर बोलले.प्रेरणादायी कामाची उदाहरणे सांगीतली.
⭐शै.व्हिडीओ स्पर्धा पुढच्या वर्षी होईल..शाळेचा व्हिडीओ असावा...60 बक्षिसे व इतर 300 बक्षिसे असतील..
⭐साहेबांनी ज्ञानरचनावाद,निसर्गवाद व वर्तनवाद छान सांगीतला.
⭐ Whatapp च्या माध्यमातून चालणारे चांगले शै.कार्य....याचा उल्लेख केला.
सोलापूर जि.प.च्या CEO साहेबांनी वाचन संस्कृती वाढवण्याचे आवाहन केले.

Saturday 14 March 2015

सुलभक झालो...

��अध्ययन अनुभव
4  थी च्या वर्गात ........दुपारी
मुलांनो तालुक्याच्या ठिकाणी विविध स्पर्धा होणार आहेत.
" सर माहीत आहे.अगोदरच्या तासालाच कळालं"
अरे वा म्हणजे स्पर्धा कशाच्या ते कळालं.मग स्पर्धेची तयारी कशी करायची ते सांगतो...कस यशस्वी व्हायचं......
मुल आता मत्रमुग्ध होऊन ऐकत होती...मीही त्यांना निबंधलेखन, वक्तृत्व याबद्दल सांगत होतो...
मुलांचा उत्साह वाढला होता...
तेवढ्यात प्रथमेश म्हणतो" सर तुम्ही लई सहाय्य करता आम्हाला"
मला आनंद वाटला...अन् समजलं...आता आपण सुलभक झालो.....

Friday 13 March 2015

अध्ययन अनुभव

��अध्ययन अनुभव
मुलांना गोष्टी लिहण्याबद्दल सांगत होतो....काही मुलांनी लिहून देखील आणल्या होत्या.सर्व वर्गात गोष्टीबद्दल सांगीतल होत.मुलं आनंदान लिहतं होत होती.आपलं लिहलेलं छापणार अन् तेही पुस्तकात...याचं नवल वाटत होत त्यांना....
हा दुसरीच्या वर्गातील प्रसंग...
मुलांना गोष्टी कशा निवडणार?   पुस्तक कसं तयार होतं याबाबत सांगत होतो....मुल कुतूहलानं ऐकत होती..मी त्यांना सांगीतलं की आपल्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे मॅडम यांची कल्पना आहे...तुमच्या सर्वाच्या गोष्टी त्या पाहणार आहेत.....
आपल्या शाळेवर आल्या होत्या...सर्वाना माहीतय नं......
   तेवढ्यात वैष्णवी बोलली " सर माहीतयं की मला तृप्ती अंधारे मॅडम खुप आवडतात.."
वैष्णवीचे हे उत्स्फुर्त बोलणं...मला खुप भावलं....वैष्णवी तशी खुप हुशार व चाणाक्ष मुलगी...बिनधास्त बोलणारी...या वर्षीच्या ITES च्या परिक्षेत नक्कीच ती जिल्हात पहिली येणार.....
ती मला म्हणते"सर तुम्ही मुंबईहून आल्यापासून खुपचं सर्वाना प्रेमाणे बोलता हो..रागवत नाहीत...समजून सांगतात.....
वैष्णवी मुलांचे गट तयार करते.कार्ड वाटते...हस्ताक्षर तर मोत्यासारखं....तीन एक स्वत:गोष्ट लिहलीय धाडसी हत्ती....
आज मुलांशी संवाद खुपचं छान झाला...दररोजही होतो...पण आज दिवसभरात मुलांशी मुलं होऊन झालेल्या संवादाचा आनंद काही औरच होता.....

राष्ट्रीय परिसंवाद मुंबई

⭐राष्ट्रीय परिसंवाद⭐

9,10,11 तारखेला मुंबई विद्यापीठात "शिक्षणाचा अधिकार व भाषाचे भवितव्य" या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद घेण्यात आला.
यामध्ये भाषातज्ञ,शिक्षणतज्ञ,प्रयोगशील शिक्षक,पाठ्यपुस्तक मंडळातील सदस्य सहभागी झाले होते वेच्या गावीत, फारूक काझी,वैशाली गेडाम, शशिकला पाटील हे प्रयोगशील शिक्षक सहभागी झाले होते.
रमेश पानसे,किशोर दरक, मॅक्झीन मावशी, जी.एन देव,अनिता रामपाल( दिल्ली),सोनीका कौशीक,शिरीन इराणी,निलेश निमकर,तन्वीर हसन(बंगलोर), प्रोबल दासगुप्ता इत्यादी मान्यवरांनी विचार मांडले.
NCF 2005 व RTE कायदा यावर चर्चा झाली. बोलीभाषा प्रमाणभाषा यावर चर्चा झाली.रमेश पानसे सरांनी बालकांचे भाषाशिक्षणातील अडचणीचा उहापोह केला.तन्वीर हसन यांनी विकीपिडीया बद्दल छान माहीती दिली.मी तयार केलेला बोलीभाषा प्रमाणभाषा शब्दकोष विकीपीडीयावर टाकावा असे मला सांगीतले.विकीकाॅमन्स,विक्सनरी,विकीबुक्स ही माहीती पाहून वाटले....खरचं हा एक मुक्त ज्ञानकोष आहे. चंद्रकांत पुरी यांनी भटक्या जमातीतील शिक्षणाचे वास्तव समोर आणले.फारूख काझी यांनी शाळेतील मुलांच्या लेखनातुन संवादभाषा व माध्यमभाषा हा विषय छान मांडला.मीही सक्रीय सहभाग नोंदवला....
विनयाताई व विद्यापीठातील भाषाविज्ञान विभागाचे प्रमुख अविनाश पांडे यांनी छान नियोजन केले होते.वैशालीताईनी मुलांच्या मुल्यमापनाची नवीन पद्दती मांडली.
आजपर्यत पुस्तकात वाचलेल्या लोकांशी संवाद साधता आला.वेच्या,फारूख अशी जिवलग मित्र भेटले..........

Thursday 12 March 2015

फारूख काझी

फारूक काझी म्हणजे.....

मुळातच एक चळवळ्या माणूस. चौकटीतलं जगणं झुगारणारा. स्वछंदीपणानं आयुष्य जगणारा. लहानपणी शाळेचं वेळापत्रक याला मानावायचं नाही. इयत्ता पहिली ते तिसरी हा पठ्ठ्या शाळेत जायचा ते केवळ परीक्षेसाठी. पुढे चौथ्या वर्गात गेल्यावर सिद्धेश्वर झाडबुके नावाचे हाडाचे शिक्षक भेटले. त्यांनी शाळेच्या वेळेत उनाडक्या करत हिंडणा-या या महाशयांना शाळेची गोडी लावली. झाडबुके गुरुजींच्या व्यक्तीमत्त्वाचा पुढे इतका मोठा प्रभाव पडला की, फारुकनं तिथंच (चौथीत असताना) शिक्षक व्हायचं ठरवून टाकलं. पुढे झालंही त्याच्या मनासारखं. आज शिक्षक मित्रांना विचारलं तर नाईलाज होता...परिस्थितीच तशी होती... म्हणून शिक्षक झालो, असेही म्हणतील कदाचित. आज एखादी संधी मिळाल्यास बाहेर पडायला अनेकजण उत्सुक आहेत! त्याला कारणंही तशीचं आहेत. पण सांगायचं हे की, फारूक मात्र वाट चुकलेला नाहीये. तो ठरवून शिक्षक झालाय, आणि पुढेही शिक्षकच राहणार आहे.सांगोला (जि.सोलापूर) तालुक्यातल्या अनकढाळ गावातल्या शाळेत तो शिकवतो. नोकरीत आल्याला अजून दहा वर्षंही पूर्ण झालेली नाहीत. पण भरपूर मोठा अनुभव फारुकच्या पाठीशी आहे. आपल्याकडं असं आहे की, जो वयाने वाढत जातो. त्याला ‘अनुभवी’ म्हटलं जातं. पण फारुकच्या अनुभवाला धडपडीतून आलेली यशाची रुपेरी किनार आहे. शाळेत कार्यरत असताना सतत वाचन, नवीन काही समजून घेणं, नवनवीन प्रयोग करून पाहणं असं याचं आपलं सुरु असतं. सुरुवातीला परिस्थिती अनुकूल नव्हतीच. अनुकूलतेच्या दिशेनं वारे वाहू लागतील. मग आपण काहीतरी करायला लागू, अशी वाट पाहात हा स्वस्थ बसला नाही.भाषा शिक्षणाबाबतचा एक निराळा दृष्टिकोन त्याच्याकडे आहे. मुलांना भाषेशी खेळू द्यायचं. सतत काहीतरी ऐकवायचं, खूप-खूप बोलू द्यायचं, मग वाचणं-लिहिणं. वाचन करताना शाळेतल्या पुस्तकांत मुलं रमत नाहीत, असं लक्षात आलं. मुलांना अवांतर वाचनासाठी पुस्तकं उपलब्ध करून देण्याचं ठरवलं. त्यासाठी एक नामी शक्कल लढवली. गावातल्या प्राथमिक शाळेतशिकणा-या मुलांपासून कॉलेजात जाणा-या मुलांपर्यत प्रत्येकानं (शिक्षकानंदेखील) जमतील तितके पैसे जमवायचे आणि त्यातून वाचनालयाला पुस्तकं घेऊन द्यायची. गाव जेमतेम दीड हजार लोकवस्तीचं. गावात ‘आपलं वाचनालय’ सुरु झालं. शाळेच्या पटावर मुलं ४५. सुरुवातीला २०-२५ पुस्तकांवर सुरु झालेल्या वाचनालयात आजमितीस २५०च्या वर पुस्तकं जमलीत. भारत ज्ञान-विज्ञान समुदाय, पुणे येथील गरवारे बालभवन यांनी आणखी काही पुस्तकं भेट दिलीत. गावातल्या मुलांनीच वाचनालय चालवलंय. प्राथमिक शाळेपासून कॉलेजकुमारांपर्यंत आणि गृहिणी-पालक अशा सगळ्यांना वाचनालयाचा ‘लाभ’ मिळतोय. मुलांची मासिकं सुरु केली. मुलं आवडीनं वाचू लागली. पुस्तकांवर गप्पा, चर्चा, टीका असं सगळं मुलं अनुभवत होती. आणि यातून भाषा शिक्षण सुरु होतं आणि आजही आहे. या वातावरणाचा खुबीनं वापर करीत सगळ्या गावक-यांना ‘एक गाव एक गणपती’साठी या काझी सरांनी राजी केलं! गाव शाळेत आणि शाळा गावात नेली!वाचता-वाचता मुलांना लेखनाकडे वळविण्यासाठी ‘रानफूल’ नावाचं हस्तलिखित सुरु केलं. मुलांना स्वत:च्या भाषेत लिहिण्याची मुभा दिली. मुलं लिहिती झाली. ‘जीवन शिक्षण’ मासिकात याबाबत लेख आला. कौतुक झालं. त्यातून सरांना आणखीन हुरूप आला. गेल्या नऊ वर्षांपासून या ‘रानफुला’चा सुगंध दरवळतोय! आता मुलं स्वतः चित्रकथा तयार करतात. कविता करतात. अनुभव, प्रसंग लिहितात. पुस्तकं हाताळणं-वाचणं ते स्वतःच पुस्तकं बनविणं हा देखणा प्रवास मुलांच्या दृष्टीनं किती मजेशीर आणि आनंददायी असणार!पुस्तकातल्या धडे-कविता शिकविणा-या अनेक शाळा आजही आहेत. पण निरनिराळ्या गोष्टींकडं चिकित्सकपणे पहायला शिकविणारी फारुक सरांची शाळा आहे. व्यसनाधीनतेविषयी बोलायचं होतं खरं. पण त्याची सुरुवात केली शाळेच्या परिसरातल्या कच-यापासून! कचरा गोळा करायचा. झाडाची पानं, कागद, गुटख्याच्या पुड्या, काड्या असं त्यातील घटकांचं वर्गीकरण केले. त्याचे निष्कर्ष गावातल्या चावडीवरच्या फळ्यावर लावण्यात आले. त्याची गावात मोठी चर्चा झाली. गुटख्याच्या पुड्या पडायच्या बंद झाल्याने शालेय परिसर गुटखामुक्त झाला. एक छोटंसं सर्वेक्षणही झालं. व्यसनांमुळं आरोग्यावर कोणते घातक परिणाम होतात, हेही मुलांपर्यंत पोचलं.हे झालं गाव आणि शाळेतलं. शिक्षकांची केंद्र संमेलने म्हणजे एक कंटाळवाणा प्रकार असतो. शिक्षकांना तर ती शिक्षाच वाटत असते. संमेलने अधिकाधिक सृजनशील कशी होतील, यासाठी फारूक आणि मित्रमंडळीचा प्रयत्न असतो. एकनाथ गुरव या धडपडणा-या शिक्षकाची त्यासाठी मोठी मदत होते. शिक्षकांकडून प्रश्नावली भरून घेऊन त्यांना नेमके काय हवे? त्याचा शोध घेतला. गायन, अभिनय, चित्रवर्णन यासह निरनिराळ्या स्पर्धा, शैक्षणिक साहित्य निर्मिती, नाट्यभिनय कार्यशाळा असे खूप सारे उपक्रम राबविले जाताहेत. त्यातून शिक्षक समृद्ध होताहेत.हे सगळं करतानाच जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या समविचारी शिक्षकांना सोबत घेऊन ‘अंकुर’ नावाचा गट तयार केला. सांगोला येथील माता-बालक उत्कर्ष प्रतिष्ठान आणि ‘अंकुर’च्या संयुक्त विद्यमाने भाषा, गणित अध्यापन कसं करावं? याबाबत कार्यशाळा घेतल्या. शिक्षणतज्ज्ञ लीलाताई पाटील नेहमीच गटातल्या शिक्षकांच्या धडपडीचं कौतुक करताना त्यांना मार्गदर्शन करीत असतात. उपक्रमशील शाळांना भेटी देणं, शिक्षणातले नवे प्रवाह समजून घेणं, पुस्तकं वाचणं, त्यावर चर्चा करणं असं काहीना काही सतत सुरूच असतं. गटातल्या शिक्षकांनी भाषा विषय निवडून बारीकसारीक गोष्टींचा विचार करीत त्यावर वर्षभर काम केलं. ठराविक दिवसांनी भेटणं, चर्चा करणं, अनुभव शेअर करणं असं सुरु होतं. वादही व्हायचे. पण त्यातूनच ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ यासारखं गीत शिकवायला या गटातल्या शिक्षकांनी सपशेल नकार दिला!“हे ‘धाडस’ आलं कुठुन?” फारुकला एकदा विचारलं. तो म्हणाला “गटातील सर्व शिक्षकांनी खूप चिकित्सक पद्धतीनं भाषेच्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास केलाय. आमचं असं मत झालं की, हे गाणं शिकवायला काही औचित्यच नाहीये. आम्ही केवळ गाणं शिकवायला नकार दिला नाही, तर पुरकपाठ, वाचनपाठ तयार केले, कविता रचल्या. त्या शिकवल्या. केवळ विरोध न करता निराळ्या वाटेनं चालण्याचं बळ आणि दिशा ‘अंकुर’नंच आम्हा सगळ्यांना दाखलीय.” तीन वर्षापूर्वी शिक्षण हक्क कायदा आला नव्हता. तेव्हा गटातल्या शिक्षकांनी शिक्षण अधिका-यांकडे प्रश्नपत्रिका बनविण्याची परवानगी मागितली होती. कारण हेच होतं की, नेहमीच्या सरकारी प्रश्नपत्रिकांत मुलांना स्वतःचे विचार व्यक्त करायला जागाच नाही. ‘घोका आणि ओका’ हेच यातून होतं. बस्स. तेव्हा ती परवानगी मिळाली नव्हती. आता कायद्यानंच सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची संकल्पना स्वीकारल्यानंतर ती आपोआप मिळालीय. शिक्षकांच्या समृद्धीसाठी ‘अंकुर’सारख्या गटांचे महत्त्व मोठे आहे.सामाजिक सामीलकी मानणा-या ‘अंकुर’मधल्या शिक्षक मित्रांनी आणखीन एक ‘जरा हटके’ उपक्रम राबवला. सातवीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या ग्रामीण भागातील, गरीब-होतकरू २० मुला-मुलींना अभ्यासाव्यतिरिक्त काही तरी वेगळं, पोषक देण्यासाठी मुक्त विद्या केंद्र सुरु केलं. ज्या शिक्षकात जे कौशल्य आहे, त्याने ते फावल्या वेळात मुलांशी शेअर करायचे. संगीत, संगणक, बाहुलीनाट्य, खेळ, वाचन असं बरचं काय काय सुरु होतं. याखेरीज कला, कार्यानुभव, बागकाम, श्रमदान, एका खेळात प्रावीण्य मिळवणं, मूक्त अभिव्यक्ती, सुसंगतपणे विचार मांडणे, क्षेत्र भेटी यातून मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचं काम शिक्षकांनी केलं. ‘अंकुर’ आणि माता-बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या परस्पर सहकार्यातून सांगोल्यात वर्षभर हा उपक्रम सुरु होता. अर्थात हे सामुहिक काम असलं तरी केंद्राचा कार्यकारी प्रमुख म्हणून फारूक सरांनीच काम पाहिलं. शिक्षकांवर आज टीका होतेय की, यांच्याकडे सामाजिक बांधीलकी नाही, हे आत्मकेंद्रित झालेत. या टीकेला राज्यातील ठीकठीकाणचे शिक्षकांचे गट, मंच कोणताही गाजावाजा न करता कृतीतून असं चोख उत्तर देताहेत. ‘अंकुर’ त्याचं एक बोलकं, मूर्तिमंत उदाहरण आहे, इतकंच.रविवार लोकसत्ताच्या ‘बालरंग’मधून फारुकनं मुलांसाठी कथालेखन केलेय. अध्यापनाच्या अनुभवांवर आधारित ‘आनंदवन’ ही लेखमाला शिक्षणवेध मासिकात प्रसिद्ध झालीय. ‘साप्ताहिक साधना’मध्ये ‘प्रिय अब्बू’ लेखमाला प्रसिद्ध झाली आहे. याशिवाय ‘पहिली ते चौथीच्या भाषा विषयाच्या पाठ्यपुस्तकांचा स्रीवादी दृष्टिकोनातून अभ्यास’ या विषयावर फारुक संशोधन करतोय. बाहेरच्या देशात शिक्षण क्षेत्रात झालेली संशोधनं एक तर शिक्षकांनी किंवा शिक्षणात कामकरणा-यांनी केलीत. आपल्याकडे तळातला अनुभव घेणारा शिक्षक खूप समृद्ध असतो. पण ते काही लिहीताना दिसत नाहीत. त्यांनंच लिहितं व्हावं, अशी फारुकची मनोमन इच्छा आहे. लीलाताई पाटलांची पुस्तकं झपाटल्यासारखी वाचल्यावर स्वत:मधल्या वेगळ्या शिक्षकाची ओळख फारुकला झाली. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन शिक्षण पंढरीचा वारकरी झालेला फारूक काझीसारखा शिक्षक शिक्षण क्षेत्रात चांगलं काही घडावं, यासाठी मनोभावे काम करतो आहे. तन-मन-धनाने. म्हणतात ना धडपड करणा-यालाच यश साथ देतं. ते खरंच आहे. नवीन काही निर्माण करण्यासाठी स्वप्नं पाहावी लागतात आणि ते वास्तवात आणण्यासाठी झटावंदेखील लागतं. तेच तर फारूक करतोय. एक बाकी खरं. जमीन सुपीक करण्यासाठी केवळ मशागत करून उपयोगाचे नाही. प्रत्येक दाण्यानं गाडून घेण्याची तयारी ठेवावी लागते. अंकुरण्यासाठी. तशी तयारी सगळ्यांनीच दाखवायली तर ‘अंकुर’चा ‘संसर्ग’ सगळीकडे होईल. फारुकनं ती दाखवली. म्हणून तर ‘चौकटीत’ राहून ‘चौकटीबाहेरचं’ काम तो करू शकला. ही तर केवळ सुरुवात आहे. अजून या नव निर्माणच्या शिलेदाराला बरेच अंतर चालायचे आहे.असते

....भाऊ चासकर atf वरून साभार

फारुक चं शिकण्याच्या वाटेवरचं आनंदवन जरुर वाचा.