Saturday 25 April 2015

ज्ञानरचनावादी शिक्षण

ज्ञानरचनावादी शिक्षण

23 एप्रील रोजी भूमच्या शिक्षण विभागाची टीम सातारा येथील प्रयोगशील शिक्षणविस्तार अधिकारी प्रतिभा भराडे यांच्या बीटमधील शाळा पाहण्यासाठी गेली होती.शाळेतील प्रयोग पाहत असताना आम्ही सर्वजण ज्ञानरचनावादाचा अनुभव घेत होतो.आमच्या सोबतच पुरंदरच्या गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार व कळमनुरीचे गटशिक्षणाधिकारी विठ्ठलराव भुसारी हेही होते.इथ खुप काही शिकता आल.मा.तृप्ती अंधारे गटशिक्षणाधिकारी भूम यांनी या अभ्यासदौ-याचं छान नियोजन केलेल होत.आम्ही तिन ग्रुप करून वेगवेगळ्या शाळा पाहिल्या नंतर पं.स.सातारा येथे एकत्र बसून आमचे अनुभव शेअर केले.
★प्रतिभा भराडे यांनी सांगीतल की ज्ञानरचनावाद म्हणजे मुलांना शिकवायचं काहीही नाही पण शिकण्यासाठी वातावरण तयार करायच.
★ पहिलीतुन दुसरीत जाणारी मुल 50 छोटी छोटी पुस्तकं वाचतात.
★ मुलांच भाषाशिक्षण रचनावादामुळ नैसर्गीक पद्धतीन घडतं.
★मुल छोटशी नाटुकली,संवाद अभिनय करतात. दुसरीची मुल गोष्टी रचतात.शब्दसंग्रह करतात.
★ मुलं स्वत: वाचायला शिकतात.त्याच्या अनुभवविश्वातील चित्र पाहून वाचन करायला शिकतात.
★ अभिव्यक्तीसाठी शब्दांचा डोंगर हा उपक्रम खासच वाटला
★हार्डबोर्ड व व्हेलवेट पेपरपासून भिंतीलगत केलेले अभिव्यक्ती फलक अफलातून होते.
★आयुष्यात व्यवहारात जगता आल पाहिजे.त्यासाठी मुलं गणित व्यवहारातून शिकतात.
★ वर्गात स्वत: मुलांनी बनवलेली स्वयंअध्यन कार्ड होती.खुप सारं साहित्य व्यवस्थित ठेवलेल होत.मुल ते हाताळत होती.
★नागेश वाईकर या हिंगोलीहून आलेल्या मित्रानं मुलाना विज्ञानखेळणी दिली.त्यातील विज्ञानतत्व मुलांनी शोधल
★प्रतिभा ताईनी सांगीतलं की मुलांच्या मेंदुला आव्हानं लागतात.त्यासाठी मुलांना खुप सारं साहित्य द्यावी लागतात.
★1)दिवस नवा,विचार नवा,  नविन शब्द रोजच हवा.
2) मालिका शास्त्रज्ञांची
3) विज्ञान रांगोळी हे उपक्रम खुपच आवडले.
★ मसाला माती व अमृत पाणी तयार करण्याची रीत मुलांनी सांगीतली.त्यामुळच शाळेच्या परसबागा मानानं डोलताना दिसल्या.
★साठेवाडीची शाळा तर बिनघंटीची व बिनवेळापत्रकाची शाळा....मुलं शिकत होती नैसर्गीक पद्धतीनं....बालस्नेही वातावरणात....अगदी पहिलीच्या मुलांनी सुंदर नाटीका सादर केली. मला त्या दोन शिक्षीकेची धडपड पाहून सिल्व्हीया वाॅर्नर या स्विझर्लड मधील प्रयोगशील शिक्षीकेची आठवण आली.अगदी तसचं काम यांनी उभ केल होत....रचनावादी पद्धतीन....
★ प्रतिभाताई रचनावादाबद्दल खूप सांगत होत्या.तसा रचनावादी शिक्षण आम्ही समजून घेत होतो.
माझा वर्ग रचनावादी करण्यासाठी साहित्याची जमवाजमव सुरू केलीय.   
या अभ्यासदौ-यासाठी आमच्या भूमच्या टीम मध्ये प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी मा.तृप्ती अंधारे, शिक्षणविस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख सहभागी झालेले होते.

Tuesday 21 April 2015

मुलांची ग्रामीण बोली समजून घेताना......

मुलांना मी बैलगाडीच्या वेगवेगळ्या भागाची नाले शोधून आणण्यास सांगीतले होते.पुर्वी खेड्यात बैलगाडीच प्रमुख वाहतुकीचं साधन होतं.पण आज बैलगाडीही दिसेनाशी झाली; मग काय तिच्याशी संबंधित शब्दही लुप्त होण्याची भिती वाटते.
माय मराठीतील ग्रामीण शब्दसंपत्तीची ओळख मुलांना व्हावी म्हणून हा खटाटोप....
बैलगाडीच्या विविध भागाची नावे शोधण्यास सांगीतली .मुलांनी शोधून  पुढील नावे मला दाखवली .......

दांड,दांड्या,डोबांळ, खिळा, जोती, ढकली, आरा,पुठ्ठे,धाव,कुनी,आंबवण,आट्या,आख,आखरी,साठी,पाटली,घोडकं,फळ्या,तरशी,बुट,एटण,खुटले,गज,गाडवण,वंगण,बैलजोडी,कासरा,कराळ्या

★ मराठी भाषेतील हे शब्द भाषेचं सौदर्य वाढवतात.त्यामुळे मुलांना अशा शब्दांची ओळख करून द्यायला हवी.
★ मुलांनी स्वत: अशा शब्दांचा कोष बनवावा.

Sunday 19 April 2015

                                                   तंत्र शिक्षणाची नवी पहाट

            १८ एप्रिल रोजी तंत्रास्नेही शिक्षकांची सहविचार सभा विद्यापरीषद येथे संपन्न झाली. या सहविचार सभेसाठी सबंध महाराष्ट्रातून तंत्रस्नेही शिक्षक आलेले होते. IIT मुंबई, MKCL व इतर काही कंपन्यांचे प्रतिनिधी या सभेसाठी उपस्थित होते. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव मा. नंदकुमार साहेब , आयुक्त शिक्षण भापकर साहेब , शिक्षण संचालक जरग साहेब यांनी यावेळी मार्गदर्शन केले. 
            मा.जरग साहेबांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मा. नंदकुमार साहेबांनी MOTIVATION बद्दल खूप  छान उदाहरनासह चर्चा केली. TECH SAVVY TEACHERS या  WhatsApp वरील ग्रुप मधून सर्व तंत्रस्नेही शिक्षक कशा पद्धतीने एकत्र आले याबद्दल सांगितले. महाराष्ट्रातील सर्व शाळा २०२० पर्यंत डिजिटल स्कूल व सर्व  TECH SAVVY कसे बनतील यासाठी आराखडा बनवण्याविषयी चर्चा झाली. संदीप गुंड या शिक्षकाने केलेली पास्टेपाडा हि शाळा डिजिटल कशी बनवली व संदीप ची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात अशा पद्धतीचे काम सुरु झालेले आहे याबद्दल सांगितले. 
             यानंतर तंत्रस्नेही शिक्षकांनी महाराष्ट्राच्या डिजिटल स्कूल च्या व्हिजन बद्दल सादरीकरण केले. 
  1. अनिल सोनुने- अनिल सोनवणे यांनी शिक्षकांची पाच गटात विभागणी केली व प्रत्येक गटाची उद्दिष्टे व कार्यपद्धती या बद्दल PPT च्या सहाय्याने माहिती दिली. ते गट पुढील प्रमाणे.
1.      प्रोत्साहन
2.      शिक्षक गुणवत्ता
3.      प्रशासकीय व्यवस्थापन
4.      विद्यार्थ्यांसाठी सहज सोपी तंत्रासाधने
5.      विनामूल्य अथवा कमीत कमी खर्चात संसाधने
2.      बालाजी जाधव – बालाजी जाधव यांनी शिक्षकांनी USER न होता creator व्हा असा सल्ला दिला. स्वतःच्या बेब साईट विषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले कि व्हिडीओ निर्मिती कौशल्य आत्मसात करायला हवे. त्यांनी स्वतः १३० व्हिडीओ बनवल्या आहेत.
3.      सुरेश भारती – पहिलीपासून माहिती तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनात करण्यात यावा त्यासाठी पाठ्यक्रम बनविला जावा. ICT ची परीक्षा व्हावी. कार्यानुभव या विषयातील माहिती तंत्रज्ञान हा विषय अनिवार्य असावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
4.      संदीप गुंड – संदीप गुंड यांनी स्वतःच्या शाळेचा व्हिडिओ दाखवला. त्यांच्या डिजिटल स्कुल विषयी PPT च्या सह्हायाने माहिती सांगितली. डिजिटल स्कूल मध्ये interactive learning चे महत्व सांगितले. त्यांच्या शाळेतील मुले स्वतः TAB कसा हाताळतात, मुल स्वतः स्वतः च्या TAB च्या सह्हायाने मूल्यमापन कसे करतात हे सांगितले. मुलांच्या घरीही TAB द्वारे अभ्यास करण्यासाठी TAB TV ला जोडण्याची सोय करण्यात आलेली आहे.
अशा पद्धतीने समाज सहभागातून शाळेचा तांत्रिक विकास कसा केला व आदिवासी पाड्यावर तंत्रशिक्षणाची नवी पाहत कशी उगवली याबद्दल अनमोल मार्गदर्शन केले.
5.      सावंत साहेब – MKCL चे व्यवस्थापकीय संचालक यांनी बालभारतीच्या पुस्तकांना स्टीकर चिटकवले जावेत. पुस्तकात video, audio, multimedia content तेथे जोडला जावा असे सांगितले.
पुस्तक आणि वडिलांचा मोबाईल फोन यामुळे एकत्र येईल. पुस्तकं आकर्षक होतील त्यामुळे मुलांचा गळतीचा प्रश्न मिटेल. यामुळे ज्ञानराचानावादी शिक्षण मुलांना मिळेल. शिक्षण वेध व जडण घडण या मासिकात ई शिक्षणाच्या संदर्भातील लेख ते लिहित आहेत याबद्दल सांगितले.
6.      रणजीत देसले – यांनी शिक्षक पालक गट कसा तयार केला व त्यातून गुणवत्ता विकासास कशी मदत झाली याविषयी अनुभव कथन केले.
7.      प्रा. भुतडा सर – यांनी बनवलेल्या वेगवेगळ्या software ची माहिती दिली व त्यांची उपयुक्तता सांगितली.
8.      सुनील आलोरकर – त्यांच्या z.p.guruji.com या वेब साईट विषयी माहिती सांगितली. या वेब साईट वर असलेल्या वेगवेगळ्या मार्गदर्शक व्हिडिओ शिक्षकांना दाखवले व याद्वारे शिक्षक स्वतः तंत्रास्नेही होऊ शकतात हे सांगितले.
9.      सोमनाथ वाळके – यांनी आपल्या शाळेत मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रेकॉर्डिंग स्टुडीओ तयार केला आहे. विविध software चा उपयोग करून गुणवत्ता विकास साधला जावा हे सांगितले.
10.  राम सलगुडे – यांनी स्वतः च्या ब्लॉग द्वारे पेपर लेस स्कूल कसे केले याबद्दल सांगितले.
अशा बऱ्याच तंत्रस्नेही शिक्षकांनी सादरीकरण केले, व्हिडिओ दाखवले. मा. नंदकुमार साहेबांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. भाऊसाहेब चासकर यांनी सुंदर संचलन केले.
मा. भापकर साहेब (आयुक्त शिक्षण) यांनी तंत्रास्नेही शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षकांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. डिजिटल स्कूल करण्यासाठी शिक्षकांना संपूर्ण सहकार्य केले जाईल असे सांगितले.
मा. जरग साहेबांनी सर्व तंत्रास्नेही शिक्षकांनी जीवन शिक्षण साठी आपण राबवत असलेल्या प्रयोगाबद्दल लेख पाठवावे असे आवाहन केले. तंत्राशिक्षानाबद्दल जीवनशिक्षण व्हा स्वतंत्र अंक काढला जाईल असे सांगितले.
प्रशांत कऱ्हाडे, संतोष भोंबळे यांनी TECH SAVVY TEACHERS या WhatsApp ग्रुप च्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व तंत्रास्नेही शिक्षकांना एकत्र आणण्याचे काम केले. त्यामुळेच तंत्रशिक्षणाची वाटचाल वेगाने सुरु झाली.
आजच्या सहविचार सभेतून एक नवीन उर्जा घेऊन प्रत्येक जन जात होता. ONLINE भेटणारा मित्र आज OFFLINE भेटल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. नंदकुमार साहेबांची प्रेरणा घेऊन अहोरात्र परिश्रम करणारे तंत्रस्नेही शिक्षकांनी आपापली कौशल्य येथे SHARE केले. मगर साहेबांनी छान मार्गदर्शन केले. विद्यापरीषदेने या सहविचार सभेचे उत्कृष्ट नियोजन केले होते.

   





Monday 13 April 2015

मुलांची मैत्री समजून घेताना....

    मुलांची मैत्री समजून घेताना.....

इ.4 थी.च्या वर्गात द्वितीय सत्राच्या इंग्रजी विषयाची तोंडी परीक्षा घेत होतो.मी एक मुलांना प्रश्न विचारला होता.
What is your friend's name?
मुलं फक्त मुलांचीच व मुली मुलींचीच नावे सांगत होती.
माझ्या ही बाब लक्षात आली.
मुलींना विचारल,‘ तुम्हाला मित्र नाहीत का?'
( मुली आश्चर्यान हसल्या....)
मुलांना विचारलं,‘ तुम्हाला मित्र नाहीत का?‘
( मुलही संकोच करत हसत होती)
मी मुलांना सांगू लागलो...........
त्यांच ऐकू लागलो.................
मित्र.....मैत्रीबद्दल...........
संकटात उपयोगी पडणारा,मदत करणारा किंवा मदत करणारी मित्र किंवा मैत्रिण असू शकते.शाळेत तुम्ही सर्वजण किती एकमेकांना मदत करता.
कुणाला पेन, पेन्सील नसेल तर देता.खेळताना एकमेकांची काळजी घेता.सतत तुम्ही एकमेकांना समजून घेत असतात.असं कोण समजून घेतो तर मित्र किंवा मैत्रिणच ना?
ऋषिकेश म्हणतो.........
  ‘ आम्हाला मित्रमैत्रिनींचा अर्थच माहीत नव्हता.....‘
  मयुरी म्हणते,........
" सर तुम्हाला मित्र आहेत का?"
       "हो...खुप आहेत“
" सर तुम्हाला मैत्रिणी आहेत का?“
     "हो....आहेत"  
सरांना पण मित्रमैत्रिणी आहेत.हे समजल्यावर मुलांच्या मनातील कुतूहल संपल.त्यांना सांगीतल मी पण तुमचा मित्रच आहे.
मी तुम्हाला मार्गदर्शन,मदत करतो.तुम्हाला समजून घेतो...आहे ना मग मित्र?
   " हो..सर..हो...सर.."
मुलांनो तुमची आईसुद्धा तुमची मैत्रिण असते.( मुलांना आश्चर्य वाटत) तुमचे वडील,आजोबा सुद्धा मित्र असू शकतात.
मुलं आता समजू लागली...मैत्रीबद्दल....
मुलांच्या मनातील संकोचाची जळमट दूर करून त्यांची मैत्री समजून घ्यावी लागेल....क्षणाक्षणाला....

Saturday 11 April 2015

कौतुक सोहळा

कौतुक सोहळा

माझी विद्यार्थीनी वैष्णवी महादेव भोसले हीचा भारतीय प्रज्ञा शोध परिक्षेत उस्मानाबाद जिल्ह्यात चौथा क्रमांक आला.त्याबद्दल शाळेत आज सत्कार सोहळा संपन्न झाला.
वैष्णवी भोसले हीचा गुणगौरव कार्यक्रमातून इतर सर्व मुलांना खुप प्रेरणा मिळाली.तिची एक मैत्रीण सिद्धी माझ्याकडे आली व म्हणाली," सर,मला तिला पेन बक्षीस द्यायचाय". काही मुलं तिला बागेतील फुलं देत होती.सर्व मुलांमध्ये चैतन्य पसरलं होत.
तिच्या या कौतुकसोहळ्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व  सदस्य हजर होते. तिचा मार्गदर्शक म्हणून मलाही खुप आनंद झाला होता.
वैष्णवी खुपच समजदार,तल्लख बुद्धीची मुलगी.....तिच्या यशानं इतरांना प्रेरणा मिळाली....अध्यक्षांनी तिला 100 रू बक्षीस दिले.

Wednesday 8 April 2015

ATF शिक्षकांची कार्यशाळा— भूम

   प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी
मा. तृप्ती अंधारे यांनी कार्यशाळा आयोजीत केली होती.त्यांनीच लिहलेला वृतांत..........

आज आम्ही ATF शिक्षकांची कार्यशाळा व जून महिन्याचे शैक्षणिक नियोजन यासाठी एकत्र आलो होतोत.
ATF मधील सर्व सदस्यांना समोरासमोर भेटणे
सर्व शिक्षकांना ATF वरील सहभागावर बोलते करणे
तालुक्याच्या ATF ची कार्यपध्दती सर्वानुमते ठरविणे
सर्वानी सक्रिय सहभागी होवून आपले शैक्षणिक 
उपक्रम, अध्ययन-अध्यापन, यांची सकस चर्चा करणे व शेअरिंग करणे
अधिकारी व शिक्षक यांच्यातील दरी कमी करून मिळून काम करणे बाबत प्रोत्साहित करणे
शिक्षकांना लिहतं करणे
शिक्षकांना बोलतं करणे
याचबरोबर, पुढील वर्षीच्या शैक्षणिक उपक्रमाचे, कार्यपध्दतीचे ही नियोजन करण्यात आले
विषयनिहाय शिक्षकांचे गट तयार करणे. (गणित, इंग्रजी, विज्ञान)
या शिक्षकांमार्फत तालुक्यातील वरील विषयांतील संपादणूक पातळी वाढविणे
प्रवेशपात्र मुलांची प्रवेशप्रक्रिया एप्रिल मधेच सुरू करणे.
गुणवत्तेच्या वेगवेगळ्या पैलूवर चर्चा करून जून मधे त्या सर्व पैलूवर काम करणेबाबत चर्चा झाली
सकारात्मक आणि प्रेरणादायी प्रर्यवेक्षण करणे
शै. साहित्य निर्मीती
दर महिन्याच्या तिस-या शनिवारी सर्वानी भेटून कार्यान्वित उपक्रमांवर चर्चा करणेबाबत सर्वानुमते निर्णय झाला
एप्रिल मधे परिक्षेनंतर मुलांना शाळेत उपस्थित ठेवून त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम, चित्रपट महोत्सव, कला, संगित, विविध रंजनपर खेळ घेणेबाबत चर्चा झाली
पालकांचे मोबाईलवर ग्रुप करून संवाद साधणे, संपर्कात राहणे
केंद्रपातळीवर शिक्षक- केंद्रप्रमुखांचे ग्रुप करणे व त्यांचा प्रभावी वापर शै. गुणवत्तेसाठी करणे
एम- प्रशासनाचा अधिक प्रभावी वापर करणे
   

ATF ची कार्यपध्दती मुद्दामहून सर्व शिक्षकांना सांगितली.ATF कशासाठी हे ही यावेळी सांगितल.
आजच्या मिटींग मूळे अनेक अबोल शिक्षक बोलते झाले.. सर्वानी अतिशय मनमोकळी चर्चा केली.आणि शैक्षणिक गुणवत्तेचा संकल्प केला. यावेळी 'उबंटू' अर्थात I Am Bcoz We Are ही संकल्पना सर्व शिक्षकांना सांगितली.ती त्यांना आवडली ही..
आजच्या मिटींग मूळे जो थोडा फार संकोच शिक्षकांमधे होता तो गळून गेला.
सर्वजण खूप उत्साही वाटले. सर्व शिक्षक- केंप्र- शिविअ- साधनव्यक्ती उपस्थित होते