Monday 26 December 2016

अभिनंदन

अभिनंदन   अभिनंदन  अभिनंदन   अभिनंदन
-------------------------------------------------------------------

मराठी विषयाच्या राज्य अभ्यास मंडळाचे विद्यमान अध्यक्ष,  साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक
मा.नामदेव चं. कांबळे यांची नुकतीच नॅशनल बुक ट्रस्टच्या (NBT ) सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आपले मनापासून  अभिनंदन....

सर, आपल्या सहवासात राहून खूप काही शिकायला मिळत आहे.माझ्या समृद्धिचा प्रवास, तुमच्यासोबत समृद्ध होत आहे.

Friday 23 December 2016

जे का रंजले गांजले .......

नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड या संस्थेला आर्थिक मदत करण्यासाठी आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी गटागटाने गावातील लोकांकडून मदत जमा केली.

किती उत्साहाने मुले या उपक्रमात सहभागी झाली होती! एक रूपया ते दहा रूपये अशी प्रत्येकाकडून घेतले होते.

समानुभूती,सहानुभूति अशा जीवनकौशल्यांचा विकास अशा उपक्रमातून आपसूकच होत असतो.

मी ही शाळेत असताना असे पैसे जमा करायचो, तेव्हा पंचविस पैसे, पन्नास पैसे, एक रूपया असे लोक देत असत.

Sunday 11 December 2016

चला भाषा शिकूया. .......

चला भाषा शिकूया ..........
-------------------------------------------------------------------
मला विविध भाषा शिकायला आवडतात. काही वर्षे मी नांदेडच्या सीमावर्ती भागात शिक्षक म्हणून काम केले. तेथे तेलगू बोलली जायची.त्या भागातील विविध भाषांच्या मिश्रणातून तयार झालेली बोली मी शिकलो.
पण तेलगू शिकायचं राहून गेलं याची आजही खंत वाटते.

परवा पाठ्यपुस्तक समिक्षणासाठी आलेल्या कन्नड माध्यमाच्या शाळेतील मित्रांने माझं नाव कन्नड मध्ये काढून दिलं. याच मला खुप कौतुक वाटलं.
कन्नड शिकायची इच्छा व्यक्त केल्यावर त्या मित्राने नक्की मदत करू असं सांगितलं.

Sunday 4 December 2016

लेख

*ज्ञानाची सहनिर्मिती*

शनिवार, 3 डिसेंबर 2016 रोजीच्या *दैनिक लोकसत्ता* च्या चतुरंग पुरवणीतील  *ज्ञानाची सहनिर्मिती* हा लेख नक्की वाचावा.
📌 ज्ञानरचनावाद
📌 झिरो लेक्चर प्रोजेक्ट
📌 फ्लिपिंग द क्लास रूम

याबद्दल खुप महत्वाची माहिती मिळते.

www.loksatta.com

Monday 21 November 2016

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार

●राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार●
   काही क्षणचित्रे
    अविस्मरणीय अनुभव, आठवणी..

---------------------------------------------------------------------------

Tuesday 15 November 2016

माझं पुस्तक

 बालदिनानिमित्त मुलांच्या सृजनात्मक लेखनाच्या उपक्रमाची बातमी दैनिक दिव्य मराठी या लोकप्रिय दैनिकात प्रकाशीत केल्याबद्दल दिव्य मराठी वर्तमान पत्राचे मनापासून धन्यवाद.

मुलांच्या भाषा समृद्धिसाठी, स्व-अभिव्यक्ती कौशल्याचा विकास व्हावा यासाठी मी प्रयत्नशील असतो. सतत विविध नवोपक्रम राबवत असतो. त्यामुळे मुले आता छान सृजनात्मक लेखन करू लागली आहेत.

माझ्या वर्गातील वैष्णवी भोसले या विद्यार्थींनीने खुप कविता तयार केल्या आहेत. लवकरच या बालकवियीत्रीचा  कवितासंग्रह प्रकाशीत करण्याचा मानस आहे.

Sunday 13 November 2016

पर्यावरण संमेलन

🌴पर्यावरण संमेलन🌴
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

  स्थळ - राळेगणसिद्धी
  दिनांक - 11 व 12 नोव्हेंबर 2016

राळेगणसिद्धी येथे 11 व 12 नोव्हेंबर 2016 रोजी पर्यावरण संमेलन संपन्न झाले. या संमेलनात महाराष्ट्रील प्रयोगशील शिक्षक, पर्यावरण प्रेमी, पर्यावरणाचे अभ्यासक सहभागी झाले होते. या संमेलनाचे उद्घाटन संमेलनाचे अध्यक्ष मा.पद्मभूषण आण्णा हजारे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मा.वाय.बी.सोनटक्के, सहसंचालक महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ, मा.दिनकर टेमकर, शिक्षण उपसंचालक पुणे,मा.आबासाहेब मोरे, अध्यक्ष निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, मा.बी.एन.शिंदे, जेष्ठ हवामान तज्ञ व इतर मान्यवर उपस्थित होते.

    ■पहिला दिवस■

🌳 मा.वाय.बी.सोनटक्के यांचे *जलप्रदूषण व नियंत्रण*या विषयावर व्याख्यान झाले.खुप अभ्यासपूर्ण व सांख्यिकी आकडेवारीसह पर्यावरणाच्या होणाऱ्या -हासाबद्दल माहिती दिली.
🌳 पर्यावरण कायद्याची संपूर्ण माहिती दिली. प्रदूषणाचे तोटे सांगून त्यावर काय काय उपाययोजना करता येतील याबद्दल चर्चा केली.

🌳 शिक्षकांनी विचारलेल्या पर्यावरणासंबंधी प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली.

🎄 यानंतर जालन्यातील *रोटी फाऊंडेशन* बद्दल फाऊंडेशन चालवणा-यांनी माहिती सांगितली. हे फाऊंडेशन गरिब लोकांपर्यंत कार्यक्रमातील शिल्लक अन्न पोहचते. एका एका घासासाठी गरिब लोक अन्नाची वाट बघत असतात. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या ताटातील अन्न वाया जाऊ देवू नये. असा मौलिक सल्ला दिला.

🌳 दुपारच्या सत्रात जेष्ठ हवामान तज्ञ मा.प्रा.बी.एन.शिदें यांचे *पर्जन्यमान वाढवता येईल*या विषयावर व्याख्यान झाले.
📌 सरांनी पर्यावरणाच्या अभ्यासासाठी जगभर भ्रमंती केली. इस्त्राइलमधील शेतीपद्धतीची सुंदर माहिती दिली.
📌 *शाश्वत शेतीतून पर्जन्याचे नियमन*या विषयावर उदाहरणे देऊन  मार्गदर्शन केले.
📌 महाराष्ट्रात जास्तीत जास्त *वृक्षपिके* घ्यावीत याबद्दल भौगोलिक कारणे देऊन वृक्षपिकांचे महत्त्व सांगीतले.
📌 जगातील समुद्रकाठची शहरे पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यासाठी पर्यावरण संवर्धन, संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
            ■दुसरा दिवस■

📌सकाळी पर्यावरणीय कवितांचे कविसंमेलन झाले.

       🌲 *शिवारफेरी* 🌲
गटागटाने शिवारफेरी काढण्यात आली. माथा ते पायथा या पाणलोट विकासाच्या संकल्पनेतुन गावातील पाणी गावातच फिरवलं आहे. त्यामुळे माळरानावर हिरवळ फुलली आहे. गावातील जलसंधारणाची नाविन्यपूर्ण कामे पहायला मिळाली.
यामुळेच चारशे - पाचशे मि.मी.पाऊस पडणारं गाव आज समृद्ध व स्वावलंबी झालं आहे.

शिवारफेरीत गावातील व्यक्ति गाईड बनून माहिती देत होता. हिरव्यागार वनराईने नटलेल्या राळेगणसिद्धीची शिवारफेरी म्हणजे अविस्मरणीय अनुभव होता. आदरणीय आण्णांनी भौगोलिक, आर्थिक, सामाजिक परिवर्तन करून गावाचा कायापालट करून टाकला आहे.

राळेगणसिद्धी ऑडियो विज्युवल मिडीया सेंटर पाहताना आदरणीय आण्णांनी केलेले काम पाहताना आम्ही स्वतःला विसरून गेलो होतो.
आदरणीय आण्णांचे *माझं गाव माझ तीर्थ* हे पुस्तक त्या ठिकाणी मिळाले.हे पुस्तक खुप जणांनी विकत घेतले.

पाणलोट क्षेत्र विकास, पाण्याचे योग्य नियोजन, सामूहिक विवाह, आरोग्य शिक्षण, धान्य बॅक,महिलांचा सहभाग, व्यसनाचा त्याग या अशा अनेक ग्रामविकासाशी निगडीत उपक्रमामुळेच राळेगणसिद्धी *ग्रामविकासाची पंढरी* झाले आहे.

●आदरणीय आण्णांशी संवाद●

शिवारफेरीनंतर राज्याच्या कानाकोप-यातुन आलेल्या शिक्षकांशी संवाद साधला. आदरणीय आण्णांचे विचार कानात प्राण आणून प्रत्येकजण ऐकत होता.

🌿 यानंतर डॉ. माधव गाडगीळ यांचे *जैवविविधता दस्तावेज* या विषयावर व्याख्यान झाले. चर्चा झाली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक समाधान शिकेतोड व उमेश खोसे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या संमेलनात खुप काही शिकायला मिळाले. पर्यावरण संरक्षणाच्या जाणीवजागृतीसाठी शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत.उपस्थितांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

                               समाधान शिकेतोड जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री ता.भूम जि. उस्मानाबाद

Thursday 22 September 2016

शिक्षण परिषद

●केंद्रस्तरीय शिक्षण परिषद●
                          केंद्र - भूम
                          दि.21 सप्टेंबर  2016

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र  कार्यक्रमाच्या प्रभाविपणे अंमलबजावणी करण्यासाठी भूम केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद  भूम येथे घेण्यात आली.
*स्वतःचा  वर्ग व शाळा  100% प्रगत करणाऱ्या शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचे सादरीकरण, संपूर्ण केंद्र शाळाबाह्य विद्यार्थी विरहीत करणे, वाचन कार्यक्रम,भाषा व गणित विषयासाठी विविध उपक्रम, मुलांची शाळेत  100 % उपस्थिती* इत्यादी विषयांवर परिषदेत चर्चा,सादरीकरण झाले.

  📌 शिक्षण विस्तार अधिकारी मा.अरविंद सरोदे यांनी प्रस्तावित केले. समूहसाधन केंद्रस्तरीय शिक्षण परिषद आयोजनाचे महत्त्व सांगितले.दि.1सप्टेबरच्या शासन परिपत्रकाबद्द्ल माहीती सांगीतली.
  प्रत्येक मुल शिकावं यासाठी वर्गानुसार विविध भाषिक  उपक्रम राबविण्यात यावेत.
केंद्रातील 100 % शाळा प्रगत व्हाव्यात यासाठी कृतीकार्यक्रम व आराखडा आखण्यात आला.

📌 साधनव्यक्ती योगीराज आमगे यांनी प्रक्रिया अहवालावर चर्चा केली. केंद्रातील 15 प्रगत  शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.
📌 मुलांची नियमित उपस्थिती, वाचन कार्यक्रम यावर चर्चा झाली.

📌 समाधान शिकेतोड यांनी प्रगत शाळेसाठी असणाऱ्या निकषांवर चर्चा केली. प्रत्येक मुलं शिकावं,भाषिक दृष्टीने समृद्ध व्हावे. यासाठी वर्गानुसार विविध भाषिक खेळ, शब्दकोडी उपक्रम यांचे सादरीकरण केले.
स्वतःचा वर्ग, शाळा प्रगत करतानाच्या अनुभवांचे, शाळेतील उपक्रमांचे सादरीकरण केले. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबविले, त्यांना समजून घेऊन प्रगत कसे केले ही यशोगाथा सांगीतली.

●मा.शिक्षणाधिकारी साहेब यांचे मार्गदर्शन●
   *प्रयोगशील शिक्षणाधिकारी मा.सचिन जगताप साहेब यांनी भ्रमणध्वनीवरून शिक्षण परिषदेतील शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.*

    📌 संकलित मूल्यमापन, शिष्यवृत्ती परीक्षा यावर चर्चा झाली.
        
                         समाधान शिकेतोड
                 जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री ता.भूम

Thursday 25 August 2016

लोकसहभागातून समृद्धिकडे

लोकसहभागातून समृद्धिकडे
---------------------------------------------
📌 लोकसहभागातून शाळा डिजीटल /ई-लर्निंग केली.
📌 लोकसहभागातून शाळेत 1000 स्क्वेअर फूट शालेय बाग तयार केली.
📌 लोकसहभागातून ज्ञानरचनावादी साहित्य/वर्ग तयार केले.
📌लोकसहभागातून हॅडवाॅशस्टेशन तयार केले.
📌 लोकसहभागातून ग्रंथालय समृद्ध होत आहे.
📌 लोकसहभागातून शाळेची रंगरंगोटी केली जात आहे.

*गावाला शाळेचा अभिमान असावा, शाळेला गावाचा आधार असावा*

            जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री
           ता.भूम जि.उस्मानाबाद

Monday 22 August 2016

शाळा सिद्धी

विषय - शाळासिध्दी 

शाळास्तरावरील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी करावयाची कार्यवाही

1.      सर्व प्रथम शाळांची मानके व मूल्यमापनाकरिता शाळा सिध्दी या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात शासन निर्णय शैगुवि/2016/(12/2016)/एसडी-6 दिनांक 30 मार्च, 2016 चे काळजीपूर्वक वाचन करावे.

2.      “शालासिध्दी” संदर्भातील  school Evaluation या  Dashboard ( दर्शक फलक ) वर केंद्र शासनाच्याwww.nuepa.org,www.nuepa.eduplan.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध माहितीचे वाचन करण्यात यावे.

3.      शाळा माहिती व दर्शक फलक (Dashboard) नुसार आपल्या शाळेची माहिती सात मुख्य क्षेत्र व 45 उपक्षेत्रानुसार तयार करण्यात यावी.शाळेची वस्तूनिष्ठ स्वरुपाची माहिती, नाविन्यपूर्ण उपक्रम माहिती तयार करुन ठेवावी. या माहिती बरोबरच माहितीची पुष्टी देणारे पुरावे , फोटो, चित्रफिती, रजिष्टर, अभिलेखे तयार करण्यात यावे.

4.      शाळा – UDISE CODE युडायस कोडचा वापर करुन शाळेचा पासवर्ड असलेला लॉग इन आय डी (Login ID) शाळा तयार करु शकते. यासाठी शाळेने LOGIN ID म्हणून शाळेचा UDISE कोड टाकावा. शाळेचे gmail खात्याचा समावेश करावा. पासवर्ड शाळेनेच निवडून तो टाकावा. त्यानंतर हाच पासवर्ड जतन करावा व प्रत्येक लॉग इन च्या वेळी वापरावा.आपल्या शाळेचे खाते अशाप्रकारे उघडून शाळा स्वयं मूल्यमापन विषयक सर्व माहिती भरावी व save करावी. काही बदल नसल्यास final submit करावी. Final submit केल्यानंतरच सदरची माहिती इतरांना दिसेल याची नोंद घ्यावी.

5.      शाळेची माहिती व बाह्यमूल्यमापनाची तयारी पूर्ण झाल्यावर शाळेने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे कडे शाळा बाह्य मूल्यमापन व समृध्दशाळा प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर 1 महिण्याच्या आत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे कडून शाळा बाह्य मूल्यमापन निर्धारकांकडून करण्यात येईल. निर्धारणाच्या वेळी शालेय माहितीशी संबंधित सर्व माहिती, पुरावे व अभिलेखे निर्धारकांना उपलब्ध करुन देणे शाळांना बंधनकारक आहे.

6.      बाह्य मूल्यमापन झाल्यानंतर संबंधित शाळा ही समृध्द शाळा निकष पुर्तता करीत असल्यास नियोजित तारखांना शाळेचे प्रमाणपत्र “समृध्दशाळा – 2016” अर्थात“SS- 2016”वितरीत केले जातील.

7.      शाळा सिध्दी- समृध्दशाळा या विषयाशी संबंधित पत्र व्यवहारासाठीdir.mscert@gmail.com वshalasiddhimaha@gmail.com या मेल ॲड्रेस चा वापर करावा.

8. सर्व माहिती भरुन झाल्यावर खालील लिंक मध्ये देखील माहिती भरण्यात यावी. 

            http://goo.gl/forms/omIiwWETqXTBvlw73

असेसर साठी लिंक

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSebZa-t_v7b5PDnHuzWa7mJGTZbiIqmQntpsQ9JkGjxcfXIYg/viewform?c=0&w=1

Thursday 11 August 2016

उपक्रम

उपक्रम
  जुलै 2016 च्या किशोर मासीकामध्ये आलेल्या  पाऊस आला पाऊस आला या कवितेतील पाच कडवी मुलांना ऐकवली.

  आता उद्या येताना त्यापुढील एक कडवे स्वतः तयार करून आणायला सांगितले.

आज चौथीच्या मुलांनी त्यापुढील एक कडवे खुपच छान लिहून आणले होते.

  मस्तच वाटलं. ....

   हा उपक्रम राबवून पहा
अनुभव  शेयर करा.
🙏

Wednesday 10 August 2016

सहविचार सभा

● सहविचार सभा ●

                 दिनांक - 7 जुलै 2016

मराठी भाषा व महाराष्ट्राची संस्कृति यांचे संरक्षण ,संवर्धन व संगोपन व्हावे या हेतूने महाराष्ट्र शासनाने राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना 1992 साली केली.

      *मा. मुख्यमंत्री या संस्थेचे पद्धसिद्ध अध्यक्ष असून मा. शालेय शिक्षण मंत्री पद्धसिद्ध उपाध्यक्ष आहेत.*

  *मराठीचा विकास - महाराष्ट्राचा विकास* हे बोधवाक्य संस्थेचे आहे. यानुसार संस्था मराठी भाषेच्या समृद्धिसाठी, अभिवृद्धिसाठी अनेक नाविन्यपुर्ण उपक्रम, प्रकल्प महाराष्ट्रभर  राबवते.

महाराष्ट्रातील मराठी भाषेचे जाणकार ,तज्ञ,मराठी भाषेच्या समृद्धिसाठी रचनात्मक काम करणा-या भाषाप्रेमीची सहविचार सभा *राज्य मराठी विकास संस्थेने* पुणे येथे आयोजित केली होती.

या सभेत मला माझे विचार, कल्पना, भाषिक उपक्रम मांडण्याची संधी मिळाली. भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्थेतील अधिका-यांसोबत संवाद साधला.

📌 मार्गदर्शक
   ● मा. अपर्णा गावडे
(उपसचिव मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन )
● मा. आनंद काटीकर
( संचालक, राज्य मराठी विकास संस्था )
● मा. विनय मावळणकर
( मा.मंत्री भाषा विभाग यांचे विशेष कार्याधिकारी )
● मा. रेणू दांडेकर  (शिक्षण तज्ञ )
● मा. वर्षा सहस्त्रबुद्धे 
(शिक्षण तज्ञ )
या मान्यवरांनी सहविचार सभेतील उपस्थितांना मार्गदर्शन केले.

  ☆मा. वर्षा सहस्त्रबुद्धे☆
समाजातला प्रत्येकजण भाषाशिक्षक असतो. संपूर्ण समाजच भाषाशिक्षक असतो.
अंकुरणारी साक्षरता -
ख-याखु-या संदर्भाने भाषेचा वापर होतो. अवतीभवतीची माणसं लिहताना, वाचताना दिसली तर मुलं सक्ती न करताही लिहतील,वाचतील.
  "मुलांची भाषा आणि शिक्षण" या कृष्णकुमार यांच्या पुस्तकातील सुंदर उदाहरणे दिली. त्यांनी या पुस्तकाचा स्वतः अनुवाद केला आहे.
  
   ☆मा . रेणू दांडेकर ☆
पाठ्यपुस्तक, बोलीभाषा, भाषिक उपक्रम याविषयी चर्चा केली.
मुलांच्या भाषिक समृद्धिसाठी *"अनुभव मंडल"*सारखे उपक्रम राबविण्यात यावेत. मुलांना व्यक्त होण्यासाठी,सृजनशील विचार करण्याची संधी द्यावी.

📌 *भाषा आॅलंपियाड* मध्ये आपल्या देशाला कास्य पदक मिळवून देणार्‍या बारावीत शिकणाऱ्या *अलोक साठे* याने ऑलंपियाडचा प्रेरणादायी प्रवास सांगीतला. महाराष्ट्रातील मुलांनी ही परीक्षा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी द्यावी ही अपेक्षा व्यक्त केली.
आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येत असल्याचे सांगितले.
📌 मा.आनंद काटीकर संचालक यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. विविध उपक्रमांची माहिती दिली.

📌 राज्याच्या कानाकोप-यातुन आलेल्या सर्व भाषा प्रेमीनी विविध उपक्रमावर चर्चा केली.

राज्य मराठी संस्थेच्या अधिक माहितीसाठी
https://rmvs.maharashtra.gov.in

या सहविचार सभेला उपस्थित राहून खुप काही शिकायला मिळाले. समृद्ध होता आले.

                            समाधान शिकेतोड

Saturday 30 July 2016

शाळा भेट

● मुलांमध्ये रमले शिक्षणाधिकारी ●

    जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री ता.भूम जि.उस्मानाबाद या शाळेला आज दि. 30 जुलै रोजी प्रयोगशील शिक्षणाधिकारी मा.सचिन जगताप यांनी भेट दिली.

  📌 शाळेतील मुलांनी सादर केलेल्या परिपाठाचे त्यांनी कौतुक केले.

📌 प्रश्नमंजुषा या उपक्रमाचे कौतुक करून महिन्याअखेर विजेते झालेल्या मुलांना लगेच त्यांनी स्वतः छान पेन बक्षीस दिले.
मुले खुश झाली.

📌 यश तळेकर या पहिलीच्या विद्यार्थ्यांने छान गोष्ट सांगितली.

📌 मुलांच्या सृजनशील विचाराला चालना मिळावी म्हणून शाळेतील प्रत्येक वर्गात असलेल्याला स्वअभिव्यक्ती फलकाववरील मुलांचे लेखन पाहून कौतुक केले.

   मुलांचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन घेण्याचा मनोदय व्यक्त केला.

📌 साहेबांनी विद्यार्थ्यांशी मस्त गप्पा मारल्या. मुलांनाही खुपच आनंद झाला होता.

  📌 भारतीय प्रज्ञाशोध परिक्षेत जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला .

   📌  शालेय बाग, शाळेतील ज्ञानरचनावादी वर्गरचना, शैक्षणिक साहित्य पाहून समाधान व्यक्त केले.

  📌 किशोर मासीकामधील कवितेचे  वैष्णवी भोसले हीने छान वाचन केले.

   साहेबांच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले. सर्व शिक्षकांना प्रेरणा मिळाली.

                          समाधान शिकेतोड
                        जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री
                       ता.भूम जि.उस्मानाबाद