Monday 25 January 2016

ज्ञानी मी होणार

● उपक्रम - ज्ञानी मी होणार●
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧

आज जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री ता.भूम जि.उस्मानाबाद येथे इयत्ता दुसरी,तिसरी, चौथी च्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली.

सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने परिक्षा दिली.प्रत्येक वर्गातुन प्रथम, द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर  बक्षिसे दिली जातात.

शाळेच्या दर्शनी भागातील फलकावर दररोज सामान्य ज्ञानाचे दोन प्रश्न लिहले जातात.विद्यार्थी ते लिहून घेतात.परिपाठात ते प्रश्न विचारतात . काही प्रश्नांच्या उत्तरासाठी नविन पुस्तके वाचतात.

📌  यामुळे मुले वर्तमानपत्राचे वाचन करतात.
📌चालू घडामोडी समजून घेतात.
📌 भविष्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी होते.
📌स्पर्धा परिक्षांबद्दलची आवड निर्माण होते.
📌 अवांतर वाचनाची गोडी लागते.
📌  मुले चिकित्सक विचार करतात.