Saturday 28 May 2016

बालचित्रवाणी

बालचित्रवाणी
-------------------------------------------
*प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम*  *2012* नुसार

   इयत्ता सहावीच्या  मराठी व हिंदी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांसाठी होणाऱ्या
मराठी विषयाच्या
*सुलभभारती  व उर्दू, कन्नड, गुजराथी, तेलगू, सिंधी माध्यमांच्या शाळांतील शिक्षकांसाठी  सुगमभारती*
  च्या प्रशिक्षणासाठी काल बालचित्रवाणीमध्ये आमचे शुटिंग झाले.

Monday 16 May 2016

माझ्या समृद्धिचा प्रवास

माझ्या समृद्धिचा प्रवास
------------------------------------------------------------------
कृतीशील शिक्षक महाराष्ट्र  (ATM ) च्या संमेलनासाठी महाराष्ट्रातील कृतीशील शिक्षक सहभागी झाले होते.संमेलनातुन खुप काही नवीन शिकता आले. हे संमेलन दिनांक  14 व 15 मे रोजी संपन्न झाले.

"शैक्षणिक गुणवत्तेत शिक्षकांचे स्वसक्षमीकरण"

या चर्चासत्रात सहभागी प्रयोगशील शिक्षक अजय घोडके, सोमनाथ वाळके, समाधान शिकेतोड, रणजितसिंह डिसले, संजय खाडे.

ATM शिक्षण संमेलन कोकमठाण शिर्डी

Monday 9 May 2016

आभार. . . . . . . .

नमस्कार,

परवा 6 मे ला वाढदिवसाच्या शुभेच्छांचा पाऊस पडला अन् चिंब झालो.
फेसबुक, WhatsApp, मॅसेज, फोन काॅल याद्वारे खूप शुभेच्छा मिळाल्या.

प्रयोगशील शिक्षक, प्रयोगशील अधिकारी, साहित्यिक,विचारवंत, पत्रकार मित्र या सर्वांच्या शुभेच्छा वाचून उर्जा मिळाली.
गेली बारा वर्षे शिक्षणक्षेत्रात काम करत असताना खूप समृद्ध माणसांचा सहवास लाभला अन् मीही समृद्ध होत गेलो. नवनवीन शिकत गेलो. माणसं जोडत गेलो.

विद्यार्थी हाच माझा "श्वास" आहे.हा श्वास असेपर्यंत  समर्पित भावनेने प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांच्या  हितासाठी अविरतपणे झटत राहील. यासाठी प्रेरणा, उर्जा मिळते तुम्हा सर्वांकडून. .......

    तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो.

                               समाधान शिकेतोड

● ज्ञानरचनावाद कार्यशाळा ●

●ज्ञानरचनावाद  कार्यशाळा ●

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या प्रभाविपणे अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने  दिनांक 4 व 5 मे या कालावधीत "ज्ञानरचनावाद " या विषयावर कार्यशाळा  आयोजित केली आहे.

या कार्यशाळेचे उदघाटन  ठाणे म.न.पा च्या शिक्षणाधिकारी मा. उर्मिला पारधे यांनी केले.
याप्रसंगी म.न.पा.तील शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.

आज पहिला टप्प्यात महानगरपालिकेच्या  250 शिक्षकांची कार्यशाळा संपन्न झाली.

📌सोमनाथ वाळके - मुल समजून घेताना
    
📌समाधान शिकेतोड  -  भाषाशिक्षणातील ज्ञानरचनावाद 

📌 प्रमोद धुर्वे - गणितातील ज्ञानरचनावाद

📌  सोमनाथ वाळके यांनी  "मुल समजून घेताना " हा विषय खुप छान समजून दिला. जीवनव्यवहारातील उदाहरणे देऊन खुमासदार शैलीत विषय सांगितला. आपल्या ओघवत्या शैलीत मुल कसं समजून घ्यायचं हे सांगीतले.
शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

"माह्या सरांची गाडी " या त्यांच्या स्वतःच्या अनुभवातील कथा सांगून शिक्षकांना विचारप्रवण केले.

📌समाधान शिकेतोड यांनी " भाषाशिक्षणातील ज्ञानरचनावाद " या विषयावर शिक्षकांशी संवाद साधला. ज्ञानरचनावादाबद्दल मार्गदर्शन केले. मुले भाषिक दृष्टीने समृद्ध व्हावीत यासाठी नाविन्यपुर्ण उपक्रम,प्रकल्प कसे राबवावेत. याबद्दल चर्चा केली.

ज्ञानरचनावादी अध्ययन-अध्यापन करताना आंतरक्रिया कशी घडते यावर सर्वांनी चर्चा केली. माझा शब्दकोश, हस्तलिखित तयार करणे, मुलांसाठी कविता लेखन कार्यशाळा घेणे, मुलांच्या भाषिक कौशल्यांचा विकास व्हावा यासाठी भाषा प्रयोगशाळा तयार करणे याबद्दल सांगितले. स्वतःच्या शाळेतील विविध उपक्रम,नवोपक्रम, भाषिक खेळ यांचा परिचय करून दिला.

📌प्रमोद धुर्वे यांनी गणित विषयातील रचनावाद या विषयावर मार्गदर्शन केले. स्वतःच्या शाळेतील गणितातील रचनावादी उपक्रम सांगीतले. विविध रचनावादी शैक्षणिक साहित्य कसे तयार करावे व वापरावे याबद्दल सांगितले.

📌 शेवटी सोमनाथ वाळके यांनी शिक्षकांच्या प्रश्नांचे शंका समाधान केले.
कार्यशाळा खूप छान झाली.

                                      शब्दांकन
                                 समाधान शिकेतोड