Thursday 25 August 2016

लोकसहभागातून समृद्धिकडे

लोकसहभागातून समृद्धिकडे
---------------------------------------------
📌 लोकसहभागातून शाळा डिजीटल /ई-लर्निंग केली.
📌 लोकसहभागातून शाळेत 1000 स्क्वेअर फूट शालेय बाग तयार केली.
📌 लोकसहभागातून ज्ञानरचनावादी साहित्य/वर्ग तयार केले.
📌लोकसहभागातून हॅडवाॅशस्टेशन तयार केले.
📌 लोकसहभागातून ग्रंथालय समृद्ध होत आहे.
📌 लोकसहभागातून शाळेची रंगरंगोटी केली जात आहे.

*गावाला शाळेचा अभिमान असावा, शाळेला गावाचा आधार असावा*

            जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री
           ता.भूम जि.उस्मानाबाद

Monday 22 August 2016

शाळा सिद्धी

विषय - शाळासिध्दी 

शाळास्तरावरील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी करावयाची कार्यवाही

1.      सर्व प्रथम शाळांची मानके व मूल्यमापनाकरिता शाळा सिध्दी या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात शासन निर्णय शैगुवि/2016/(12/2016)/एसडी-6 दिनांक 30 मार्च, 2016 चे काळजीपूर्वक वाचन करावे.

2.      “शालासिध्दी” संदर्भातील  school Evaluation या  Dashboard ( दर्शक फलक ) वर केंद्र शासनाच्याwww.nuepa.org,www.nuepa.eduplan.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध माहितीचे वाचन करण्यात यावे.

3.      शाळा माहिती व दर्शक फलक (Dashboard) नुसार आपल्या शाळेची माहिती सात मुख्य क्षेत्र व 45 उपक्षेत्रानुसार तयार करण्यात यावी.शाळेची वस्तूनिष्ठ स्वरुपाची माहिती, नाविन्यपूर्ण उपक्रम माहिती तयार करुन ठेवावी. या माहिती बरोबरच माहितीची पुष्टी देणारे पुरावे , फोटो, चित्रफिती, रजिष्टर, अभिलेखे तयार करण्यात यावे.

4.      शाळा – UDISE CODE युडायस कोडचा वापर करुन शाळेचा पासवर्ड असलेला लॉग इन आय डी (Login ID) शाळा तयार करु शकते. यासाठी शाळेने LOGIN ID म्हणून शाळेचा UDISE कोड टाकावा. शाळेचे gmail खात्याचा समावेश करावा. पासवर्ड शाळेनेच निवडून तो टाकावा. त्यानंतर हाच पासवर्ड जतन करावा व प्रत्येक लॉग इन च्या वेळी वापरावा.आपल्या शाळेचे खाते अशाप्रकारे उघडून शाळा स्वयं मूल्यमापन विषयक सर्व माहिती भरावी व save करावी. काही बदल नसल्यास final submit करावी. Final submit केल्यानंतरच सदरची माहिती इतरांना दिसेल याची नोंद घ्यावी.

5.      शाळेची माहिती व बाह्यमूल्यमापनाची तयारी पूर्ण झाल्यावर शाळेने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे कडे शाळा बाह्य मूल्यमापन व समृध्दशाळा प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर 1 महिण्याच्या आत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे कडून शाळा बाह्य मूल्यमापन निर्धारकांकडून करण्यात येईल. निर्धारणाच्या वेळी शालेय माहितीशी संबंधित सर्व माहिती, पुरावे व अभिलेखे निर्धारकांना उपलब्ध करुन देणे शाळांना बंधनकारक आहे.

6.      बाह्य मूल्यमापन झाल्यानंतर संबंधित शाळा ही समृध्द शाळा निकष पुर्तता करीत असल्यास नियोजित तारखांना शाळेचे प्रमाणपत्र “समृध्दशाळा – 2016” अर्थात“SS- 2016”वितरीत केले जातील.

7.      शाळा सिध्दी- समृध्दशाळा या विषयाशी संबंधित पत्र व्यवहारासाठीdir.mscert@gmail.com वshalasiddhimaha@gmail.com या मेल ॲड्रेस चा वापर करावा.

8. सर्व माहिती भरुन झाल्यावर खालील लिंक मध्ये देखील माहिती भरण्यात यावी. 

            http://goo.gl/forms/omIiwWETqXTBvlw73

असेसर साठी लिंक

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSebZa-t_v7b5PDnHuzWa7mJGTZbiIqmQntpsQ9JkGjxcfXIYg/viewform?c=0&w=1

Thursday 11 August 2016

उपक्रम

उपक्रम
  जुलै 2016 च्या किशोर मासीकामध्ये आलेल्या  पाऊस आला पाऊस आला या कवितेतील पाच कडवी मुलांना ऐकवली.

  आता उद्या येताना त्यापुढील एक कडवे स्वतः तयार करून आणायला सांगितले.

आज चौथीच्या मुलांनी त्यापुढील एक कडवे खुपच छान लिहून आणले होते.

  मस्तच वाटलं. ....

   हा उपक्रम राबवून पहा
अनुभव  शेयर करा.
🙏

Wednesday 10 August 2016

सहविचार सभा

● सहविचार सभा ●

                 दिनांक - 7 जुलै 2016

मराठी भाषा व महाराष्ट्राची संस्कृति यांचे संरक्षण ,संवर्धन व संगोपन व्हावे या हेतूने महाराष्ट्र शासनाने राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना 1992 साली केली.

      *मा. मुख्यमंत्री या संस्थेचे पद्धसिद्ध अध्यक्ष असून मा. शालेय शिक्षण मंत्री पद्धसिद्ध उपाध्यक्ष आहेत.*

  *मराठीचा विकास - महाराष्ट्राचा विकास* हे बोधवाक्य संस्थेचे आहे. यानुसार संस्था मराठी भाषेच्या समृद्धिसाठी, अभिवृद्धिसाठी अनेक नाविन्यपुर्ण उपक्रम, प्रकल्प महाराष्ट्रभर  राबवते.

महाराष्ट्रातील मराठी भाषेचे जाणकार ,तज्ञ,मराठी भाषेच्या समृद्धिसाठी रचनात्मक काम करणा-या भाषाप्रेमीची सहविचार सभा *राज्य मराठी विकास संस्थेने* पुणे येथे आयोजित केली होती.

या सभेत मला माझे विचार, कल्पना, भाषिक उपक्रम मांडण्याची संधी मिळाली. भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्थेतील अधिका-यांसोबत संवाद साधला.

📌 मार्गदर्शक
   ● मा. अपर्णा गावडे
(उपसचिव मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन )
● मा. आनंद काटीकर
( संचालक, राज्य मराठी विकास संस्था )
● मा. विनय मावळणकर
( मा.मंत्री भाषा विभाग यांचे विशेष कार्याधिकारी )
● मा. रेणू दांडेकर  (शिक्षण तज्ञ )
● मा. वर्षा सहस्त्रबुद्धे 
(शिक्षण तज्ञ )
या मान्यवरांनी सहविचार सभेतील उपस्थितांना मार्गदर्शन केले.

  ☆मा. वर्षा सहस्त्रबुद्धे☆
समाजातला प्रत्येकजण भाषाशिक्षक असतो. संपूर्ण समाजच भाषाशिक्षक असतो.
अंकुरणारी साक्षरता -
ख-याखु-या संदर्भाने भाषेचा वापर होतो. अवतीभवतीची माणसं लिहताना, वाचताना दिसली तर मुलं सक्ती न करताही लिहतील,वाचतील.
  "मुलांची भाषा आणि शिक्षण" या कृष्णकुमार यांच्या पुस्तकातील सुंदर उदाहरणे दिली. त्यांनी या पुस्तकाचा स्वतः अनुवाद केला आहे.
  
   ☆मा . रेणू दांडेकर ☆
पाठ्यपुस्तक, बोलीभाषा, भाषिक उपक्रम याविषयी चर्चा केली.
मुलांच्या भाषिक समृद्धिसाठी *"अनुभव मंडल"*सारखे उपक्रम राबविण्यात यावेत. मुलांना व्यक्त होण्यासाठी,सृजनशील विचार करण्याची संधी द्यावी.

📌 *भाषा आॅलंपियाड* मध्ये आपल्या देशाला कास्य पदक मिळवून देणार्‍या बारावीत शिकणाऱ्या *अलोक साठे* याने ऑलंपियाडचा प्रेरणादायी प्रवास सांगीतला. महाराष्ट्रातील मुलांनी ही परीक्षा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी द्यावी ही अपेक्षा व्यक्त केली.
आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येत असल्याचे सांगितले.
📌 मा.आनंद काटीकर संचालक यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. विविध उपक्रमांची माहिती दिली.

📌 राज्याच्या कानाकोप-यातुन आलेल्या सर्व भाषा प्रेमीनी विविध उपक्रमावर चर्चा केली.

राज्य मराठी संस्थेच्या अधिक माहितीसाठी
https://rmvs.maharashtra.gov.in

या सहविचार सभेला उपस्थित राहून खुप काही शिकायला मिळाले. समृद्ध होता आले.

                            समाधान शिकेतोड