Saturday 16 December 2017

मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम

*मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम आढावा बैठक*

आज उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुकास्तरावरील सुलभकांची आढावा बैठक DIECPD उस्मानाबाद येथे संपन्न झाली.

*उपस्थिती व मार्गदर्शन*

1)मा.नवनाथ धुमाळ
वरिष्ठ अधिव्याख्याता तथा मराठी विभाग प्रमुख
2)मा.नारायण मुदगलवाड
अधिव्याख्याता 
3) मा.सोमनाथ घोलप
शिक्षण विस्तार अधिकारी जि.प.उस्मानाबाद
3)श्री.समाधान शिकेतोड
    विषय सहायक (मराठी)

*सादरीकरण व चर्चा*
📌 आठ तालुक्यातील प्रत्येकी एक सुलभकाने पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाबाबत
सादरीकरण केले.
📌  पुढील टप्प्यातील प्रशिक्षणाचे नियोजन केले.प्रशिक्षणाची उद्दिष्टे,कृतीकार्यक्रम तयार करणे याबाबत चर्चा केली.
📌 पहिल्या टप्प्यातील सर्व तालुक्यातील प्रशिक्षणे दर्जेदार व उत्तम झाली.प्रशिक्षणार्थींनी तसा प्रतिसाद गुगल लिंक द्वारे नोंदविलेला आहे.

📌  शिक्षकांच्या वाचन शिकण्याच्या टप्प्याच्या संकल्पना या प्रशिक्षणातून स्पष्ट झाल्याबद्दल शिक्षकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

सर्वंच तालुकास्तरावरील सुलभक प्रचंड मेहनत घेवून समर्पित भावनेने जीव ओतून प्रशिक्षण घेत आहेत.या सर्व शिलेदारांचे मराठी विभाग DIECPD उस्मानाबाद कडून  अभिनंदन.......

समाधान शिकेतोड
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था उस्मानाबाद.

Sunday 10 December 2017

क्वेस्ट कार्यशाळा


भाषा शिक्षण च्या बाबतीत क्वेस्ट चा ऑनलाईन कोर्स करतोय....स्वतःला समृद्ध करतोय.तिसरे सत्र नुकतेच पुण्यात झाले.याबाबतचा आमच्या क्वेस्ट मधील मित्राने मांडलेला हा अहवाल......

ऑनलाईन भाषा कोर्सचे तिसरे संपर्क सत्र ३ आणि ४ डिसेंबर रोजी पुणे येथे झाले. भाषेतील ध्वनींची जाण वाढवणारे उपक्रम कसे घ्यावेत, मुलांना लिपी परिचय कसा करायचा याचा अभ्यास सहभागींनी केला. नीलेश निमकर सरांनी या क्षेत्रातील आपल्या २० पेक्षा जास्त वर्षांच्या अनुभवाआधारे याविषयाचे खूप चांगले विवेचन केले. ह्या चर्चेमध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात कोणती पद्धत वापरली जाते यावर चर्चा झाली. क्वेस्टने तयार केलेल्या व्हिडिओंच्या माध्यमातून सहभागींना प्रत्यक्ष वर्गात काय करावे याची स्पष्टता मिळाली.
याशिवाय सहभागींनी ‘प्रारंभीचे वाचन शिकवणे- महाराष्ट्रातील अनुभव’ या मॅक्सीन बर्नसन यांनी लिहिलेल्या लेखावर विस्तृत चर्चा केली. बालभारतीची स्थापना झाल्यापासून त्यांनी तयार केलेले पहिलीचे पुस्तक कशा पद्धतीने बदलत गेले याची परखड चिकित्सा मॅक्सिन मावशींनी या लेखात केली आहे.
महाराष्ट्रभर असलेल्या अनेक जाती-जमाती आणि त्यांच्या बोली भाषेतील वैविध्य यांचा वापर करून एकच पाठ्यपुस्तक संपूर्ण महाराष्ट्रासाठी बनवणं अगदी कठिण आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तक बनवण्याची क्रिया जिल्हानिहाय किंवा विभागनिहाय केली तरी ते साध्य होणं अवघड आहे पण इथे उपस्थित असलेल्या आणि हा कोर्स करत असलेल्या विषयतज्ज्ञांनी त्यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या मराठी विभाग प्रमुख सुजाता लोहकरे यांनी मांडले. (रिपोर्ट - विनय टांकसाळे)

Tuesday 5 December 2017

मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम प्रशिक्षण

मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम प्रशिक्षण
----------------------------------------------------------
दिनांक- 29 ते 30 नोव्हेंबर 2017
स्थळ- DIECPD उस्मानाबाद. 

इयत्ता पहिली ते पाचवीतील शंभर टक्के मुलांचा मूलभूत  वाचन क्षमता विकास प्रशिक्षणची तालुकास्तरीय सुलभकांची प्रशिक्षणपूर्व तयारी कार्यशाळा संपन्न होत आहे.

● मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट●
मा.अनुप शेंगुलवार
मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.उस्मानाबाद.
  मा.डाॅ.कलिमोद्दीन शेख
प्राचार्य DIECPD उस्मानाबाद.
मा.सचिन जगताप 
शिक्षणाधिकारी (प्रा.)जि.प.उस्मानाबाद. यांनी
प्रशिक्षणाला भेट दिली.

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. प्रेरणादायी व उर्जस्वल मार्गदर्शन केले.

    □ *प्रशिक्षणाची उद्दिष्टे*□
1) वाचन शिकण्याचे टप्पे व त्यासाठीची सुलभकांची भूमिका याबाबतच्या शिक्षकांच्या व पर्यवेक्षीय यंत्रणेतील व्यक्तींच्या संकल्पना स्पष्ट करणे.
2) इयत्ता पहिली ते पाचवीत  शिकणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मूलभूत वाचन क्षमतेचा विकास करण्यासाठी विद्यार्थीनिहाय कृतीकार्यक्रम तयार करण्याची शिक्षकांची क्षमता विकसित करणे.*

    ●राज्य सुलभक/ संवादक●
  1) मा.नवनाथ धुमाळ
       मराठी विभाग प्रमुख
   2) मा. नारायण मुदगलवाड
          अधिव्याख्याता
   3) श्री.समाधान शिकेतोड
          विषय सहायक
   4) श्री.किरण विभुते
       उपक्रमशील शिक्षक
      
दुपारच्या सत्रात मा.डाॅ. शेख साहेबांनी प्रशिक्षणाची उद्दिष्टे,समता ते मूलभूत वाचन,बहुभाषिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले.दिवसभराचा आढावा घेतला.

            समाधान शिकेतोड
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था उस्मानाबाद.

Check out @Samadhanshiketo’s Tweet: https://twitter.com/Samadhanshiketo/status/937745348306526208?s=09

Tuesday 31 October 2017

सहविचार सभा

आज उस्मानाबाद DIECPD येथे पायाभूत वाचन विकास कार्यक्रम प्रशिक्षण संदर्भात सहविचार सभा संपन्न झाली.

Wednesday 4 October 2017

●स्व-अभिव्यक्ती क्षमता विकसन कार्यशाळा●

●स्व-अभिव्यक्ती क्षमता विकसन कार्यशाळा●

स्थळ-  प्रशाला इंदापूर ता.वाशी
दिनांक- 3 नोव्हेंबर 2017

----------------------------------------------------------
                    संवादक
            समाधान शिकेतोड
विषय सहायक,DIECPD, उस्मानाबाद.
----------------------------------------------------------

   प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी,शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी इंदापूर केंद्रातील इयत्ता पाचवी,सहावी  मराठी विषय शिक्षकांची 
स्व-अभिव्यक्ती क्षमता विकास कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी मा.राहुल भट्टी, केंद्रप्रमुख मा.कुलकर्णी सर ,साधनव्यक्ती श्री.पांचाळ सर व श्री.रणदिवे सर उपस्थित होते.

📌  स्व-अभिव्यक्ती मध्ये विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येतात. कोणत्या टप्प्यावर मुलं व्यक्त होत नाहीत. शब्दावरून गोष्ट लिहिणे, चित्रावरून गोष्ट लिहिणे.अनुभव लेखन, प्रसंग पुर्ण करणे यामध्ये मुलांना कोणत्या अडचणी येतात. याबद्दल शिक्षकांशी चर्चा केली.
📌  स्व-अभिव्यक्ती  मध्ये अनुभव/अनुभूती , चिंतन/विचार किती महत्वाचे आहेत.यावरून अभिव्यक्ती क्षमता विकास होतो.हे संकल्पना चित्रावरून स्पष्ट केले.
📌 दिलेल्या शब्दावरून गोष्ट तयार करून लिहणे. या क्षमतेवर चर्चा केली. प्रत्येक मुलाला ही क्षमता प्राप्त होण्यासाठी टप्प्यानुसार विविध कृती कशा घ्यायच्या यावर चर्चा केली.

कृती-  माइंड मॅप,शब्द पहा-व्यक्त व्हा, वाचलेली गोष्ट लिहिणे, दोन शब्दावरून गोष्ट लिहिणे, तिन शब्दावरून गोष्ट लिहिणे.

📌  शब्दावरून गोष्ट लिहत असताना गोष्टीतील वाक्याचे सुसंगत लेखन करावे. यासाठी तार्कीक विचार करण्यासाठी काही कृती घेतल्या. यामुळे मुले सुसंगत लेखन करू शकतील. तार्कीक विचार करण्यासाठीच्या कृती आम्हाला मा.सुबिरजींच्या कार्यशाळेत शिकायला मिळाल्या होत्या. त्याचा उपयोग येथे झाला.

📌 अभिव्यक्ती  क्षमता विकसनासाठी मी पुर्वीच्या शाळेत केलेले रचनात्मक कामाचे अनुभव शिक्षकांशी शेअर केले.

या कार्यशाळेमुळे आम्हाला कामाची दिशा मिळाली. नवीन बाबी शिकायला मिळाल्या.अशा प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केल्या. 

" तुम्ही तर आमचंच काम सोपं केलं."

"  तुम्ही फिल्डवर हे काम केल्यामुळे मुलांच्या शिकण्यातील अडचणी माहित आहेत.यामुळे खुप छान आमच्या अडचणीचे समाधान झाले."

" अभिव्यक्ती क्षमता विकसीत करण्याचे टप्पे आम्हाला माहित झाले."

शिक्षकांच्या अशा प्रतिक्रिया ऐकून कार्यशाळा सार्थकी लागल्याचे समाधान वाटले. नक्कीच संकलित मुल्यमापनात या क्षमतेची या केंद्रातील विद्यार्थ्यांची  संपादणूक पातळी प्रभुत्व पातळीकडे जाईल.

📌  साधनव्यक्ती श्री.कृष्णा पांचाळ यांनी स्वतः बनवलेल्या शैक्षणिक साहित्य दाखवले. त्याचा उपयोग भाषिक कौशल्याचा विकास करण्यासाठी कसा करावा याचे मार्गदर्शन केले.

  उपक्रमशील केंद्रप्रमुख मा.कुलकर्णी सरांनी कार्यशाळचे छान नियोजन केले होते.

समाधान शिकेतोड
विषय सहायक
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था उस्मानाबाद.
सदस्य, राज्य अभ्यास मंडळ, पुणे.

Sunday 1 October 2017

मराठवाडा साहित्य परिषद

29 नोव्हेंबर रोजी यंशवंतराव सभागृह उस्मानाबाद येथे मराठवाडा साहित्य परिषदेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली.
अनेक साहित्यकांना ऐकता,भेटता आलं.

कविसंमेलन छान झालं.
नवीन पुस्तकांची खरेदी केली.

लेणी दर्शन

खुप दिवसापासून उस्मानाबादच्या लेणी पाहण्याची इच्छा होती. ती पुर्ण झाली. अप्रतिम लेणी पाहून मन तृप्त झाले. लेण्याच्या आजूबाजूचा परिसरही खुपच नयनरम्य होता. लेण्याच्या पश्चिमेकडचे तळे विलोभनीय दिसत होते. पुरातत्व विभागाची लेण्याची माहिती देणारा फलक अस्पष्ट दिसत होता.

अप्रतिम लेणी  पाहून मन सातव्या शतकात गेले. आपला हा ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेवा अमूल्य आहे. त्याची जपणूक सर्वांनीच करायला हवी. तिथल्या दगडावर रेघोट्या ओढून विद्रूप करू नये. हा civic Seance प्रत्येकाला आला पाहिजे.

Tuesday 26 September 2017

शाळा भेट

आज उस्मानाबाद शहरातील एका शाळेला भेट देऊन बहुभाषिक वर्गातील मुलांच्या अडचणी समजून घेतल्या. शिक्षक व विद्यार्थी त्यांच्याशी संवाद साधला.
पायाभूत वाचन क्षमता विकास
समजपूर्वक वाचन
अनुलेखन, श्रुतलेखन
स्व-अभिव्यक्ती
कृतीकार्यक्रम तयार करणे
अवांतर वाचन
भाषिक खेळ
अशा विविध विषयांवर  शिक्षकांना मार्गदर्शन केले.

Monday 25 September 2017

बोलीभाषा कार्यशाळा अमरावती

●बोलीभाषा कार्यशाळा●
स्थळ-विभागीय क्रिडा संकुल, अमरावती.
दिनांक- 21 व 22 सप्टेंबर 2017.

विद्याप्राधिकरण पुणे यांनी आदिवासी बोली 
असणा-या जिल्ह्याची बोलीभाषा कार्यशाळा अमरावती येथे आयोजित केली होती. पालघर, नाशिक, नंदूरबार, चंद्रपूर,गोंदिया, अकोला, धुळे, ठाणे, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यातील मा.प्राचार्य, मा.अधिव्याख्याता, विषय सहायक,बोलीभाषेवर रचनात्मक काम केलेले उपक्रमशील शिक्षक,बोलीभाषेवर काम केलेले स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या कार्यशाळेसाठी सहभागी झालेले होते.
📌 उपक्रमशील शिक्षकांनी आपआपल्या शाळेत केलेल्या रचनात्मक कामाचे सादरीकरण केले. वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगळं वेगळं रचनात्मक काम पाहायला मिळाले. कोरकु,कातकरी, पावरा, वारली, माडीया गोंड,मावची,पावरी इत्यादी आदिवासी बोलीभाषेवरील काम पाहायला मिळाले. अशा शाळेत अनेक समस्या असतात. दुर्गम भाग, भौतिक सुविधांचा अभाव अशा प्रतिकुल परिस्थितीत खुप उत्तम काम केल्याचे पाहायला मिळाले.
📌  मी नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील  बहुभाषिक वर्गातील मुलांसाठी केलेल्या रचनात्मक कामाचे अनुभव कथन केले. आता उस्मानाबाद जिल्ह्यातील बंजारा व पारधी बोलीभाषेवर तसेच बहुभाषिक शाळांच्या समस्येवर काम सुरू केले आहे. यासाठी पुढील कामाची दिशा मिळाली.
📌   उपक्रमशील शिक्षकांनी आदिवासी  बोलीभाषेतील शब्दकोश, पुरक वाचन साहित्य तयार केलेले होते.ते पाहायला मिळाले.
📌 उन्नती या स्वयंसेवी संस्थेने कोरकु बोलीभाषेवर केलेल्या रचनात्मक कामाचे अनुभव मा.हेमांगी जोशी यांनी  सर्वांना सांगीतले.

📌 भिन्न भिन्न बोलीभाषा असणा-या मुलांसाठी कोणते वाचन साहित्य असावे.
शिक्षक सक्षमीकरण कसे करता येईल.
बोलीभाषा असणा-या मुलांच्या शिकण्यातील अडचणी कोणत्या आहेत.

📌 भिन्न भिन्न बोलीभाषा असणारी मुले वाचायला कशी शिकतील?त्यासाठी कोणकोणते साहित्य तयार करावे लागेल?

बोलीभाषेतील शिक्षकांचा दृष्टीकोन कसा असावा?तो वाढविण्यासाठी काय उपाययोजना करावी?

बोलीभाषेसाठी पर्यवेक्षिय यंत्रणेची भूमिका काय?ती सुयोग्य रितीने पार पाडावी यासाठी काय उपाययोजना असावी?
अशा विविध विषयांवर चर्चा झाली.

प्रादेशिक विद्याप्राधिकरण, अमरावती यांनी कार्यशाळेसाठी सहकार्य केले.

मा.सुजाता लोहकरे,मा.नामदेव माळी,मा.प्रतिभा भराडे, मा.ललिता भामरे यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन केले.
मा. सचिन लोखंडे, मा.हनुमंत जाधव, मा. संदिप वाकचौरे ह्या  विद्याप्राधिकरणाच्या मराठी विभागाच्या टिमने कार्यशाळेचे संचलन केले. मा.सुजाता लोहकरे,मराठी विभाग प्रमुख  विद्याप्राधिकरण पुणे व त्यांची टिम  या आदिवासी बोलीभाषा असणा-या विविध जिल्ह्यातील शाळांचा नुकताच अभ्यासदौरा करून आली होती. तेही अनुभव त्यांनी शेअर केले.

या कार्यशाळेसाठी सहभागी झाल्यामुळे मला खुप नवीन शिकता आले. माझ्या जिल्ह्यात काम करण्यासाठी दिशा मिळाली.

         समाधान शिकेतोड
            विषय सहायक
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था उस्मानाबाद.

Tuesday 12 September 2017

Twitter

Take a look at Samadhan shiketod (@Samadhanshiketo): https://twitter.com/Samadhanshiketo?s=09

Tuesday 5 September 2017

प्रशिक्षण भेट

काल श्रीपतराव भोसले हायस्कुल येथे उस्मानाबाद तालुक्यातील इयत्ता नववी च्या पुनर्रचित पाठ्यपुस्तकाच्या प्रशिक्षण वर्गास भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला.

अभ्यासक्रम , पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तकाची वैशिष्ट्ये
उपयोजित लेखन
साहित्य प्रकार
क्षमताविधाने
कृतीपत्रिका
बदलेल्या स्वाध्यायाची रचना 
कृतीयुक्त अध्ययन अनुभवांची रचना
भाषा शिक्षण
तंत्रज्ञानाचा वापर
शब्दकोश, विश्वकोश, विकिपीडिया
अध्ययन निष्पत्ती
संदर्भ ग्रंथ
ग्रंथालयाचा वापर
अध्ययन स्त्रोत

यावर शिक्षकांसोबत चर्चा केली. शिक्षकांनी उत्साहाने प्रतिसाद दिला. अभ्यासमंडळ सदस्य आल्याचे कुतूहलही वाटले. नवीन पाठ्यपुस्तक विद्यार्थी, शिक्षक यांना खुपच आवडलेले आहे.

समाधान शिकेतोड
सदस्य,अभ्यास मंडळ  पुणे.
विषय सहायक, DIECPD उस्मानाबाद.

Tuesday 29 August 2017

  सर...माझा फोटो काढा की !

     सर...माझा फोटो काढा की !
----------------------------------------------------------------
काल जि.प.प्रा.शाळा पारधी वस्ती -1 ता.वाशी या शाळेला भेट दिली. सोबत वरिष्ठ अधिव्याख्याता मा. धुमाळ सर व गटशिक्षणाधिकारी मा. जाधव साहेब हे होते.
शाळेत सर्व विद्यार्थी पारधी समाजातील होते. त्याची बोली पारधी.
मुले आत्मविश्वासाने मराठी भाषा बोलत होते. चित्रवर्णन करत होते. पाठ्यपुस्तकातील उता-याचे वाचन करत होते. दुसरीतील विद्यार्थी तीन अंकी संख्या वाचत होते.
शाळेचा परिसर खुपच छान होता.
मुलांसोबत मस्त गप्पा मारल्या.
एक मुलगा म्हणाला"माझाही फोटो काढा की"
मस्त सेल्फी घेतली मुलांसोबत.
मुले म्हणाली
"पुन्हा कधी येणार "

Sunday 20 August 2017

शाळा सिद्धी कार्यशाळा

●शाळा सिद्धी कार्यशाळा ●

स्थळ - DIECPD, उस्मानाबाद.
दिनांक - 19 ऑगस्ट 2017.

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण  व्यावसायिक विकास संस्था उस्मानाबाद व शिक्षण विभाग (मा.)  जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, उस्मानाबाद येथे जिल्ह्यातील  माध्यमिक शाळामधील मुख्याध्यापकांची एक दिवसीय  कार्यशाळा संपन्न झाली.

     ●  *प्रमुख उपस्थिती* ●

📌मा.आनंदजी रायते.
मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.उस्मानाबाद
📌 मा. डाॅ.कलिमोद्दीन शेख     
    प्राचार्य, DIECPD उस्मानाबाद.
📌मा. सचिन जगताप शिक्षणाधिकारी ( प्रा.) जि.प.उस्मानाबाद
📌मा. औदुंबर उकिरडे शिक्षणाधिकारी ( मा. ) जि.प.उस्मानाबाद
📌मा. नवनाथ धुमाळ, वरिष्ठ अधिव्याख्याता तथा नोडल ऑफिसर, शाळा सिद्धी.
📌मा. शिवदास नलावडे, उपशिक्षणाधिकारी,जि.प.उस्मानाबाद
📌मा.शिवाजी चंदनशिवे, उपशिक्षणाधिकारी जि.प.उस्मानाबाद

          ■ *कौतुक व सन्मान* ■
  1) श्री.गुरूदेव दत्त हायस्कूल भूम
2) छत्रपती शिवाजी विद्यालय,उस्मानाबाद.
  3) श्रीपतराव भोसले हायस्कुल,उस्मानाबाद
या तीन शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या हस्ते करण्यात आला.

  📌सुरवातीला शिक्षणाधिकारी मा. उकिरडे साहेब  यांनी उपस्थित मुख्याध्यापकांशी संवाद साधला. शाळा प्रगती बाबत आढावा घेतला. जिल्ह्यातील रचनात्मक काम करणाऱ्या शाळांचे कौतुक केले.जिल्हातील सर्व शाळा A ग्रेड मध्ये यायला हव्यात असे आवाहन केले. प्रत्येक शाळेत स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन करुन दररोज जादा तास घेऊन तयारी करण्याच्या सूचना दिल्या.. गणित,विज्ञान विषयाच्या प्रयोगशाळा अध्ययावत करणे,Ict labचा अध्यापनात अधिकाधिक वापर करणे, वृक्षारोपन करणे इ. बाबी वर सूचना दिल्या.
उपशिक्षणाधिकारी मा. शिवाजी  चंदनशिवे यांनी staff portal वstudentportal वर् करावयाच्या कामाची माहिती दिली. हे काम31 ऑगष्टपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
📌 श्री. गुरूदेव दत्त हायस्कूलचे प्रयोगशील मुख्याध्यापक श्री.गायकवाड सर यांनी त्यांच्या शाळेचे उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यामुळे सर्वांना प्रेरणा मिळाली.

📌  मा.डॉ शेख साहेब प्राचार्य, DIECPD उस्मानाबाद यांनी सर्व मुख्याध्यापकांशी संवाद साधला. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी शाळांनी विविध उपक्रम राबवावेत. लोकसहभागातून शाळा समृद्ध कराव्यात. शाळा सिद्धी बद्दल क्षेत्रनिहाय मार्गदर्शन केले.रचनात्मक काम करणाऱ्या शाळांचे कौतुक व अभिनंदन केले. 

📌 श्री. योगीराज आमगे, साधनव्यक्ती यांनी शाळा सिद्धी बद्दल मुख्याध्यापकांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले.

📌  श्री. समाधान शिकेतोड यांनी शाळा सिद्धीचे राज्य संपर्क अधिकारी तथा कार्यक्रम अधिकारी मा.असिफ शेख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. मा. असिफ सरांनी भ्रमणध्वनी वरून मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले.

📌 मा.शेख साहेब प्राचार्य,जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, उस्मानाबाद यांनी  सद्भभावना  दिनाची शपथ सर्वांना दिली.

     ● *मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब*●

    *मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी  मुख्याध्यापकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले*.

   📌   शाळा सिद्धी मध्ये आता A ग्रेड मिळविणे प्रत्येक शाळेला बंधनकारक आहे. त्यासाठी प्रत्येकांने प्रयत्न करायला हवा.
📌 ज्ञानरचनावाद जीवनव्यवहारातील उदाहरणासह समजून सांगितला. Pedogogical stategy कशी असावी याबद्दल त्यांनी तैवान देशातील एक उत्तम उदाहरण त्यांनी सांगीतले.
📌 शाळा सिद्धी मध्ये बाह्यमूल्यमापनात प्राप्त झालेली श्रेणी शाळेने दर्शनी भागावर लिहावी. 📌  प्रत्येक मुलं शिकलं पाहिजे. त्या त्या इयत्तेतील सर्व क्षमता मुलांना प्राप्त व्हायला हव्यात.

  कार्यशाळेचे संचलन श्री. समाधान शिकेतोड यांनी केले. यावेळी DIECPD मधील सर्व अधिव्याख्याता, विषय सहायक उपस्थित होते. शिक्षण विस्तार अधिकारी श्री. मल्लिनाथ काळे, श्री.संतोष माळी यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

शब्दांकन
समाधान शिकेतोड
विषय सहायक, DIECPD उस्मानाबाद