Tuesday 31 January 2017

शाळासिद्धी

● शाळा सिद्धी ●
आज दि. 31 जानेवारी  2017 रोजी कन्हेरी व सरमकुंडी ता.वाशी  येथील शिक्षणपरिषदेत शाळासिद्धी बद्दल सविस्तर माहिती दिली.
📌 कन्हेरी येथे शाळासिद्धी नोंदणी कशी करावी, क्षेत्र निहाय माहिती कशी भरावी हे PPT च्या सहाय्याने सांगितले.
📌 शाळासिद्धीच्या शासन निर्णयातील माहिती सांगितली.
📌 प्रत्येक मुल प्रगत व्हावे, शाळा प्रगत व्हावी यासाठी नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात यावेत.
📌 खुप प्रयत्न करूनही मुल प्रगत होत नाही. अशा मुलांच्या अध्ययन समस्या समजण्यासाठी CASE STUDY करावा. अशा मुलांना प्रगत करावे.
📌 आंतरराष्ट्रीय शैक्षणिक  दर्जाच्या शाळा निर्माण करणे. या शासन निर्णयावर चर्चा केली.
📌100%शाळा  शाळा सिद्धीसाठी नोंदणी करण्याचा निर्धार केला.

समाधान शिकेतोड
निर्धारक, शाळासिद्धी विद्याप्राधिकरण पुणे.
विषय सहायक DIECPD उस्मानाबाद .

Monday 2 January 2017

इतकं प्रेम कुठं मिळतं

इतकं प्रेम कुठं मिळतं
------------------------------------------------
आज शाळेत पोहचताच मुले नविन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी धावतच आली. काल रविवार होता त्यामुळे आपल्या सरांना शुभेच्छा देण्यासाठी आज मुले वाट पाहतच होती.

स्वतःच्या हाताने बनवलेली ती शुभेच्छा पत्रे मला खुपच आवडली. हा अनमोल ठेवा व सुखद अनुभव ह्रदयाच्या कप्प्यात जपून ठेवीन.