Monday 24 April 2017

● Foundation of Constructivist Pedagogy for Strengthening MSRG ●

● Foundation of Constructivist Pedagogy for Strengthening MSRG ●

   स्थळ- श्री.शिवछत्रपती क्रीडा संकुल
                    बालेवाडी, पुणे.
    दिनांक - 10 /4/2017  ते  13/4/2017
     आयोजक - सातत्यपूर्ण व्यावसायिक
                  विभाग विद्याप्राधिकरण पुणे.

विद्याप्राधिकरण,प्रादेशिक विद्याप्राधिकरण,DIECPD पुनर्रचनेनुसार प्रतिनियुक्तीने हजर झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांची चार दिवसांची कार्यशाळा संपन्न झाली.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिक्षणतज्ञ आदरणीय *सुबिरजी शुक्ला* व त्यांची Ingus Pahal Team यांनी ही कार्यशाळा घेतली.

📌 सुरूवातीला - सातत्यपूर्ण व्यावसायिक विभागाच्या प्रमुख मा. डॉ. नेहा बेलसरे यांनी *Restructuring of MSCERT* बद्दल माहिती दिली.
📌 MSRG ग्रुपवर राज्यातील 2 कोटी विद्यार्थी व 8 लाख शिक्षकांची जबाबदारी आहे. त्यासाठी प्रचंड मेहनत करण्याची तयारी ठेवा असे मा.सुबिरजींनी सांगीतले.
📌 राज्यातील प्रमुख शैक्षणिक  समस्या कोणत्या यावर सर्वांनी चर्चा केली.
📌  पारंपारिक खेळातून मुलांचं शिकणं कसं होत याच्याबद्दल गटात चर्चा केली.पारंपारिक खेळातून भाषिक कौशल्य, जीवनकौशल्य,विविध विषयातील क्षमतांचा विकास होतो.  खेळात अशा कोणत्या गोष्टी असतात. त्यामुळे मुले या सर्व गोष्टी शिकतात.
📌 जेथे विद्यार्थ्यांत मानसीक प्रक्रिया होते. त्यालाच कृती म्हणता येईल. शिक्षणात केवळ अनुकरण उपयोगी नाही. मुलांच्या मानसीक पातळीवर बदल व्हायला हवा.त्यांना त्या कृतीमध्ये आव्हाने मिळायला हवीत. तरच शिक्षण घडून येईल. कृतीत अनुभव, चिंतन,उपयोजन, दृढीकरण ह्या गोष्टी यायला हव्यात.

  *" हमारे मन में सीखना एक ढांचे की तरह होता है।सीखने के दौरान हमारे मन में पहलें से बना कोई स्कीमा टूटता है और नया स्किमा बनता है।"*

📌 कृतीतील विविध टप्पे कृती करूनच सर्वजण अनुभवत होते. कागदाच्या तुकड्यावर एक कृती केली. याच तुकड्यावर पुढे अनेक कृती केल्या. या कृतीतून *ERAC (Experience, Reflection, Application, Consolidation )* ही पद्धत प्रत्यक्ष अनुभवली.

📌 उपलब्ध साधनांचा वापर आपण *TLM(Teaching Learning Material)*म्हणून आपण कसा करू शकतो याची अनेक उदाहरणे मा.सुबिरजींनी दिली.
📌 कृतीचे विविध प्रकार समजले. कृतीचे विविध पॅटर्न शिक्षकांना माहित असायला हवेत.

📌 प्रत्येक विद्यार्थ्यांला समजून घेऊन, त्याचा अध्ययन स्तर समजून घेऊन त्याच्या गरजेनुसार त्याला अध्ययन अनुभव दिले जावेत. हा *Responsive Approch* खुपच आवडला.

📌 कृतीआधारीत ज्ञानरचनावादी वर्ग कसा असावा याबद्दल चर्चा झाली. कृती आधारीत समतावादी वर्ग असावा. याबद्दल चर्चा झाली.
📌 प्रत्येक वेळी नवीन प्रश्नातून काहीतरी नवीन शिकायला मिळाले. लर्निग जर्नल वाचायला मिळाले. या प्रत्येक बाबीतून आम्ही समृद्ध होत होतो.
📌 *दिल की पेडाॅगाॅजी-ग्रेट पेडाॅगाॅजी* 
खुपच आवडली.

  *"TLM हमारे मस्तिष्क में होता है।आसपास जो भी उससे हम शिक्षण कर सकते है।"*

   📌 विविध अध्ययन अनुभव देताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कसे विचारावेत याबद्दल कृती केल्या.
📌 TLM पासून विषयानुसार कृती करण्याचा सर्वांनी मिळून प्रयत्न केला. ती कृती ERAC मध्ये कशी बसते यावर चिंतन केले.
📌 विविध विषयांच्या गटात कृतीचे सादरीकरण झाले. मी मराठी विषयातील  तोंडी कृती- गोष्ट तयार करणे ही सादर केली होती.यामुळे मला *Best Oral Activity Devlopar* हे मायक्रो सर्टिफिकेट मिळाले.
दररोज अशी वेगवेगळ्या विषयांवर मायक्रो सर्टिफिकेट दिली जात होती.

📌 *स्कूल व्हिजन* - 2018 वर चर्चा झाली. प्रत्येक गटाने स्कूल व्हीजन तयार केले होते.
यावरून राज्याचे एक स्कूल व्हिजन तयार केले.

■ Cafeteria Training Concept ■
Curiculum,CPD, Evaluation, Research, ICT यापैकी तीन आवडीचे विषय निवडून पंधरा मिनीटांचे प्रशिक्षण.
हे सर्वांना खूपच आवडले.

" जिनकी जादा बुद्धि होती है उनकी बुद्धि नही समृद्धि होती है।"

📌 Learning Pakege ही संकल्पना आवडली.
📌 विविध पेडाॅगाॅजी क्वीझ घेतल्या.
📌 तार्किक विचार वाढवायला लावणाऱ्या विविध कृती घेतल्या.
📌 पेडाॅगाॅजी हैकेथान यावर विषयानुसार समस्या देऊन त्या समस्या कृतिकार्यक्रम करून सोडवल्या.
📌 मराठी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र या विषयांचे राज्याचे व्हिजन तयार करण्यात आले.
📌 *बेंचमार्क, स्टँडर्ड, क्षमता, Learning Indicator यावर सविस्तर चर्चा झाली*.
📌 आदरणीय सुबिरजींनी विचारलेल्या प्रश्नांना अभ्यासपूर्ण  उत्तरे दिली.

  आतापर्यंत केलेल्या कार्यशाळेपेक्षा ही कार्यशाळा खूपच अप्रतिम होती. स्वतः प्रगल्भ, समृद्ध करणारी होती. विचारांना सकारात्मक दिशा देणारी, नवउर्जा देणारी होती.

सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास विभागाच्या प्रमुख मा.डॉ.नेहा बेलसरे मॅडम  व त्यांच्या विभागातील सहका-यांनी या कार्यशाळेसाठी प्रचंड मेहनत घेतली. विद्याप्राधिकरण पुणे येथील सर्व सन्माननीय अधिकारी व कर्मचारी यांनाही या कार्यशाळेसाठी खुप मेहनत घेतली.

                    

समाधान शिकेतोड
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था उस्मानाबाद.