Thursday 15 June 2017

● प्रवेशोत्सव शाळाभेट ●

● प्रवेशोत्सव शाळाभेट ●

आज सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढुमेवाडी ता.पुरंदर जि.पुणे या उपक्रमशील  शाळेला विषय सहायक  *श्री.समाधान शिकेतोड उस्मानाबाद, श्री. हेमराज रमधन  जालना,श्री.अजित राक्षे सातारा,श्री.नितीन मेमाने पुणे*  यांनी भेट दिली.

सकाळी सकाळी मुले उत्साहाने शाळेत आली होती. त्यांचे फुल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुलांचे पालकही उपस्थित होते. शाळेत ABL पद्धत सुरू आहे.प्रत्येक मुलं शिकत आहे. मुख्याध्यापक  श्रीमती.विद्या देशमुख(मेमाने) व शिक्षीका श्रीमती.शैलजा गादे यांनी शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्याचेही अभिनंदन करण्यात आले.

पहिल्या दिवशी चिमुकल्यांना भेटल्याचा आनंद काही औरच होता. या शाळेत  इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांनी प्रवेश घेतलेला आहे.

Sunday 4 June 2017

●Workshop on Approaches to Subjects●

विद्याप्राधिकरण पुणे, प्रादेशिक विद्याप्राधिकरण,जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था येथे प्रतिनियुक्ती झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांची पाच दिवशीय कार्यशाळा सपकाळ नॉलेज हब,नाशिक येथे दि.22/5/2017 ते 26/5/2017 या कालावधीत संपन्न झाली.
आम्हा MSRG सदस्यांना समृद्ध करणारी कार्यशाळा होती.