Tuesday 29 August 2017

  सर...माझा फोटो काढा की !

     सर...माझा फोटो काढा की !
----------------------------------------------------------------
काल जि.प.प्रा.शाळा पारधी वस्ती -1 ता.वाशी या शाळेला भेट दिली. सोबत वरिष्ठ अधिव्याख्याता मा. धुमाळ सर व गटशिक्षणाधिकारी मा. जाधव साहेब हे होते.
शाळेत सर्व विद्यार्थी पारधी समाजातील होते. त्याची बोली पारधी.
मुले आत्मविश्वासाने मराठी भाषा बोलत होते. चित्रवर्णन करत होते. पाठ्यपुस्तकातील उता-याचे वाचन करत होते. दुसरीतील विद्यार्थी तीन अंकी संख्या वाचत होते.
शाळेचा परिसर खुपच छान होता.
मुलांसोबत मस्त गप्पा मारल्या.
एक मुलगा म्हणाला"माझाही फोटो काढा की"
मस्त सेल्फी घेतली मुलांसोबत.
मुले म्हणाली
"पुन्हा कधी येणार "

Sunday 20 August 2017

शाळा सिद्धी कार्यशाळा

●शाळा सिद्धी कार्यशाळा ●

स्थळ - DIECPD, उस्मानाबाद.
दिनांक - 19 ऑगस्ट 2017.

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण  व्यावसायिक विकास संस्था उस्मानाबाद व शिक्षण विभाग (मा.)  जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, उस्मानाबाद येथे जिल्ह्यातील  माध्यमिक शाळामधील मुख्याध्यापकांची एक दिवसीय  कार्यशाळा संपन्न झाली.

     ●  *प्रमुख उपस्थिती* ●

📌मा.आनंदजी रायते.
मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.उस्मानाबाद
📌 मा. डाॅ.कलिमोद्दीन शेख     
    प्राचार्य, DIECPD उस्मानाबाद.
📌मा. सचिन जगताप शिक्षणाधिकारी ( प्रा.) जि.प.उस्मानाबाद
📌मा. औदुंबर उकिरडे शिक्षणाधिकारी ( मा. ) जि.प.उस्मानाबाद
📌मा. नवनाथ धुमाळ, वरिष्ठ अधिव्याख्याता तथा नोडल ऑफिसर, शाळा सिद्धी.
📌मा. शिवदास नलावडे, उपशिक्षणाधिकारी,जि.प.उस्मानाबाद
📌मा.शिवाजी चंदनशिवे, उपशिक्षणाधिकारी जि.प.उस्मानाबाद

          ■ *कौतुक व सन्मान* ■
  1) श्री.गुरूदेव दत्त हायस्कूल भूम
2) छत्रपती शिवाजी विद्यालय,उस्मानाबाद.
  3) श्रीपतराव भोसले हायस्कुल,उस्मानाबाद
या तीन शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या हस्ते करण्यात आला.

  📌सुरवातीला शिक्षणाधिकारी मा. उकिरडे साहेब  यांनी उपस्थित मुख्याध्यापकांशी संवाद साधला. शाळा प्रगती बाबत आढावा घेतला. जिल्ह्यातील रचनात्मक काम करणाऱ्या शाळांचे कौतुक केले.जिल्हातील सर्व शाळा A ग्रेड मध्ये यायला हव्यात असे आवाहन केले. प्रत्येक शाळेत स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन करुन दररोज जादा तास घेऊन तयारी करण्याच्या सूचना दिल्या.. गणित,विज्ञान विषयाच्या प्रयोगशाळा अध्ययावत करणे,Ict labचा अध्यापनात अधिकाधिक वापर करणे, वृक्षारोपन करणे इ. बाबी वर सूचना दिल्या.
उपशिक्षणाधिकारी मा. शिवाजी  चंदनशिवे यांनी staff portal वstudentportal वर् करावयाच्या कामाची माहिती दिली. हे काम31 ऑगष्टपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
📌 श्री. गुरूदेव दत्त हायस्कूलचे प्रयोगशील मुख्याध्यापक श्री.गायकवाड सर यांनी त्यांच्या शाळेचे उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यामुळे सर्वांना प्रेरणा मिळाली.

📌  मा.डॉ शेख साहेब प्राचार्य, DIECPD उस्मानाबाद यांनी सर्व मुख्याध्यापकांशी संवाद साधला. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी शाळांनी विविध उपक्रम राबवावेत. लोकसहभागातून शाळा समृद्ध कराव्यात. शाळा सिद्धी बद्दल क्षेत्रनिहाय मार्गदर्शन केले.रचनात्मक काम करणाऱ्या शाळांचे कौतुक व अभिनंदन केले. 

📌 श्री. योगीराज आमगे, साधनव्यक्ती यांनी शाळा सिद्धी बद्दल मुख्याध्यापकांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले.

📌  श्री. समाधान शिकेतोड यांनी शाळा सिद्धीचे राज्य संपर्क अधिकारी तथा कार्यक्रम अधिकारी मा.असिफ शेख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. मा. असिफ सरांनी भ्रमणध्वनी वरून मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले.

📌 मा.शेख साहेब प्राचार्य,जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, उस्मानाबाद यांनी  सद्भभावना  दिनाची शपथ सर्वांना दिली.

     ● *मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब*●

    *मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी  मुख्याध्यापकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले*.

   📌   शाळा सिद्धी मध्ये आता A ग्रेड मिळविणे प्रत्येक शाळेला बंधनकारक आहे. त्यासाठी प्रत्येकांने प्रयत्न करायला हवा.
📌 ज्ञानरचनावाद जीवनव्यवहारातील उदाहरणासह समजून सांगितला. Pedogogical stategy कशी असावी याबद्दल त्यांनी तैवान देशातील एक उत्तम उदाहरण त्यांनी सांगीतले.
📌 शाळा सिद्धी मध्ये बाह्यमूल्यमापनात प्राप्त झालेली श्रेणी शाळेने दर्शनी भागावर लिहावी. 📌  प्रत्येक मुलं शिकलं पाहिजे. त्या त्या इयत्तेतील सर्व क्षमता मुलांना प्राप्त व्हायला हव्यात.

  कार्यशाळेचे संचलन श्री. समाधान शिकेतोड यांनी केले. यावेळी DIECPD मधील सर्व अधिव्याख्याता, विषय सहायक उपस्थित होते. शिक्षण विस्तार अधिकारी श्री. मल्लिनाथ काळे, श्री.संतोष माळी यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

शब्दांकन
समाधान शिकेतोड
विषय सहायक, DIECPD उस्मानाबाद

Friday 18 August 2017

चला ग्लोबल होऊया

चला ग्लोबल होऊया ......
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
       स्थळ- रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मुंबई         दिनांक - 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2017

    राज्य अभ्यास मंडळ सदस्यांची रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मुंबई येथे नुकतीच कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेला सर्व भाषा विषयाचे अभ्यासमंडळ सदस्य उपस्थित होते. बालभारतीचे विशेषाधिकारी, विद्याप्राधिकरणातील संबंधित विभागाचे विभागप्रमुख व इतर अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेची थिम होती " चला ग्लोबल होऊया. . . . "

📌 या कार्यशाळेत मराठी, हिंदी, इंग्रजी, सिंधी, कन्नड, तेलगू, संस्कृत, उर्दू इत्यादी भाषा विषयाचे अभ्यासमंडळ सदस्य सहभागी झाले होते. प्रत्येकजण आपापल्या पाठ्यपुस्तकातील उल्लेखनीय बाबी, पाठ्यपुस्तकाची सामर्थ्यस्थळे शेअर करत होते. युगानुकुल विद्यार्थी घडावा यासाठी ही पाठ्यपुस्तके खुपच छान बनलेली आहेत. देशभर महाराष्ट्रातील पाठ्यपुस्तकाचे कौतुक केले जात आहे.

📌 मा. प्राची साठे मॅडम, विशेष कार्य अधिकारी मा. मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी खुप महत्वाचे, प्रेरणादायी मार्गदर्शन आम्हाला केले.
Learning indicators
Learning Compitancy
Learning Outcomes
Pedagogical strategy
करीकुलमबेस अप्रोच
अंगणवाड्यासाठी आलेला नविन "आकार"अभ्यासक्रम, पुर्वप्राथमिक शिक्षण
   पहिलीचे पाठ्यपुस्तक व भाषाशिक्षण
यावर मॅडमनीं खुप सखोल व अभ्यासपूर्ण विवेचन केले. विविध उदाहरणे दिली.
पाठ्यपुस्तकातील क्षमताविधाने व अध्ययन निष्पत्ती यावर चर्चा केली . अभ्यासमंडळ सदस्यांच्या सक्षमीकरणासाठी मॅडमनीं प्रचंड मेहनत घेतली आहे. आम्हाला नेहमीच खुप महत्वाचे मार्गदर्शन करत असतात.

📌मा. माधुरी वाडेकर कार्यक्रम अधिकारी, मा. इरफान इनामदार, अभ्यासक्रम विकसन अधिकारी यांनी Learning Outcomes चे सादरीकरण केले. मा. प्रकाश जावडेकर साहेब,मानव संसाधन विकास मंत्री, भारत सरकार यांचा Learning Outcomes वरील व्हिडिओ प्रेरणादायी होता. त्यांनी  Learning Outcomes चे महत्व सांगुन  प्रत्येक वर्गात Learning Outcomes चे पोस्टर लावावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

📌 पेडाॅगाॅजीकल स्टॅटेजी बदलण्यासाठी अध्ययन निष्पत्ती किती महत्वाच्या आहेत यावर चर्चा झाली.

📌 Learning Compitancy
Maharastra & the world
या सेंशनमध्ये सिद्धेश सर व प्रतीक सर यांनी *सिंगापूर, फिनलंड,कॅनडा* या देशातील Learning Outcomes चा अभ्यास आमच्याकडून करून घेतला. हा नवीनच पण खुप समृद्ध अनुभव आम्हाला मिळाला. आमचा ग्लोबल अप्रोच तयार होण्यास मदत झाली.
  📌  युनिस्कोने ठरवलेल्या उत्तम पाठ्यपुस्तकाची तत्वे व महाराष्ट्रातील पाठ्यपुस्तकाची यासंदर्भात स्थिती यावरही अभ्यास केला. तर सर्व तत्वे आमची पाठ्यपुस्तके पुर्ण करत असल्याबाबत आम्हाला अभिमान वाटला.

📌 मा.नंदकुमार साहेब,प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,मा.डॉ.सुनिल मगरसाहेब, संचालक विद्या प्राधिकरण पुणे.यांनी शेवटच्या दिवशी कार्यशाळेला भेट दिली.
मा.संचालक साहेबांनी सर्व अभ्यासमंडळ सदस्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

📌   ■ मा.नंदकुमार साहेब ■

  ●  जगात जे बेस्ट आहे ते आमच्या मुलांना मिळायला हवे.
  ● तोरणमाळ येथील आंतरराष्ट्रीय शाळेबद्दल       माहिती सांगितली.
● 100 % मुले शिकतील अशी पाठ्यपुस्तके तयार करा. असे आवाहन केले. सर्व अभ्यासमंडळ सदस्यांचे कौतुक केले.
●  अध्यापन शास्त्रातील मूर्ताकडून अमूर्ताकडे इत्यादी सुत्रे जीवनव्यवहारातील उदाहरणासह समजून सांगितली.
● पूर्वप्राथमिक शिक्षण झालेले असो की नको आई -बाबा बोलके असो की नसो प्रत्येक मुलं शिकलं पाहिजे.

आदरणीय नंदकुमार साहेबांच्या प्रेरणादायी व उर्जस्वल मार्गदर्शनामुळे अभ्यासमंडळ सदस्यांमध्ये नवचैतन्य फुलले होते.
या तीन दिवसांच्या कार्यशाळेत समृद्ध असे अनुभव मिळाले.

समाधान शिकेतोड
सदस्य, राज्य अभ्यास मंडळ पुणे.
विषय सहायक, DIECPD, उस्मानाबाद.