Tuesday 31 October 2017

सहविचार सभा

आज उस्मानाबाद DIECPD येथे पायाभूत वाचन विकास कार्यक्रम प्रशिक्षण संदर्भात सहविचार सभा संपन्न झाली.

Wednesday 4 October 2017

●स्व-अभिव्यक्ती क्षमता विकसन कार्यशाळा●

●स्व-अभिव्यक्ती क्षमता विकसन कार्यशाळा●

स्थळ-  प्रशाला इंदापूर ता.वाशी
दिनांक- 3 नोव्हेंबर 2017

----------------------------------------------------------
                    संवादक
            समाधान शिकेतोड
विषय सहायक,DIECPD, उस्मानाबाद.
----------------------------------------------------------

   प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी,शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी इंदापूर केंद्रातील इयत्ता पाचवी,सहावी  मराठी विषय शिक्षकांची 
स्व-अभिव्यक्ती क्षमता विकास कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी मा.राहुल भट्टी, केंद्रप्रमुख मा.कुलकर्णी सर ,साधनव्यक्ती श्री.पांचाळ सर व श्री.रणदिवे सर उपस्थित होते.

📌  स्व-अभिव्यक्ती मध्ये विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येतात. कोणत्या टप्प्यावर मुलं व्यक्त होत नाहीत. शब्दावरून गोष्ट लिहिणे, चित्रावरून गोष्ट लिहिणे.अनुभव लेखन, प्रसंग पुर्ण करणे यामध्ये मुलांना कोणत्या अडचणी येतात. याबद्दल शिक्षकांशी चर्चा केली.
📌  स्व-अभिव्यक्ती  मध्ये अनुभव/अनुभूती , चिंतन/विचार किती महत्वाचे आहेत.यावरून अभिव्यक्ती क्षमता विकास होतो.हे संकल्पना चित्रावरून स्पष्ट केले.
📌 दिलेल्या शब्दावरून गोष्ट तयार करून लिहणे. या क्षमतेवर चर्चा केली. प्रत्येक मुलाला ही क्षमता प्राप्त होण्यासाठी टप्प्यानुसार विविध कृती कशा घ्यायच्या यावर चर्चा केली.

कृती-  माइंड मॅप,शब्द पहा-व्यक्त व्हा, वाचलेली गोष्ट लिहिणे, दोन शब्दावरून गोष्ट लिहिणे, तिन शब्दावरून गोष्ट लिहिणे.

📌  शब्दावरून गोष्ट लिहत असताना गोष्टीतील वाक्याचे सुसंगत लेखन करावे. यासाठी तार्कीक विचार करण्यासाठी काही कृती घेतल्या. यामुळे मुले सुसंगत लेखन करू शकतील. तार्कीक विचार करण्यासाठीच्या कृती आम्हाला मा.सुबिरजींच्या कार्यशाळेत शिकायला मिळाल्या होत्या. त्याचा उपयोग येथे झाला.

📌 अभिव्यक्ती  क्षमता विकसनासाठी मी पुर्वीच्या शाळेत केलेले रचनात्मक कामाचे अनुभव शिक्षकांशी शेअर केले.

या कार्यशाळेमुळे आम्हाला कामाची दिशा मिळाली. नवीन बाबी शिकायला मिळाल्या.अशा प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केल्या. 

" तुम्ही तर आमचंच काम सोपं केलं."

"  तुम्ही फिल्डवर हे काम केल्यामुळे मुलांच्या शिकण्यातील अडचणी माहित आहेत.यामुळे खुप छान आमच्या अडचणीचे समाधान झाले."

" अभिव्यक्ती क्षमता विकसीत करण्याचे टप्पे आम्हाला माहित झाले."

शिक्षकांच्या अशा प्रतिक्रिया ऐकून कार्यशाळा सार्थकी लागल्याचे समाधान वाटले. नक्कीच संकलित मुल्यमापनात या क्षमतेची या केंद्रातील विद्यार्थ्यांची  संपादणूक पातळी प्रभुत्व पातळीकडे जाईल.

📌  साधनव्यक्ती श्री.कृष्णा पांचाळ यांनी स्वतः बनवलेल्या शैक्षणिक साहित्य दाखवले. त्याचा उपयोग भाषिक कौशल्याचा विकास करण्यासाठी कसा करावा याचे मार्गदर्शन केले.

  उपक्रमशील केंद्रप्रमुख मा.कुलकर्णी सरांनी कार्यशाळचे छान नियोजन केले होते.

समाधान शिकेतोड
विषय सहायक
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था उस्मानाबाद.
सदस्य, राज्य अभ्यास मंडळ, पुणे.

Sunday 1 October 2017

मराठवाडा साहित्य परिषद

29 नोव्हेंबर रोजी यंशवंतराव सभागृह उस्मानाबाद येथे मराठवाडा साहित्य परिषदेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली.
अनेक साहित्यकांना ऐकता,भेटता आलं.

कविसंमेलन छान झालं.
नवीन पुस्तकांची खरेदी केली.

लेणी दर्शन

खुप दिवसापासून उस्मानाबादच्या लेणी पाहण्याची इच्छा होती. ती पुर्ण झाली. अप्रतिम लेणी पाहून मन तृप्त झाले. लेण्याच्या आजूबाजूचा परिसरही खुपच नयनरम्य होता. लेण्याच्या पश्चिमेकडचे तळे विलोभनीय दिसत होते. पुरातत्व विभागाची लेण्याची माहिती देणारा फलक अस्पष्ट दिसत होता.

अप्रतिम लेणी  पाहून मन सातव्या शतकात गेले. आपला हा ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेवा अमूल्य आहे. त्याची जपणूक सर्वांनीच करायला हवी. तिथल्या दगडावर रेघोट्या ओढून विद्रूप करू नये. हा civic Seance प्रत्येकाला आला पाहिजे.