Saturday 8 December 2018

समजपूर्वक वाचन प्रकल्पाची तयारी ....

नमस्कार मित्रांनो,
सध्या वाशी तालुक्यात अध्ययन निष्पत्ती आधारित समजपूर्वक वाचन हा प्रकल्प राबविण्यासाठी प्रशिक्षण पुर्व तयारी करतोय. सोमवार पासून पहिला टप्पा सुरू होतोय.त्यासाठी सर्व तयारी..........

आज दुसरा शनिवार पण सकाळी आठ पासून सध्याकाळी सात पर्यंत सर्व तयारीतच गेला.माझे सहकारीही माझ्यासोबत जीव ओतून काम करत आहेत. प्रशिक्षण घटकसंच निर्मिती संदर्भातील कार्यशाळेत अध्ययन निष्पत्ती आधारित काम करण्यासाठी शिक्षक सक्षमीकरणावर अनेक अंगानी चर्चा झाली होती. SCERT पुणे येथे यावर बरेच विचार मंथन  झाले होते.
मुलांसोबत काम करताना वर्गातील आंतरक्रिया कशी घडावी?त्यासाठी काय काय साहित्य हवं.याबद्दल चर्चा झाली होती.प्रशिक्षण घटकसंचही तयार झाला आहे.त्यात आम्ही प्रत्यक्ष वर्गात राबवायचा कृतीकार्यक्रम जोडला आहे.अशा कृतींच्या बकेट तयार केल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांना नेमक्या कोणकोणत्या कृती घ्यायच्या याबद्दल स्पष्टता येईल.

खरं तर गेले दीड वर्ष क्वेस्ट सोबत भाषाशिक्षण समजून घेतले.त्यामुळे खुप शिकता आलं. मुलांसोबत काम करताना खुप समृद्ध अनुभव मिळाले.त्यामुळे पुढे  LBL स्तराधारित अध्ययन कार्यक्रम राबवताना खुप फायदा झाला.हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यामध्ये राबवला जातोय.आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यात  लोहारा तालुक्यात सुरू आहे. या ठिकाणी जे वर्गातील कामाचे 60 दिवसाचे नियोजन केले होते.त्याचा खुप उपयोग झाला.

वाशी तालुक्यातील शिक्षक प्रशिक्षण घेतल्यानंतर वर्गातील कामाला सुरुवात करतील.त्यांन सपोर्ट देण्यासाठी पर्यवेक्षिय यंत्रणेलाही प्रशिक्षण देतोय.
आमचा जिल्हा आकांक्षीत जिल्ह्यापैकी एक आहे.त्यामुळे NAS मधील संपादणूक पातळी वाढण्यासाठी अध्ययन निष्पत्ती आधारित अध्ययन अनुभव देणे आवश्यक आहे. त्यासाठी हा प्रकल्प दिशादर्शक होईल असा विश्वास वाटतो.

Friday 7 December 2018

LBL नैदानिक चाचणी विश्लेषण कार्यशाळा-लोहारा

*LBL नैदानिक चाचणी विश्लेषण कार्यशाळा-लोहारा*
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
स्थळ-गटसाधन केंद्र लोहारा
दिनांक- 7 डिसेंबर 2018

               🌈प्रेरणा🌈
      *मा.डाॅ.संजय कोलते*
     *मुख्य कार्यकारी अधिकारी*
     *जिल्हा परिषद उस्मानाबाद.*

         📚मार्गदर्शक📚
1)  *मा.डाॅ.कलिमोद्दीन शेख*
   प्राचार्य,DIECPD उस्मानाबाद.
2) *मा.नारायण मुदगलवाड*     
   विभाग प्रमुख मराठी,DIECPD उस्मानाबाद.
         
    🔅 *प्रमुख उपस्थिती*🔅
  1) *मा.तय्यबा सय्यदा*
        गटशिक्षणाधिकारी,लोहारा.
   2) *मा.नवनाथ आदटराव*
शिक्षण विस्तार अधिकारी,लोहारा

     📚 *तज्ञ मार्गदर्शक*📚
    1) *समाधान शिकेतोड,*
          विषय सहायक,मराठी.                 
    2) *नेताजी चव्हाण*
          विषय सहायक,मराठी.

*स्तराधारित अध्ययन कार्यक्रमासाठी (LBL) लोहारा तालुक्याची निवड झालेली आहे. या तालुक्यातील मराठी विषयासाठी इयत्ता सहावी ते आठवतील विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.हा कार्यक्रम इयत्ता पाचवी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर(लिपी परिचय,समजपूर्वक वाचन,कार्यात्मक व्याकरण व शब्दसंपत्ती,स्व-अभिव्यक्ती) आधारित आहे. यासाठी सर्व विद्यार्थ्यांची नैदानिक चाचणी घेण्यात येणार आहे.*

📌  LBL कार्यक्रमाबद्दल सर्व शिक्षकांना माहिती देण्यात आली.
📌 LBL नैदानिक चाचणीचे विश्लेषण करण्यात आले.प्रश्ननिहाय चर्चा करण्यात आली. नैदानिक चाचणी कशा पद्धतीने घ्यावी यावर चर्चा झाली.
चाचणी घेतल्यानंतर गुणदान करण्याच्या निकष असणारी शिक्षक माहिती पुस्तिकेतील प्रश्ननिहाय गुणदान समजून घेतले. शंकांचे निरसन करण्यात आले.
📌 गुणदान केल्यानंतर एक्सेल सीट मध्ये कसे भरावेत.याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.
📌 तालुकास्तर सुलभक(केंद्रप्रमुख व साधनव्यक्ती)यांनी नैदानिक चाचणी घेण्याचे केंद्रनिहाय छान नियोजन केले.तालुका स्तर सुलभक आपल्या केंद्रासाठी *मेंटाॅर* असणार आहेत.
📌 नैदानिक चाचणीत 40% पेक्षा कमी संपादणूक असणा-या विद्यार्थ्यांसाठी LBL कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी साधनव्यक्ती श्री.अनंत लहाने,श्री.श्रीमंत काळे यांनी परिश्रम घेतले.

*समाधान शिकेतोड*
DIECPD,उस्मानाबाद.

समजपूर्वक वाचन

*समजपूर्वक वाचन बैठक-वाशी*
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
दिनांक-6/12/2018
स्थळ- गटशिक्षणाधिकारी कार्यालय वाशी.

अध्ययन निष्पत्तीआधारीत वर्गआंतरक्रिया घडावी. प्रत्येक मुलं शिकतं करण्यासाठी शिक्षकांचे सक्षमीकरण व्हावे.यासाठी वाशी तालुक्यात अध्ययन निष्पत्ती आधारित समजपूर्वक वाचन हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. याची आज बैठक *प्रयोगशील अधिकारी  मा.राहुल भट्टी गटशिक्षणाधिकारी वाशी यांच्या अध्यक्षतेखाली गटशिक्षणाधिकारी  कार्यालयात संपन्न झाली.*
यावेळी *मा.नारायण मुदगलवाड विभाग प्रमुख मराठी,श्री.समाधान शिकेतोड,विषय सहायक श्री.नेताजी चव्हाण, विषय सहायक यांनी समज पूर्वक वाचन प्रकल्पाबाबत माहिती दिली.*
पुढील कृतीकार्यक्रमावर चर्चा झाली.

यावेळी सन्माननीय शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख,साधनव्यक्ती,विशेष शिक्षक उपस्थित होते.सर्वांनी चर्चा केली.प्रकल्प राबविण्याची रणनिती (strategy) ठरवण्यात आली.

हा प्रकल्प इयत्ता तिसरी,चौथी,पाचवी या इयत्तासाठी राबविण्यात येणार आहे. अध्ययन निष्पत्ती नुसार अध्ययन अनुभव कशा प्रकारे देता येतील याबाबत शिक्षकांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे.

Wednesday 21 November 2018

🌈 आरंभिक साक्षरता राज्यस्तरीय परिसंवाद🌈

🌈 आरंभिक साक्षरता राज्यस्तरीय परिसंवाद🌈
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
       स्थळ-पेस हाॅस्पिटॅलिटी ट्रेनिंग सेंटर औरंगाबाद
दिनांक-16-19 नोव्हेंबर 2018

आरंभिक साक्षरता या विषयावर क्वेस्ट व रिड अलायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय परिसंवाद औरंगाबाद येथे  संपन्न झाला. या परिसंवादात वक्ते म्हणून आरंभिक साक्षरता या विषयाच्या देशभरातील तज्ञांनी संवाद साधला.या परिसंवादात शिक्षण विभागतील प्रयोगशील अधिकारी,शिक्षक प्रशिक्षक,प्रयोगशील शिक्षक सहभागी झाले होते.

📌  या परिसंवादात अंकुरती साक्षरता,वाचन,मुलांच्या साक्षर होण्यात बालसाहित्याचे महत्त्व,स्तराधारित शिक्षण कार्यक्रम(LBL),साक्षरतेच्या मूल्यमापनासाठी तंत्रज्ञानाचा वापर,भाषेचे सांस्कृतिक राजकारण,नाटकाच्या माध्यमातून बालसाहित्याचे सादरीकरण तसेच विविध संस्थांनी साक्षरतेच्या संदर्भात केलेल्या रचनात्मक कामाचे सादरीकरण केले.
📌 परिसंवादात सर्वांना एकमेकांचे विचार व रचनात्मक काम समजून घेण्याची संधी मिळाली. या विषयाची शास्त्रीय वैचारीक बैठक निर्माण होण्यास मदत झाली.
📌 औरंगाबाद जि.प च्या मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी परिसंवादाला पहिल्या दिवशी भेट दिली व सर्वांशी संवाद साधला.
📌 देशातील विविध राज्यात सुरू असलेल्या "आरंभिक साक्षरतेच्या" प्रयोगाविषयी,प्रकल्पाविषयी माहिती मिळाली.
📌  *बालसाहित्य* या विषयावचे अनेक पदर उलगडले.बालसाहित्याचे साक्षरतेच्या विकासातील महत्त्व,मुलांसाठी योग्य साहित्य निवड करण्यासाठीचे निकष कोणते असावेत? याबद्दल खुपच महत्त्वाची व उपयुक्त माहिती मिळाली.
📌 फलटण येथिल प्रगत शिक्षण संस्थेच्या भाषा शिक्षणाच्या कामाचे सादरीकरण मस्तचं होते.डाॅ. मॅक्सीन बर्नसन यांनी 1984 साली स्थापन केलेल्या संस्थेत वंचित घटकातील मुलांना वाचन-लेखन शिकवण्याच्या खास पद्धतीविषयी माहिती मिळाली.
📌 बहुभाषिक वर्गातील मुलांसाठी केलेल्या रचनात्मक कामाचे अनुभव कथन करताना प्रयोगशील शिक्षक प्रल्हाद काठोले यांनी केले.हे सगळं समजून घेताना नवनवीन संकल्पना समजत गेल्या.

📌 मुलांसोबत काम केलेल्या प्रयोगशील शिक्षकांचे काम समजून घेता आलं.या क्षेत्रातील विविध संशोधने याबद्दल चर्चा झाली.

या परिसंवाद मिळालेल्या समृद्ध अनुभवाचा उपयोग प्रत्येक मुलं शिकण्यासाठी व शिक्षक सक्षमीकरणासाठी नक्कीच होईल. असा विश्वास वाटतो.

या परिसंवादाचं अगदी नेटकं नियोजन शिक्षणतज्ञ आदरणीय निलेश निमकर सर व त्यांच्या टिमनं केलं होत.हा अनुभव खुपच समृद्ध करून गेला.

समाधान शिकेतोड

Sunday 7 October 2018

लोकसहभागातून समृद्ध झालेली शाळा-जि.प.प्रा.शाळा भाटशिरपुरा

लोकसहभागातून समृद्ध झालेली शाळा-जि.प.प्रा.शाळा भाटशिरपुरा
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
6 ऑक्टोबर रोजी 2018  जि.प.प्रा.शाळा भाटशिरपुरा ता.कळंब जि.उस्मानाबाद या शाळेस *महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथिल उपसंचालक मा.डाॅ. जगराम भटकर यांनी भेटदिली.*
सोबत उस्मानाबाद DIECPD चे  विषय सहायक समाधान शिकेतोड व संजय पवार होते.
 हॅडवाॅशस्टेशन,पालेभाज्या पिकवणारी सुंदर परसबाग,देखणी शाळेची इमारत,प्रशस्त क्रिडांगण,ई-लर्निंग, प्रत्येक वर्गात सांऊड सिस्टीम अशा प्रकारे लोकसहभागातून शाळा समृद्ध केली आहे.
 उपसंचालक मा.डाॅ.जगराम  भटकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.मुले आत्मविश्वासाने बोलत होती.
 विविध कृतींच्या माध्यमातून अध्ययन-अनुभव दिले जात होते.इयत्ता तिसरीच्या मुलांनी इंग्रजीचा Role play करून दाखवला.विद्यार्थी छान कविता,कथा लेखन करतात.
 शाळा समृद्ध करण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रचंड मेहनत घेतली आहे.त्याबद्दल उपसंचालक मा.डाॅ.जगराम भटकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Friday 14 September 2018

स्तराधारित शिक्षण कार्यक्रम(LBL) विभागीय प्रशिक्षण(Leaval based Learning)""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

स्तराधारित शिक्षण कार्यक्रम(LBL) विभागीय प्रशिक्षण(Leaval based Learning)
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
स्थळ- मयुरा रेसिडन्सी लातूर.
दिनांक- 11 व 12 सप्टेंबर 2018.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.इयत्ता सहावी ते आठवीतील मुलांच्या भाषा विषयाच्या गुणवत्ता वाढीसाठी स्तराधारित शिक्षण कार्यक्रम (Leaval based Learning)  राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एका तालुक्यात राबविण्यात येत आहे.यासंदर्भातील विभागीय प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था मुरूड यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथे दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले.
                🌈 प्रेरणा 🌈
               मा.विशाल सोळंकी
          आयुक्त (शिक्षण),महाराष्ट्र राज्य.
           📚 *मार्गदर्शक* 📚
            मा.डाॅ.सुनिल मगर
             शिक्षण संचालक
        MSCERT(विद्यापरीषद) पुणे.
        
        सुलभक(SRP)
1) समाधान शिकेतोड
विषय सहायक DIECPD,उस्मानाबाद.
2) रमेश माने,विषय सहायक
DIECPD,मुरूड
3) शितल बोधले
DIECPD,अंबाजोगाई.
4) प्रविण रूईकर
विषय सहायक 
DIECPD,DIECPD हिंगोली
5) दिपक कोकरे
विषय सहायक
DIECPD,हिंगोली
           प्रशिक्षणार्थी(DRP व BRG)
मा.विभाग प्रमुख(मराठी) DIECPD व विषय सहायक(मराठी)औरंगाबाद विभाग व सोलापूर जिल्हा, शिक्षणविस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख,साधनव्यक्ती,शिक्षक.
                   पहिला दिवस
पहिल्या दिवशी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था मुरूडचे प्राचार्य मा.बळीराम चौरे यांनी प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला.
📌 पहिल्या दिवशी LBL म्हणजे काय? या सत्रात LBL बद्दल माहिती देण्यात आली.हा कार्यक्रम इयत्ता सहावी ते आठवतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असुन इयत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमातील क्षमतेवर आधारित आहे. हा कार्यक्रम लिपी परिचय,वाचून आकलन,कार्यात्मक व्याकरण व स्व-अभिव्यक्ती या अभ्यासक्रमातील क्षमतेवर आधारित आहे.या क्षमतेत पाठिमागे असणा-या विद्यार्थ्यांचा शोध घेणे.त्याचे स्तर तयार करणे.स्तराधारित अध्ययन अनुभव देऊन क्षमता प्राप्त मुलांच्या क्षमता प्राप्त करणे.यासाठी शिक्षकांचे सक्षमीकरण करणारा हा कार्यक्रम आहे.शिक्षकांना मदत व मार्गदर्शन करीत सोबत घेऊन जाण्यासाठी मेंटाॅरची भुमीकाही महत्वाची असणार आहे. यासाठी BRG चे सक्षमीकरण या कार्यशाळातून करण्यात आलेले आहे.
📌 LBL हा प्रकल्प जिल्ह्यात कशा प्रकारे राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये LBL साठी निवडलेल्या  DRG व BRG ची भूमिका कशी असणार आहे.याबद्दल सविस्तर चर्चा झाली.
📌 पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमातील क्षमतेवर असलेल्या नैदानिक चाचणीवर सविस्तर चर्चा झाली. लिपी परिचय,वाचून आकलन,कार्यात्मक व्याकरण व स्व-अभिव्यक्ती या क्षेत्रनिहाय कोणते व कसे प्रश्न आहेत. याबद्दल चर्चा केली गेली.
      
      🎤 *काव्यमैफल*
संध्याकाळी लातूर जिल्ह्यातील निमंत्रित कवीची काव्यमैफल बहरदार झाली.प्रशिक्षणार्थ्यांनी खुमासदार कवितांचा आस्वाद घेतला.
             *दुसरा दिवस*
📌  दुस-या दिवशी नैदानिक चाचणीला गुणदान कसे करावे?याबद्दलच्या  निकषांवर चर्चा झाली.
📌  नैदानिक चाचणीचे गुण एक्सेल सीट मध्ये भरणे.स्तरनिहाय विद्यार्थी शोधणे याचे प्रात्यक्षिक सादरीकरण झाले.
📌 विषय सहायक सतिश सातपुते यांनी झुम मिंटीगचे प्रात्यक्षिक सादरीकरण केले.
📌 गोष्ट गुरूजी घडण्याची या पुस्तकाचे लेखक प्रल्हाद काठोळे हे क्वेस्ट(QUEST) quest.org.in प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.त्यांनिही LBL बाबत मार्गदर्शन,चर्चा केली.
📌 प्रशिक्षणार्थी LBL साठी  निवडलेल्या तालुक्यातील एका शाळेतील इयत्ता सहावी ते आठवीतील सर्व मुलांची नैदानिक चाचणी घेऊन मुलांच्या गुणांच्या डेटा घेऊन पुढील प्रशिक्षणासाठी येतील.
📌 प्रशिक्षणाला गटशिक्षणाधिकारी मा.तृप्ती अंधारे,विषय सहायक मा.पुष्पलता कांबळे MSCERT पुणे. यांनी भेट दिली.
📌 मराठी विभाग प्रमुख मा.दहिफळे सर व *सर्व DIECPD मुरूड टिम* यांनी प्रशिक्षणासाठी  परिश्रम घेतले.प्रशिक्षण उत्तमरित्या संपन्न झाले.
समाधान शिकेतोड
विषय सहायक
DIECPD उस्मानाबाद.

Monday 10 September 2018

शिक्षण परिषद -उर्दू

◇ शिक्षण परिषद-उर्दू माध्यम◇             (उस्मानाबाद जिल्हा)
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
दिनांक-  4 सप्टेंबर 2018
स्थळ- जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था उस्मानाबाद.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. उर्दू माध्यमातील सर्व व्यवस्थापनाच्या भूम,वाशी,परांडा,कळंब,उस्मानाबाद  या तालुक्यातील सर्व शिक्षकांची शिक्षक सक्षमीकरणासाठी शिक्षण परिषद संपन्न झाली.

      🌈 प्रेरणा 🌈
   मा.डाॅ. संजय कोलते
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद उस्मानाबाद.

             📚 मार्गदर्शन📚
       1)मा. डाॅ.कलिमोद्दीन शेख
     प्राचार्य,DIECPD,उस्मानाबाद
                   तथा                                                                        
शिक्षणाधिकारी (प्रा) जि.प.उस्मानाबाद.
2) मा.डाॅ.आय.पी.नदाफ
वरिष्ठ अधिव्याख्याता,DIECPD उस्मानाबाद.
3) मा.डाॅ.प्रभाकर बुधाराम
अधिव्याख्याता,DIECPD,उस्मानाबाद
4) मा.अख्तर सय्यद
अधिव्याख्याता,DIECPD उस्मानाबाद.

   🎤 *सुलभक*🎤

1) समाधान शिकेतोड
विषय सहायक DIECPD, उस्मानाबाद.
2) विजय जायभाय
विषय सहायक,DIECPD उस्मानाबाद
3) संजय पवार
    विषय सहायक,DIECPD उस्मानाबाद.
3) शागीर्द शेख
उपक्रमशील शिक्षक

         🗓 विषय
1) अध्ययन स्तर
2) भाषा(उर्दू व मराठी) व गणित मूलभूत क्षमता
3) निती आयोग
4) अध्ययन निष्पत्ती व NAS
5) शिष्यवृती परिक्षा
6) प्रगती शैक्षणिक चाचणी (पायाभूत व संकलित)
7) इंग्रजी विषय

📌 नुकत्याच झालेल्या उर्दू माध्यमातील शाळांची अध्ययन स्तर निश्चिती मधील संपादणूकीचे *उर्दू विभाग प्रमुख मा.अख्तर सय्यद* यांनी विश्लेषण केले गेले.
📌 उर्दू भाषा,मराठी भाषा  व गणितातील मूलभूत क्षमता विकासीत करण्यासाठी स्वतःच्या वर्गाची रणनिती ( strategy) व कृतीकार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली.
📌 निती आयोगाचे indicator सांगण्यात आले. त्यावर चर्चा झाली.
📌 NAS चाचणीतील मुलांची संपादणूक पातळी वाढण्यासाठी अध्ययन निष्पत्ती आधारित कशा पद्धतीने अध्ययन अनुभव द्यावेत.यावर चर्चा झाली.
📌 उर्दू मुलभूत वाचन शिकण्याचे सर्व टप्पे कृतीसह शिक्षकांनी समजून घेतले.गणितातील मूलभूत क्षमता विकासीत करण्यासाठी गणितातील संबोध समजून
घेतले.
📌 अक्षरगट तयार करणे,त्यावर वाचनपाठ तयार करणे याची कृती घेण्यात आली.
📌 इंग्रजी विषयाची महातेजस व टॅग काॅर्डीनेटर बद्दल माहिती देण्यात आली.
📌 प्राचार्य तथा शिक्षणाधिकारी  (प्रा.)मा.डाॅ.कलिमोद्दीन शेख,वरिष्ठ अधिव्याख्याता मा.आय.पि.नदाफ यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

प्रत्येक मुल शिकण्यासाठी,शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी ही शिक्षण परिषद नवी दिशा देणारी ठरली.कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सर्व विषय सहायक,समुपदेशक यांनी परिश्रम घेतले.

समाधान शिकेतोड
    विषय सहायक
DIECPD उस्मानाबाद.

Monday 3 September 2018

शिक्षण परिषद उर्दू माध्यम

◇ *शिक्षण परिषद-उर्दू माध्यम*◇             (उस्मानाबाद जिल्हा)*
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
दिनांक-  3 सप्टेंबर 2018
स्थळ- बालाघाट महाविद्यालय नळदुर्ग

*प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. उर्दू माध्यमातील सर्व व्यवस्थापनाच्या तुळजापूर,उमरगा,लोहारा या तालुक्यातील सर्व शिक्षकांची शिक्षक सक्षमीकरणासाठी शिक्षण परिषद संपन्न झाली.*

      🌈 *प्रेरणा* 🌈
   मा.डाॅ. संजय कोलते
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद उस्मानाबाद.

    📚 *मार्गदर्शन*📚
1)मा. डाॅ.कलिमोद्दीन शेख
शिक्षणाधिकारी (प्रा.) जि.प
उस्मानाबाद तथा प्राचार्य DIECPD उस्मानाबाद.
2) मा.मनोज सानप
जिल्हा माहिती अधिकारी,उस्मानाबाद.
3) मा.डाॅ.आय.पी.नदाफ
वरिष्ठ अधिव्याख्याता,DIECPD उस्मानाबाद.

    🎤 *सुलभक*🎤
1) मा.अख्तर सय्यद
अधिव्याख्याता,DIECPD उस्मानाबाद.
2) समाधान शिकेतोड
विषय सहायक DIECPD, उस्मानाबाद.
3) विजय जायभाय
विषय सहायक,DIECPD उस्मानाबाद
4) शागीर्द शेख
उपक्रमशील शिक्षक

         🗓 *विषय*
1) अध्ययन स्तर
2) भाषा(उर्दू व मराठी) व गणित मूलभूत क्षमता
3) निती आयोग
4) अध्ययन निष्पत्ती व NAS
5) शिष्यवृती परिक्षा
6) प्रगती शैक्षणिक चाचणी (पायाभूत व संकलित)

📌 नुकत्याच झालेल्या उर्दू माध्यमातील शाळांची अध्ययन स्तर निश्चिती मधील संपादणूकीचे विश्लेषण केले गेले.
📌 उर्दू भाषा,मराठी भाषा  व गणितातील मूलभूत क्षमता विकासीत करण्यासाठी स्वतःच्या वर्गाची रणनिती ( strategy) व कृतीकार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली.
📌 निती आयोगाचे indicator सांगण्यात आले. त्यावर चर्चा झाली.
📌 NAS चाचणीतील मुलांची संपादणूक पातळी वाढण्यासाठी अध्ययन निष्पत्ती आधारित कशा पद्धतीने अध्ययन अनुभव द्यावेत.यावर चर्चा झाली.
📌 उर्दू मुलभूत वाचन शिकण्याचे सर्व टप्पे कृतीसह शिक्षकांनी समजून घेतले.गणितातील मूलभूत क्षमता विकासीत करण्यासाठी गणितातील संबोध समजून घेतले.
📌 शिक्षणाधिकारी (प्रा.)मा.डाॅ.कलिमोद्दीन शेख,जिल्हा माहिती अधिकारी मा.मनोज सानप,वरिष्ठ अधिव्याख्याता मा.आय.पी.नदाफ यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

प्रत्येक मुल शिकण्यासाठी,शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी ही शिक्षण परिषद नवी दिशा देणारी ठरली. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी नळदुर्ग केंद्राचे  केंद्रप्रमुख,केंद्रिय मुख्याध्यापक, साधनव्यक्ती,उपक्रमशील शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

समाधान शिकेतोड
    विषय सहायक
DIECPD उस्मानाबाद.

Sunday 2 September 2018

कार्यशाळा

संस्थात्मक विकास कार्यशाळा औरंगाबाद.
"""""""""""""""""""”""""""""""""""""""""""""""""""""""""

स्थळ- प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबाद.
दिनांक- 1 सप्टेंबर 2018

औरंगाबाद विभागातील  जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे मा.प्राचार्य,मा.वरिष्ठ अधिव्याख्याता,व सर्व विषय सहायक यांची एक दिवसीय संस्थात्मक विकास कार्यशाळा औरंगाबाद येथे संपन्न झाली

               🌈प्रेरणा.🌈
       *मा.विशाल सोळंकी*
   *आयुक्त शिक्षण,महाराष्ट्र राज्य*
          
       📚 *मार्गदर्शक*📚

       *मा.डॉ. सुनील मगर*
   *संचालक,MSCERT पुणे.*

          *मा.डॉ नेहा बेलसरे*
   *संचालक मीपा,औरंगाबाद*

     *मा.डाॅ.सुभाष कांबळे      संचालक,प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबाद.*

     🎤 *सुलभक*🎤
मा. डॉ सुभाष कांबळे,संचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबाद.
मा.डॉ.उज्वल करवंदे,वरिष्ठ अधिव्याख्याता
मा.डॉ.प्रमोद कुमावत,
अधिव्याख्याता
मा.सुरेंद्र करवंदे
मा.मंगेशकुमार अंबिलवादे
मा.राजु कोरडे
मा. निसार शेख
मा.सुनील अदिक
मा.ख्वाजा मोईनुद्दीन

📌 या कार्यशाळेतून खूप काही नवीन शिकायला मिळाले. उद्दिष्टानुसार परिणामकारक उपक्रमांची अंमलबजावणी करणे.
📌 आपल्या विभागातील इतर जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था कडून काय मिळेल काय नवीन शिकता येईल यावर चिंतन झाले.
📌 प्रत्येक जिल्ह्याचे ध्येय काय आहे. सन 2018 -19 मध्ये प्रत्येक डीआयसीपिडीने कोणते ध्येय ठरवलेले आहे याबद्दल गटांमध्ये चर्चा झाली. ध्येय साध्य करण्यासाठी रणनीती(strategy) काय असावे याबद्दल चिंतन झाले
📌 यशस्वी होण्यासाठी संवाद खूप महत्त्वाचा आहे याबद्दल संवादाचे  प्रकार समजले. अशा प्रकारे संवाद साधून निश्चितच संस्थेचा विकास त्यामधून साधता येईल. यामुळे छान कार्यसंस्कृती यामधून तयार होण्यास मदत होईल.
📌  *vertical communication,*
*cross department communication,*
*Cross Organisation communication* याबद्दल सविस्तर माहिती मिळाली.
📌 सन्माननीय प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता,अधिव्याख्याता, सर्व विषय सहाय्यक यांचे जॉब चार्ट कसे असावेत याबद्दल गटांमध्ये चर्चा झाली.
📌 निती आयोग आणि SEQI (School Education quality index)  इंडिकेटर याबद्दल चर्चा झाली. SEQI ला आपल्या कामाची आपण कसे जोडू शकतो यावर चिंतन झाले.
📌 Action Plan session यामध्ये immediate goal, short term, goal long term goal प्रत्येक  DIECPD ने याबाबत ध्येय साध्य करण्यासाठी आपली स्ट्रॅटेजी काय असेल? याबद्दल चर्चा केली व स्ट्रॅटेजी ठरवली.
📌 2018 मध्ये होणाऱ्या *असर चाचणी* मध्ये शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था नी स्ट्रॅटेजी तयार केली.
*अध्ययन निष्पत्ती* वर काम करून NAS मधील संपादणूक पातळी वाढविण्याचे रणनीती तयार करण्यात.
              
            *संवाद*
*मा.डाॅ.सुनील मगर* *संचालक,MSCERT पुणे*
*डॉ नेहा बेलसरे उपसंचालक, MSCERT पुणे.*
यांनी स्कायपी(Skype) वरून सर्वांशी संवाद साधला.यामुळे सर्वांना प्रेरणा मिळाली.

ही कार्यशाळा सर्वांना समृद्ध करणारी होती याठिकाणी खूप नवीन शिकायला मिळाले नवीन संकल्पना समजून घेता आल्या.

आपापल्या जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था मध्ये याचा नक्कीच उपयोग होणार आहे. ठरवलेली उद्दिष्टे गाठण्यासाठी रणनिती कशी ठरवावी त्याबद्दल खूप चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी मिळाले.संपूर्ण RAA टिमने कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.

समाधान शिकेतोड
विषय सहायक
DIECPD,उस्मानाबाद.

Saturday 25 August 2018

शिक्षण परिषद

○ *शिक्षण परिषद-उस्मानाबाद जिल्हा*○
------------------------------------------------------

        *दिनांक -२४/८/२०१८*  
                   
*जिल्ह्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत सर्वच स्तरावर कार्यप्रेरीत होऊन 100 % मुले शिकण्याच्या दृष्टीने काम करत आहेत.मुलभूत क्षमता,अध्ययन निष्पत्ती प्रत्येक मुलांना प्राप्त करण्यासाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी होत आहे.या अनुषंगाने  शिक्षकांचे सक्षमीकरण व्हावे,प्रयोगशील शिक्षकांच्या कामाचे सादरीकरण व्हावे.यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील केंद्रामध्ये जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था उस्मानाबाद व शिक्षण विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांची  केंद्र स्तरीय शिक्षण परिषद संपन्न झाली.*

         🌈 *प्रेरणा*🌈

      *मा.डाॅ.संजय कोलते*
  *मुख्य कार्यकारी अधिकारी*          
*जिल्हा परिषद उस्मानाबाद.*
                
        📚 *मार्गदर्शन*📚

     *मा.डाॅ. कलिमोद्दीन शेख*
    प्राचार्य,DIECPD,उस्मानाबाद.
                   तथा
        शिक्षणाधिकारी (प्रा.)     
     जिल्हा परिषद उस्मानाबाद.

     🤝 *सहकार्य व मदत*🤝
      मा.डाॅ.आय.पि.नदाफ
वरिष्ठ अधिव्याख्याता,DIECPD उस्मानाबाद.
मा.सर्व अधिव्याख्याता,DIECPD उस्मानाबाद.
मा.सर्व उपशिक्षणाधिकारी जि.प.उस्मानाबाद.
सर्व विषय सहायक,DIECPD उस्मानाबाद.

🗓 *शिक्षण परिषदेचे विषय*

१) अध्ययन स्तर
२) निती आयोग
३) NAS/अध्ययन निष्पत्ती.
४) DIKSHA App
५) सतत अनुपस्थित  व शाळा बाह्य विद्यार्थी
६) पायाभुत चाचणी
७) नवोपक्रम व कृतीसंशोधन
८) शालेय पोषण आहार
९) समावेशीत शिक्षण

शिक्षण परिषदेत LCD Projector वर PPT च्या सहाय्याने विविध विषयांवर चर्चा केली गेली.डिसेंबरमध्ये होणा-या *जिल्हास्तरीय  विद्यार्थी बालसाहित्य संमेलन* याबाबत चर्चा झाली.अध्ययन निष्पत्ती चे  विश्लेषण,अध्ययन निष्पत्तीनुसार  वर्गाध्यापनाची दिशा कशी ठरवावी.कोणकोणत्या कृती,उपक्रम घेता येतील.त्यासाठी कोणकोणते अध्ययन स्त्रोत वापरावे लागतील?याबद्दल अध्ययन निष्पत्तीचे विश्लेषण केले गेले.निती आयोगातील सर्व indicator बद्दल शिक्षकांची जाणीवजागृती करण्यात आली. NAS परिक्षेबद्दल सखोल माहिती व NAS मधील संपादणूक पातळी वाढण्यासाठी अध्ययन निष्पत्तीवर कशा पद्धतीने काम करता येईल यावर चिंतन केले गेले.

     *शिक्षण परिषद- सुलभक*

        शिक्षण विस्तार अधिकारी
               केंद्र प्रमुख
               साधनव्यक्ती
              विषय तज्ञ(IED)
              तंत्रस्नेही शिक्षक

शिक्षण परिषदेला मा.प्राचार्य तथा शिक्षणाधिकारी(प्रा.),मा.वरिष्ठ अधिव्याख्याता,मा.अधिव्याख्याता, मा.उपशिक्षणाधिकारी,मा.गटशिक्षणाधिकारी, सर्व विषय सहायक यांनी शिक्षण परिषदेला भेटी दिल्या. शिक्षकांशी संवाद साधला. निती आयोग,अध्ययन निष्पत्ती अध्ययन स्तर,पायाभूत चाचणी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

             समाधान शिकेतोड
               विषय सहायक
           DIECPD उस्मानाबाद.