दोन शब्द

 
   शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे . विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाशी मैत्री करण्यासाठी कित्येक शाळा प्रयोग राबवीत आहेत . महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांच्या शैक्षणिक वेब साईट व ब्लॉग आहेत. हे सर्व पाहून मलाही ब्लॉग तयार करण्याची प्रेरणा मिळाली. शिक्षण क्षेत्रात होणारे नवीन बदल, वेगवेगळे प्रयोग व नाविन्यपूर्ण उपक्रम शाळाशाळापर्यंत पोहोचायला हवेत. त्यासाठी हवाय संवाद ! शैक्षणिक संवाद ...... म्हणून माझ्या ब्लॉगचं नावही शिक्षण संवाद असे ठेवले आहे.
    या ब्लॉग च्या माध्यमातून वाडीवस्तीवर, तांड्यावर व दुर्गम भागात काम करणारे प्रयोगशील शिक्षक, शिक्षण क्षेत्रातले उपक्रमशील अधिकारी, शिक्षण तज्ञ, नाविन्याचा शोध घेणारे उपक्रमशील शिक्षक व नवनिर्माणाचा ध्यास घेऊन काम करणारे लोकप्रतिनिधी यांच्यातील शिक्षण संवाद यातून घडेल अशी आशा वाटते.
      हा ब्लॉग तयार करताना शैक्षणिक वेब व ब्लॉग या WhatsApp वरील आमच्या ग्रुप मधील मित्र बालाजी जाधव, प्रशांत कऱ्हाडे, संतोष भोंबळे, भाऊसाहेब चासकर, बलभीम वाघमोरे व इतर सर्व मित्रांकडून प्रेरणा मिळाली. आमचे मित्र शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी, गटशिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे यांचाही मी आभारी आहे.
          आपल्या प्रतिक्रिया व मार्गदर्शनाची मी वाट पाहतोय........

शेवटी ग्रामगीतेतील ओवी सांगण्याचा मोह आवरत नाही.

                         या कोवळ्या काळ्यामाजी |
                         लपले ज्ञानेश्वर, रवींद्र,शिवाजी |
                         विकसता प्रकटतील समाजी |
                         शेकडो महापुरुष ||
                          
                                                     

                                                                                                समाधान शिकेतोड 
                                                                           जि.प .प.शाळा हाडोंग्री ता.भूम जि.उस्मानाबाद

No comments:

Post a Comment