माझी शाळा


क्षेत्रभेट -
        आज आमच्या शाळेतील मुलांनी जवळच्याच दुध संकलन केंद्रास भेट दिली. मुलांनी प्रत्यक्ष अनुभवातुन माहीती समजून घेतली....हेच खरं शिक्षण ....जे जगण्याशी जोडलेल असतं.मुल शिकताना जगत असतात....जगताना शिकत असतात.....त्याच्या शिकण्यातुन जगणं वजा केल तर..शिक्षण अर्थहीन होईल....
    ज्ञानरचनावादामध्ये मुलांच्या अनुभवाधारीत शिकण्याला खुप महत्त्व आहे.      दि.13-12-2014    

उपस्थिती ध्वज - 
      प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणामध्ये मुलांना शाळेत दाखल करणे,त्यांना शाळेत टिकविणे,गुणवत्तापुर्ण शिक्षण त्यांना देणेमहत्त्वाचे असते.त्यात मुलांची उपस्थिती शाळेत टिकवणे हल्ली एक आव्हान बनले आहे.ग्रामीण भागातील मुलांची उपस्थिती वाढावी यासाठी उपक्रमशील शिक्षक,मुख्याध्यापक झटत असतात.नवनविन उपक्रम राबवत असतात.
आमच्या शाळेत उपस्थिती ध्वज हा उपक्रम आठवडाभरापासून सुरू केला आहे.आमचे सहकारी मित्र बुरूंगे सरांनी स्वत: झेंडे शिवून घेतले.उपक्रमाचे फायदे......
1.हा उपक्रम कार्यान्वित केल्यापासून शाळेची उपस्थिती 100% झाली.
2.ध्वज मिळवण्याच्या उद्देशाने मुलेच आपल्या गैरहजर मित्रांना शाळेत घेऊन येऊ लागली.
3. शाळेत आनंददायी वातावरण तयार झाले.
4. गणवेश ध्वजामुळे सर्व मुले गणवेशात येउ लागली.
5.वर्गाला ध्वज मिळाल्यामुळे मुले दिवसभर आनंदाने शिकू लागली.
6. मुलांमुलात आंतरक्रिया होऊ लागली.
7. पालकही मुलांना आवडीने शाळेत पाठवू लागले.
8. शाळेत चैतन्यदायी,बालस्नेही वातावरण तयार झाले.
उपस्थिती ध्वज व गणवेश ध्वज हा उपक्रम 100% यशस्वी झाला......
         — समाधान शिकेतोड     दि.11-12-2014

No comments:

Post a Comment